Gold Price Forecast: सोन्याच्या दरात मोठी उलथापालथ! 1 तोळा सोनं 2 लाखांचा टप्पा ओलांडणार? वाचा अंदाज
Gold price forecast marathi : सोन्याच्या दरांनी सामान्यांच्या इच्छा आकांक्षांना मुरड घातल्याचे दिसते, कारण सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर सोन्याचे दर पोहचले आहेत. यातच जागतिक बाजारपेठेतील भू-राजकीय तणाव इराण-अमेरिका- इस्त्रायल युद्धाची स्थिती आणि अमेरिकन डॉलरच्या मूल्यात होणारे बदल यामुळे सोन्याच्या दरांनी पुन्हा एकदा सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
सध्या सोन्याचे दर त्यांच्या आतापर्यंतच्या उच्चांकी पातळीपासून सुमारे १८,००० रुपयांनी दूर असले, तरी सोनं लवकरच २ लाख रुपये प्रति १० ग्रॅम होणार का? याची गुंतवणूकदारांमध्ये एकच चर्चा रंगली आहे.

विक्रमी पातळीवरून घसरण का झाली?
'गुडरिटर्न्स'नुसार, मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर (एमसीएक्स) सोन्याचे दर १,६१,६७५ रुपये प्रति १० ग्रॅमपर्यंत पोहोचले होते, जे १,८०,७७९ रुपयांच्या 'लाईफटाईम हाय'पेक्षा कमी आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणसोबतचा संघर्ष लवकर संपण्याची शक्यता वर्तवल्यानंतर बाजारात ही उलथापालथ पाहायला मिळाली. युद्धाचा ताण कमी झाल्याने डॉलर कमकुवत झाला असून त्याचा थेट फायदा सोन्याच्या किमतींना मिळत आहे.
सोनं २ लाखांच्या पार जाणार का?
मार्केट एक्सपर्ट्सच्या मते, सोन्याची मूलभूत स्थिती अजूनही मजबूत आहे. मात्र, नजीकच्या काळात किमतींमध्ये मोठी वाढ होण्याऐवजी सोन्याच्या दरात स्थिरीकरण पाहायला मिळू शकते.
जेपी मॉर्गनचा अंदाज काय?
'गुडरिटन्स'च्या वृत्तानुसार, नामांकित वित्तीय संस्था जेपी मॉर्गनने सोन्याच्या दीर्घकालीन किमतींचा अंदाज १५ टक्क्यांनी वाढवून ४,५०० डॉलर प्रति औंस केला आहे. विशेष म्हणजे, २०२६ च्या अखेरपर्यंत हा दर ६,३०० डॉलरपर्यंत जाण्याची शक्यता त्यांनी वर्तवली आहे.
लिक्विडिटी आणि जोखीम: मध्यपूर्वेतील तणावामुळे गुंतवणूकदार इक्विटीसारख्या जोखीम असलेल्या मालमत्तेतून पैसा काढून डॉलर आणि सरकारी बाँड्सकडे वळत आहेत. यामुळे सोन्याच्या दरात चढ-उतार पाहायला मिळत आहेत.
तज्ज्ञांच्या मते, जर जागतिक संघर्ष अधिक वाढला, तर कमोडिटी मार्केटमध्ये मोठी अस्थिरता येईल आणि सोने नवीन उच्चांकी पातळी गाठू शकेल.
महत्वाची टीप: सोन्यातील गुंतवणूक ही जागतिक घडामोडींवर अवलंबून असते. कोणताही मोठा निर्णय घेण्यापूर्वी अधिकृत वित्तीय सल्लागाराचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
-
Devendra Fadnavis : गॅस टंचाईची भीती हा काँग्रेसचा कुटील डाव; देवेंद्र फडणवीसांचा घणाघाती आरोप -
Horoscope Today March 13 2026 : 'या' राशींच्या आयुष्यात आर्थिक लाभ अन् खास बदल, वाचा आजचे राशीभविष्य -
29 वर्षांपूर्वीची दुखापत अन् सक्तीची विश्रांती; केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळांवर शस्त्रक्रिया! -
सोनं झालं स्वस्त! युद्ध असूनही भावात मोठी घसरण का?; वाचा मुंबई, पुणे अन् नागपूरचे आजचे ताजे दर -
PM Kisan 22nd Installment आज कोट्यवधी शेतकऱ्यांच्या खात्यात येणार 2 हजार रुपये; वेळ आणि स्टेटस तपासा -
पालकांकडून मिळालेल्या धड्यांनी माझ्या नेतृत्वाचा दृष्टिकोन घडवला: करण अदानी -
इराण-इस्त्रायल युद्धात उत्तर कोरियाची उडी: इराणवरील हल्ल्याचा निषेध,किम जोंग-उनांनी डागले मिसाईल! -
होर्मुझची कोंडी, युएईचा 'मास्टरस्ट्रोक'; इराण-इस्रायल युद्धाच्या सावटात भारतासाठी नवे ऊर्जा द्वार! -
महिला सक्षमीकरणाचा नवा अध्याय! अदानी फाऊंडेशन भारतातील 10 लाख महिलांना देणार उद्योजकतेचे बळ -
'धुरंधर-2' साठी प्रेक्षकांची तुफान गर्दी; रणवीर सिंहच्या स्पाय-ॲक्शन थ्रिलरचे ॲडव्हान्स बुकिंग सुरू! -
Maharashtra weather update: एकीकडे महाराष्ट्र तापला! दुसरीकडे 'या' ठिकाणी पावसाचा इशारा -
शिवम दुबे-अंजुम खानची 'हटके' लव्हस्टोरी; धर्माची भिंत ओलांडली! शिवमपेक्षा पत्नी वयाने 'एवढी' मोठी







Click it and Unblock the Notifications