Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

शिवम दुबे-अंजुम खानची 'हटके' लव्हस्टोरी; धर्माची भिंत ओलांडली! शिवमपेक्षा पत्नी वयाने 'एवढी' मोठी

Shivam dube and anjum khan love story age-gap : भारतीय क्रिकेट संघाचा स्टार ऑलराउंडर शिवम दुबे सध्या त्याच्या तुफानी कामगिरीमुळे आणि वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. टी-२० वर्ल्ड कप २०२६ मधील त्याच्या शानदार प्रदर्शनाने चाहत्यांची मने जिंकली असतानाच, त्याची पत्नी अंजुम खान आणि त्याच्या वयातील अंतराची माहिती समोर आली आहे. प्रेमाला कोणत्याही सीमा नसतात, हे या जोडीने पुन्हा एकदा सिद्ध केले आहे.

Shivam dube and anjum khan

शिवमपेक्षा पत्नी अंजुम वयाने ७ वर्षांनी मोठी

अनेकांना हे ऐकून आश्चर्य वाटेल की, शिवम दुबे हा त्याची पत्नी अंजुम खानपेक्षा वयाने लहान आहे. शिवमचा जन्म २६ जून १९९३ रोजी झाला असून त्याचे वय सध्या ३२ वर्षे आहे. तर अंजुम खानचा जन्म २ सप्टेंबर १९८६ रोजी झाला असून ती ३९ वर्षांची आहे. म्हणजेच दोघांच्या वयात तब्बल ६ वर्षे ९ महिने (जवळपास ७ वर्षे) इतके अंतर आहे.

दोन रितीरिवाजांनुसार पार पडला विवाह

शिवम आणि अंजुम यांची प्रेमकथा एखाद्या चित्रपटासारखी रंजक आहे. बऱ्याच काळापर्यंत एकमेकांना डेट केल्यानंतर, १६ जुलै २०२१ रोजी त्यांनी मुंबईत लग्नगाठ बांधली. हा विवाह खास ठरला कारण त्यांनी हिंदू आणि मुस्लिम अशा दोन्ही धर्मांच्या रितीरिवाजांनुसार लग्नाचे विधी पार पाडले होते. त्यांचे निकाह आणि सप्तपदीचे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले होते.

कोण आहे अंजुम खान?

अंजुम खान ही मूळची उत्तर प्रदेशची रहिवासी आहे. तिने अलिगड मुस्लिम युनिव्हर्सिटीमधून (AMU) फाईन आर्ट्समध्ये पदवी पूर्ण केली आहे. अंजुमची आवड केवळ अभ्यासापुरती मर्यादित नसून तिला अभिनय आणि मॉडेलिंगचीही आवड आहे. ती काही म्युझिक अल्बम्समध्येही झळकली आहे.

क्रिकेट विश्वात केवळ शिवमच नाही, तर यापूर्वी शिखर धवन, सचिन तेंडुलकर यांसारख्या खेळाडूंनीही स्वतःपेक्षा वयाने मोठ्या असलेल्या जोडीदाराची निवड केली आहे. शिवम आणि अंजुमची केमिस्ट्री पाहून वयाचा हा आकडा केवळ कागदावरच मर्यादित असल्याचे जाणवते.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+