Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

IND vs SA: संजू सॅमसनने केला विश्वविक्रम, भारतीय संघाने एकाच सामन्यात मोडले अनेक विक्रम

India vs South Africa: दक्षिण आफ्रिकेविरुद्ध जोहान्सबर्ग T20 सामन्यात टीम इंडियासाठी संजू सॅमसन आणि तिलक वर्मा यांनी शतके झळकावली. या दोघांनी मिळून दक्षिण आफ्रिकेचे गोलंदाजांना धो-धो धुतलं आहे. या सामन्यात षटकारांचा पाऊस पाहायला मिळाला आणि अनेक विक्रमही मोडले आहेत.

या मालिकेत संजू सॅमसनने दुसऱ्यांदा शतक झळकावले आहे. टिळक वर्माने सलग दुसरे शतक झळकावून इतिहास रचला. सॅमसनचे हे टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील तिसरे शतक असून तिन्ही शतके या वर्षात झाली आहेत. एका कॅलेंडरमध्ये तीन शतके झळकावणारा तो पहिला खेळाडू आहे.

sanju samson and tilak varma

सर्वात मोठी भागीदारी

सॅमसन आणि टिळक वर्मा यांनी नाबाद 210 धावांची भागीदारी केली. ही भारतासाठी कोणत्याही विकेटसाठीची सर्वोच्च भागीदारी आहे. तसेच दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कोणत्याही विकेटची सर्वोच्च भागीदारी आहे. T20 मध्ये दुसऱ्या विकेटसाठी किंवा त्यापेक्षा कमी धावांची ही सर्वात मोठी भागीदारी आहे. यापूर्वी कोणत्याही संघाने एवढी मोठी भागीदारी केलेली नाही.

सॅमसनचा शतकांचा पराक्रम

एका कॅलेंडर वर्षात तीन शतके झळकावणारा संजू सॅमसन हा जगातील पहिला T20 आंतरराष्ट्रीय फलंदाज ठरला. या वर्षी येथे दोन शतके झळकली आहेत आणि एक बांगलादेशविरुद्ध भारतात शतक झळकावलं आहे. T20 मध्ये भारतासाठी पहिल्यांदाच एका सामन्यात दोन शतके झळकावली आहेत.

षटकार आणि धावांचा नवा विक्रम

जोहान्सबर्गमधील कोणत्याही संघाला एवढी मोठी धावसंख्या उभारता आली नाही. ती भारतीय संघाने सर्वोच्च धावसंख्या केली आहे. परदेशात ही भारताची सर्वोच्च धावसंख्या (283) आहे. याशिवाय आफ्रिकेविरुद्ध कोणत्याही संघाने आतापर्यंत एवढी मोठी धावसंख्या उभा केलेली नाही. वेस्ट इंडिजने 2023 मध्ये 258 धावा केल्या होत्या. एका डावात सर्वाधिक षटकार मारण्याच्या बाबतीत भारतीय संघाने आपला जुना विक्रम मोडला. यापूर्वी 22 षटकारांचा विक्रम होता पण आता तो 23 झाला आहे.

सर्वात वेगवान शतकांच्या यादीत तिलक

तिलक वर्मा भारताच्या त्या खेळाडूंमध्ये सामील झाला आहे. ज्यांनी आंतरराष्ट्रीय T20 मध्ये सर्वात जलद शतक झळकावले आहे. रोहित शर्माने 35 चेंडूत शतक तर संजू सॅमसनने 40 चेंडूत शतक झळकावले आहे. तिलक वर्माने 41 चेंडूत शतक झळकावून या विशेष यादीत स्थान मिळवलं आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+