मोठी बातमी..! चॅम्पियन ट्राँफीचे हायब्रीड माँडेल ICC ने स्विकारले, वर्ल्डकपच्या सामन्यांबाबतही घोषणा
पुढील वर्षी म्हणजेच 2025 मध्ये होणाऱ्या चॅम्पियन ट्र्राँफीबाबत पुन्हा एक नवी अपडेट समोर आली आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद म्हणजेच ICC ने हायब्रिड मॉडेलला मान्यता दिली आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्ड PCB व भारतीय क्रिकेट बोर्ड BCCI यांच्यातील करारानंतर हे स्पर्धेचे सामने आता पाकिस्तान आणि दुबईमध्ये आयोजित करण्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. तसेच 2026 च्या T20 विश्वचषकावरही दोन्ही मंडळांनी एकमत केले असून, पाकिस्तान भारताविरुद्धच्या लीग-स्टेजच्या लढतीसाठी भारतात जाणार नाही, त्याऐवजी या दोन्ही संघातले सामने हे कोलंबो येथे होणार आहेत.

चॅम्पियन्स ट्रॉफीचे वेळापत्रक आले
2025 ची चॅम्पियन्स ट्रॉफी 19 फेब्रुवारी ते 9 मार्च या कालावधीत होणार आहे. या स्पर्धेत आठ संघांची दोन गटांमध्ये विभागणी केली जाईल. प्रत्येक गटातील अव्वल दोन संघ उपांत्य फेरीत आणि त्यानंतर अंतिम फेरीत प्रवेश करतील. हा हायब्रिड होस्टिंग फॉरमॅट मागच्या वर्षी पुरुषांच्या ५० षटकांच्या आशिया चषकादरम्यान वापरला गेला होता. तोच आता चॅम्पियन ट्राँफीसाठीही वापरला जाणार आहे. त्यावेळी पाकिस्तानने स्पर्धेचे आयोजन केले होते. मात्र सेमीफायनल आणि फायनलसह भारताचे सामने हे श्रीलंकेत कोलंबोमध्ये झाले होते.
ICC ने स्विकारले हायब्रिड माँडेल
PCB आणि BCCI सोबत झालेल्या करारानंतर ICC ने हायब्रीड मॉडेलमध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी खेळण्यास मान्यता दिली. या स्पर्धेचे सामने पाकिस्तानमधील तीन ठिकाणी होतील. तसेच भारताचे सामने हे दुबईमध्ये खेळवले जातील. त्याशिवाय
2026 मध्ये होणाऱ्या टी-20 विश्वचषक स्पर्धेतील भारत-पाकिस्तान सामन्यासाठी पाकिस्तान हा भारतात जाणार नाही. या दोन्ही संघादरम्यानचा सामना सह यजमान असलेल्या श्रीलंकेत होणार आहे. आयसीसीच्या या मुद्यालाही BCCI आणि PCB तत्त्वत: मान्यता दिली. भारताच्या सामन्यात यजमानपदाची संधी गमावल्याबद्दल पीसीबीला कोणतीही भरपाई दिली जाणार नाही, असेही आयसीसीने स्पष्ट केले. त्या बदल्यात पीसीबीला 2027 नंतर आयसीसी महिला स्पर्धेचे यजमानपद मिळेल, असे सुचविण्यात आले आहे.
भारताचे सामने होतील दुबईमध्ये
अमिराती क्रिकेट बोर्ड परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून होते. भारताचे सामने आता दुबईत आयोजित करणे जवळपास निश्चित झाले आहे. पीसीबीचे अध्यक्ष मोहसीन नक्वी यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान शेहबाज शरीफ यांची भेट घेऊन याबाबत चर्चा केली. आता या स्पर्धेत भारत सहभागी होईल व भारतीय प्रेक्षकांना भारत विरुद्ध पाकिस्तान हा थरार पहायला मिळेल, हे आता स्पष्ट झाले आहे.












Click it and Unblock the Notifications