Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

9 फलंदाजांनी केल्या अवघ्या 9 धावा! 5 जणांना तर भोपळाही फोडता आला नाही! रोहीत, यशस्वी, विराट आज फेल

India vs New Zealand 1st Test : भारतीय संघ आज अवघ्या 46 धावांत गारद झाला. त्यातही यशस्वी जैस्वाल याने संघासाठी 13 धावांचे योगदान दिले तर ऋषभ पंत याने 20 धावांचे योगदान दिले. यानंतर एकही भारतीय फलंदाज दुहेरी आकडा गाठू शकला नाही. हे 9 फलंदाजांना मिळून अवघ्या 9 धावाच करता आल्या. न्युझीलंडच्या गोलंदाजांनी भारतीय फलंदाजांना चांगलेच वर्चस्व गाजत सामन्याच्या पहिल्या डावात पकड मजबूत केली.

भारतीय संघ आणि न्युझीलंड यांच्यात कालपासून पहिल्या कसोटी सामन्याला सुरुवात झाली. पहिला दिवशी पावसाने गाजवला यामुळे खेळ होऊ शकला नाही तर दुसऱ्या दिवशी पहिल्या डावाला सुरुवात झाली. यामुळे भारतीय संघाचे धुरंधर फलंदाज बॅटींगला उतरले.

India vs New Zealand 1st Test
सलामी विरांकडून निराशा

सलामीच्या फलंदाजांनी निराश केली आणि भारताची पहिली विकेट 9 धावांवर रोहीत शर्माच्या रुपात पडली. त्यानंतर संघाची धावसंख्या 9 असतानाच विराट कोहली बाद झाला. सरफराज खान संघाच्या 10 धावा असतानाच बाद झाला म्हणजेच तीन फलंदाज दहा धावांच्या आत तंबूत परतले. यशस्वी जैस्वालच्या रुपात चौथी विकेट पडली. संघाच्या तेव्हा 31 धावा होत्या.

15 धावात भारतीय संघाच्या 6 विकेट्स गमावल्या

यशस्वी जैस्वालनंतर लोकेश राहूल 33 धावा असताना बाद झाला.यानंतर रविंद्र जडेजा संघाच्या 34 धावा असताना बाद झाला. दरम्यान, रविचंद्रन अश्वीलही लगेचच बाद झाला. त्यानंतर ऋषभ पंतने आपली विकेट सोडली आणि तो तंबूत परतला. भारतीय संघाच्या 40 धावा असताना जसप्रित सिंह बुमराह बाद झाला तर कुलदीप यादवच्या रुपात भारतीय संघाची अखेरची विकेट पडली आणि टीम इंडिया अवघ्या 46 धावात ढेपाळली.

9 फलंदाजांची धावसंख्या अशी

रोहीत शर्मा 2,विराट कोहली 0, सरफराज खान 0, के. एल. राहूल 0, रविंद्र जडेजा 0, रविचंद्रन अश्वीन 0, कुलदीप यादव 2, जसप्रीत बुमराह 1 आणि मेहम्मद सिराज याने 4 धावा केल्या. अतिरिक्त धावा 4 म्हणजेच सात फलंदाजांपेक्षा अतिरिक्त धावा भारतीय संघासाठी आजच्या बॅटींगमधील तिसरा मोठा आकडा होता, तर पाच फलंदाज 0 वर बाद झाले.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+