Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

मनोरंजन विश्वावर शोककळा! अवघ्या 27व्या वर्षी प्रसिद्ध कलाकाराचा संशयास्पद मृत्यू

Harimurali death news : मनोरंजन विश्वातून एकामागून एक धक्कादायक बातम्या समोर येत आहेत. मल्याळम चित्रपटसृष्टीतील उगवता तारा आणि एकेकाळचा गाजलेला बालकलाकार हरिमुरली याचे वयाच्या अवघ्या २७ व्या वर्षी निधन झाले आहे. दुसरीकडे, तमिळ चित्रपटसृष्टीतील अष्टपैलू व्यक्तिमत्व थक्काली श्रीनिवासन यांनीही जगाचा निरोप घेतल्याने दक्षिण भारतीय सिनेसृष्टीवर दुःखा डोंगर कोसळला आहे.

Harimurali death news

हरिमुरलीचा राहत्या घरात मृत्यू: घात की अपघात?

मल्याळम चित्रपटसृष्टीत आपल्या निरागस अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकणारा अभिनेता हरिमुरली हा केरळमधील पय्यन्नूर (Payyannur) येथील आपल्या राहत्या घरी मृत अवस्थेत आढळून आला. २७ वर्षांच्या या तरुण अभिनेत्याचा असा अचानक मृत्यू झाल्याने संपूर्ण चित्रपटसृष्टीत खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हरिमुरलीचा मृतदेह सध्या कोझिकोड येथील बेबी मेमोरियल हॉस्पिटलच्या शवागारात ठेवण्यात आला आहे. मृत्यूचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही, पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत. त्याच्या अकाली जाण्याने चाहत्यांनी आणि सहकलाकारांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून हळहळ व्यक्त केली आहे.

बालकलाकार म्हणून ५० हून अधिक चित्रपटांचा वारसा

हरिमुरलीने अतिशय लहान वयात कॅमेऱ्यासमोर आपली छाप पाडली होती. त्याने केवळ मल्याळमच नव्हे, तर दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील ५० पेक्षा जास्त चित्रपटांमध्ये बालकलाकार म्हणून काम केले होते.

प्रमुख चित्रपट: 'रसीकन', 'अन्नन थम्पी', 'मादम्बी', 'डॉन' आणि 'पट्टनथील भूतम' यांसारख्या सुपरहिट चित्रपटांत त्याने महत्त्वाच्या भूमिका साकारल्या होत्या.

दिग्गजांसोबत काम: सुपरस्टार मममुथी यांच्यासोबत 'अन्नन थम्पी' आणि अभिनेता दिलीप यांच्यासोबत 'रसिकन' मध्ये तो झळकला होता.

VFX आर्टिस्ट म्हणून नवी ओळख : अभिनयासोबतच हरिमुरलीने तंत्रज्ञानात रस दाखवत VFX आर्टिस्ट म्हणून आपली नवी ओळख निर्माण केली होती. 'अमर अकबर अँथनी' सारख्या चित्रपटात त्याने या भूमिकेतून योगदान दिले होते.

तमिळ सिनेसृष्टीचा आधारवड हरपला: थक्काली श्रीनिवासन यांचे निधन

मल्याळम सृष्टी या धक्क्यातून सावरत असतानाच तमिळ चित्रपटसृष्टीतूनही एक अत्यंत दु:खद बातमी समोर आली. प्रसिद्ध अभिनेते, दिग्दर्शक आणि संगीतकार थक्काली श्रीनिवासन यांनी दीर्घ आजाराने अखेरचा श्वास घेतला.

अष्टपैलू कारकीर्द: श्रीनिवासन हे केवळ अभिनेते नव्हते, तर त्यांनी चित्रपट निर्मिती, संगीत आणि दिग्दर्शन अशा विविध क्षेत्रांत आपली मोहोर उमटवली होती.

आजाराशी झुंज: गेल्या काही वर्षांपासून ते गंभीर आजाराशी झुंज देत होते. बंगळुरू येथे उपचार सुरू असताना मंगळवारी त्यांची प्राणज्योत मालवली. बुधवारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

मनोरंजन विश्वात पोकळी
एकीकडे कारकीर्द सुरू होण्याआधीच हरपलेला हरिमुरली आणि दुसरीकडे आपला प्रदीर्घ अनुभव मागे सोडून गेलेले थक्काली श्रीनिवासन, या दोन दिग्गज कलाकारांच्या निधनामुळे दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीचे कधीही न भरून येणारे नुकसान झाले आहे.

More From
Prev
Next
Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+