Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

वर्ल्ड कप जिंकून हा क्रिकेटर ट्रेनने घरी परतला! "टीसीने पकडले असते पण बायकोने..." पहा काय घडलं?

Shivam dube train travel after world cup 2026 win : मैदानात षटकारांचा पाऊस पाडून भारताला विश्वविजेता बनवणारा खेळाडू जेव्हा सामान्यांसारखा ट्रेनच्या 'थर्ड एसी' डब्यातून प्रवास करतो, तेव्हा कोणाला विश्वास बसेल? पण हे घडलंय टीम इंडियाचा स्टार अष्टपैलू शिवम दुबे सोबत! अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर टी-२० वर्ल्ड कप २०२६ च्या फायनलमध्ये धुव्वा उडवल्यानंतर, शिवम दुबेने घरी पोहोचण्यासाठी जो मार्ग निवडला त्याची आता सर्वत्र चर्चा होत आहे.

Shivam dube train travel

प्रा
यव्हेट जेट नाही, चक्क 'सयाजी एक्सप्रेस'!

फायनलमध्ये धडाकेबाज फटकेबाजी करून भारताला २५० धावांच्या पार नेणाऱ्या शिवमला आपल्या कुटुंबाला भेटण्याची प्रचंड ओढ लागली होती. अहमदाबादहून मुंबईला जाणाऱ्या सर्व फ्लाईट्स फुल्ल होत्या. रस्ते मार्गाने वेळ लागणार होता, म्हणून दुबेने कोणताही बडेजाव न मिरवता चक्क 'सयाजी एक्सप्रेस'चे तिकीट काढले आणि पत्नी अंजुमसोबत ट्रेन गाठली.

ओळख लपवण्यासाठी 'मास्क-कॅप'चा आधार

गर्दीपासून वाचण्यासाठी शिवमने चेहऱ्यावर मास्क आणि डोक्यावर कॅप घातली होती. गाडी सुटण्यापूर्वी अवघ्या ५ मिनिटे आधी तो कोचमध्ये शिरला आणि थेट 'अप्पर बर्थ'वर जाऊन झोपला. शेजारच्या सीटवर प्रवासी होते, टीसी येऊन गेला, पण कोणालाही थांगपत्ता लागला नाही की त्यांच्या डोक्यावर देशाचा वर्ल्ड चॅम्पियन बसला आहे.

Shivam dube train travel

जेव्हा टीसीने विचारलं नाव... अन् पत्नीने मारली एन्ट्री!

इंडियन एक्सप्रेसच्या रिपोर्टनुसार, प्रवासादरम्यान एक अजब प्रसंग घडला. तिकीट तपासताना टीसीने संशयाने विचारलं, "कोण शिवम दुबे? तो क्रिकेटर का?" परिस्थिती हाताबाहेर जातेय असं वाटताच शिवमची पत्नी अंजुमने प्रसंगावधान राखलं. तिने शांतपणे उत्तर दिलं, "नाही हो, तो कशाला येईल इथं?" अंजुमच्या या उत्तराने टीसीचा संशय फिटला आणि शिवम दुबे टीसीच्या तावडीतून (आणि गर्दीतून) थोडक्यात वाचला!

बोरीवली स्टेशनवर पोलिसांनाही बसला धक्का

सकाळी बोरीवली स्टेशनवर लोक ओळखतील या भीतीने शिवमने अखेर पोलिसांशी संपर्क साधला. सुरुवातीला पोलिसांना वाटलं की वर्ल्ड चॅम्पियन एअरपोर्टवरून येईल, पण जेव्हा त्यांना समजलं की शिवम दुबे ट्रेनने येत आहे, तेव्हा त्यांनाही धक्का बसला. अखेर पोलिसांनी त्याला एस्कॉर्ट करत सुरक्षितपणे त्याच्या घरापर्यंत पोहोचवले.

शिवम दुबेची वर्ल्डकप फायनलमधील वादळी खेळी (IND vs NZ)

अहमदाबादमध्ये झालेल्या फायनलमध्ये भारताचा डाव मधल्या चौदाव्या षटकांनंतर काहीसा अडखळला होता. भारताची पडझड झाली असताना शिवम दुबे मैदानात आला. त्याने अवघ्या ८ चेंडूंमध्ये नाबाद २६ धावा कुटल्या. शेवटच्या षटकात न्यूझीलंडच्या जेम्स नीशमच्या शेवटच्या षटकात त्याने २४ धावा (३ चौकार आणि २ षटकार) वसूल केल्या. त्याच्या या फटकेबाजीमुळे भारताने फायनलमध्ये २५५ धावांचा डोंगर उभा केला, जो टी-२० वर्ल्डकपच्या फायनलमधील सर्वोच्च धावसंख्या ठरली.

दुबेची संपूर्ण टी-२० विश्वचषकातील कामगिरी

  • टी२० विश्वचषकात शिवम दुबेला खालच्या क्रमांकावर फलंदाजीची संधी मिळाली, तरीही त्याने आपल्या आक्रमक शैलीने प्रभाव पाडला.
  • शिवम दुबेने ८ सामन्यांत सरासरी ३४.८३, आणि १५९.५४ इतक्या स्ट्राइक रेटने २३५ धावा केल्या.
  • षटकारांचा पाऊस: शिवम दुबेने संपूर्ण स्पर्धेत १७ षटकार आणि १५ चौकार लगावले.
  • अष्टपैलू योगदान : फलंदाजीसोबतच त्याने मध्यमगती गोलंदाजी करत ५ बळी मिळवून संघाला संतुलन दिले. नेदरलँड्सविरुद्ध त्याने ६६ धावांची शानदार खेळी केली होती आणि २ विकेट्सही घेतल्या होत्या.
More From
Prev
Next
Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+