IND vs AUS 4th Test : भारत आस्ट्रेलियाकडून 184 धावांनी पराभूत! आता WTC फायनलमध्ये पोहोचणे अवघड!
IND vs AUS 4th Test : टीम इंडियाचा मेलबर्नमध्ये मोठा पराभव झाला आहे. ऑस्ट्रेलियाने 184 धावांनी विजयी मिळवला असून आता आता भारतासाठी WTC फायनलमध्ये पोहोचणे कठीण बनले आहे. भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया चौथ्या कसोटीच्या आजच्या शेवटच्या दिवशी आस्ट्रेलियाने ही कामगिरी केली आहे.
कांगारू 2 विरुद्ध 1 ने आघाडीवर
आता ऑस्ट्रेलियाने बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीतील पाच सामन्यांच्या मालिकेत कांगारू दोन विरुद्ध एक अशी आघाडी घेतली आहे. भारतासाठी अखेरचा कसोटी सामना करा किंवा मरा अशा स्थितीतला असेल. यासह भारताचा जागतिक कसोटी क्रिकेटच्या अंतीम सामन्यातील मार्गात अडथळे आले आहेत.

अखेरच्या दिवशी भारतीय फलंदाजी ढेपाळली
शेवटच्या दिवसाच्या शेवटच्या सत्रात भारतीय फलंदाजी विस्कळीत झाली. या सत्राच्या दोन तासांपेक्षा कमी कालावधीत टीम इंडियाने 7 विकेट गमावल्या आणि सामना गमावला. टीम इंडियाने 340 धावांचे लक्ष्य गाठले होते. भारतीय संघ हे यश मिळवू शकला नाही आणि 155 धावांवर बाद झाला.
हेही वाचा मोठी बातमी..! चॅम्पियन ट्राँफीचे हायब्रीड माँडेल ICC ने स्विकारले, वर्ल्डकपच्या सामन्यांबाबतही घोषणा
विराट, रोहित, राहुल ढेपाळले
शेवटच्या दिवशी ऑस्ट्रेलियाची शेवटची विकेट पडताच भारताला 340 धावांचे लक्ष्य मिळाले आणि त्यानंतर तीच गोष्ट सुरू झाली, ज्यामध्ये या मालिकेत आतापर्यंत घडत आले आहे. अर्थात भारतीय संघ एकामागून एक विकेट्स गमावत होता आणि आस्ट्रेलियन संघाचा उत्साह वाढत गेला. दिग्गज म्हटला जाणारा रोहित शर्मा आणि विराट कोहली आज सपशेल अपयशी ठरले.
हेही वाचा 9 फलंदाजांनी केल्या अवघ्या 9 धावा! 5 जणांना तर भोपळाही फोडता आला नाही! रोहीत, यशस्वी, विराट आज फेल
रोहित शर्माने केवळ 9 धावा केल्या तर के. एल. राहुलने 0 आणि विराट कोहलीने फक्त 5 धावा करत संघाला आणखीनच अडचणीत आणले. यावेळी युवा फलंदाज यशस्वी जैस्वालने आपली जबाबदारी पार पाडली पण त्याला आऊट ज्या पद्धतीने बाद दिले गेले ती गोष्ट रसिकांना खटकली त्याला चुकीच्या पद्धतीने बद घोषित करण्यात आल्याची चर्चा आता क्रिकेट रसिकांमध्ये आहे.
हेही वाचा IND vs SA: संजू सॅमसनने केला विश्वविक्रम, भारतीय संघाने एकाच सामन्यात मोडले अनेक विक्रम
भारताचा धुरंधर फलंदाज यशस्वी जैस्वालची विकेट पडली तेव्हा भारताला 22 षटके आणखी खेळायची होती आणि सामना अनिर्णित राखणे आवश्यक होते त्यावेळी भारताकडे केवळ 3 विकेट्स शिल्लक होत्या. अशा स्थितीत भारताला येथे सामना अनिर्णित ठेवता आला असता, पण यशस्वी जैस्वालच्या विकेटनंतर भारताच्या खालच्या फळीतील (शेवटचे 3 फलंदाजांनी सुमार कामगिरी केली.












Click it and Unblock the Notifications