विज्ञान युगात खळबळ! शास्त्रज्ञांनी बनवला जगातील पहिला 'ब्लॅक होल बॉम्ब', नेमका काय आहे प्रकार?

Black Hole Bomb Latest Update News : विज्ञान युगातून एक अतिशय महत्त्वाची बातमी समोर आली आहे. शास्त्रज्ञांनी प्रयोगशाळेतच ब्लॅक होल बॉम्ब तयार केला आहे. ज्याचा शब्द ऐकल्यानंतर आपसूकच मनात विचार येतो की विनाश. युनायटेड किंग्डममधील साउथ हॅम्प्टन विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी प्रथमच प्रयोगशाळेत 'ब्लॅक होल बॉम्ब' दाखवला आहे.

आता खरोखरच ब्लॅक होल बॉम्बचा (कृष्ण विवर) स्फोट होणार आहे का?, हे शस्त्र असेल का?, काही नवीन धोका निर्माण होणार का?, परंतु, तुम्हा-आम्हाला घाबरण्याचे कारण नाही. शास्त्रज्ञांचा हा शोध निश्चितच विश्वातील सर्वात रहस्यमय शक्तींपैकी एक आहे. परंतु, कृष्ण विवर समजून घेण्याच्या दिशेने हे सर्वात मोठे पाऊल असल्याचे मानले जात आहे. चला तर नेमका हा शोध काय आहे, याविषयी सविस्तर जाणून घेऊया..!

world first black hole bomb

'ब्लॅक होल बॉम्ब' म्हणजे काय?

'ब्लॅक होल बॉम्ब' हा खरा बॉम्ब नाही, तर 1970 च्या दशकात समोर आलेला एक सिद्धांत आहे. प्रसिद्ध शास्त्रज्ञ रॉजर पेनरोज आणि याकोव्ह झेल्डोविच यांनी अशी कल्पना मांडली होती. त्यांचे म्हणणे होते की, ब्लॅक होल बॉम्ब केवळ गिळत नाही तर त्याच्या फिरण्याद्वारे ऊर्जा देखील वाढवता येते. जर ही प्रक्रिया योग्यरित्या पुनरावृत्ती केली गेली. तर सकारात्मक अभिप्राय लूपद्वारे इतकी ऊर्जा निर्माण होऊ शकते की सिस्टम स्वतःच बॉम्बप्रमाणे स्फोट होईल, याल 'ब्लॅक होल बॉम्ब' असे म्हटले जाते.

कृष्णविवर ही एक खगोलीय वस्तू आहे ज्याचे गुरुत्वाकर्षण इतके तीव्र असते की त्यातून काहीही, अगदी प्रकाशही सुटू शकत नाही. कृष्णविवराचा "पृष्ठभाग" ज्याला त्याचे घटना क्षितिज म्हणतात. तो सीमा परिभाषित करतो जिथे बाहेर पडण्यासाठी आवश्यक असलेला वेग प्रकाशाच्या वेगापेक्षा जास्त असतो, जो विश्वाची गती मर्यादा मानली जाते.

हा सिद्धांत प्रथमच लॅबमध्ये सिद्ध

आतापर्यंत हा सिद्धांत कागदावर अन् समीकरणावर होता. पण आता शास्त्रज्ञ मॅरियन क्रॉम्ब यांच्या नेतृत्वाखालील शास्त्रज्ञांच्या पथकाने पहिल्यांदाच प्रयोगशाळेत ते सिद्ध केले आहे. त्यांनी एक फिरणारा अॅल्युमिनियम सिलेंडर घेतला. तो त्याच्याभोवती फिरणाऱ्या चुंबकीय क्षेत्रात ठेवला. या सेटअपची खास गोष्ट अशी होती की, बाह्य चुंबकीय क्षेत्र सिलेंडरपेक्षा वेगाने फिरत आहे की हळू फिरत आहे यावर अवलंबून उर्जेचे वर्तन बदलत असल्याचे दिसून आले आहे.

जेव्हा सिलेंडर चुंबकीय क्षेत्राच्या दिशेने परंतु अधिक वेगाने फिरतो. तेव्हा चुंबकीय क्षेत्राची शक्ती वाढते म्हणजेच ऊर्जा वाढते. पण जर सिलेंडर हळू फिरला तर ऊर्जा कमी होते. हे त्या ब्लॅक होल सिद्धांताचे खरे रूप मानले जात आहे. जे अनेक दशकांपासून फक्त पुस्तकांमध्ये वाचले जात होते. क्रॉम्ब आणि त्यांच्या टीमचा अभ्यास arXiv वर अपलोड करण्यात आलेला आहे.

ब्लॅक होलची नेमकी शक्ती काय?

खऱ्या कृष्णविवराच्या जवळ जाऊन चाचणी करू शकत नसल्यामुळे, असे प्रयोग आपल्यासाठी समानार्थी आहेत. याचा अर्थ असा की आपल्याला सिद्धांतात जे काही माहित आहे, ते आपण प्रयोगशाळेत दुसऱ्या माध्यमाचा वापर करून पुनरावृत्ती करून समजू शकतो. या प्रकरणात, चुंबकीय क्षेत्र आणि फिरणारा दंडगोलाकार हे कृष्णविवर आणि त्याच्या उर्जेशी अनुरूप मानले जात आहे.

यावरुन आपल्याला समजते की, जेव्हा एखादा कण कृष्णविवराच्या घटना क्षितिजाबाहेर त्याच्या एर्गो-स्फियरमध्ये प्रवेश करतो. तेव्हा त्याचे काय होते. कृष्णविवराचे फिरणे अवकाश-काळ पसरवते, ही एक घटना आहे. ज्याला फ्रेम ड्रॅगिंग म्हणतात. जर एखादा कण त्याच दिशेने फिरला तर तो अतिरिक्त उर्जेसह बाहेर पडू शकतो.

ब्लॅक होल बॉम्बवर एआयचा दावा काय?

ब्रिटिश विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी एका प्रयोगात पहिला ब्लॅक होल बॉम्ब तयार केला आहे. जरी हे 'खेळण्यांचे मॉडेल' आहे. पण यामुळेही चॅटजीपीटी घाबरले. जर हे खरोखरच अंतराळात घडले तर आपण 'स्पॅगेटीफाइड' होऊ असे एआयचा दावा आहे. 'स्पेगेटिफाइड' हे कृष्ण विवरात जाताना होणाऱ्या प्रक्रियेला दिलेले नाव आहे. यामध्ये वस्तू लांब अन् पातळ होते आणि ती ताणली जाते, असे म्हटले जाते.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+