Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

एकनाथ शिंदेंनी घेतली उपमुख्यमंत्रीपदाची शपथ, CM वरुन डिमोशन होणारे दुसरे नेते, वाचा त्यांचा प्रवास

Eknath Shinde oath ceremony : एकनाथ शिंदे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे. मुख्यमंत्रीपदानंतर उपमुख्यमंत्रीपद स्वीकारणारे ते राज्यातील दुसरे नेते आहेत. महायुतीच्या सरकारचा आज शपथविधी सोहळा पार पडला. यात मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली. तसेच दुसरे उपमुख्यमंत्री म्हणून राष्ट्रवादीचे प्रमुख अजित पवार यांनी शपथ घेतली आहे.

20 नोव्हेंबर रोजी मतदान आणि 23 नोव्हेंबर रोजी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला. त्यानंतर जवळपास 12 दिवसानंतर म्हणजेच आज गुरुवारी (दि.5) महायुतीचा शपथविधी सोहळा पार पडला.

या सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींसह विविध राज्यातील प्रमुख नेत्यांनी हजेरी लावलेली आहे. दरम्यान, महायुतीने राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात निवडणुका लढवल्या. त्यात चांगले यश मिळाले. भाजपला सर्वाधिक जागा मिळाल्याने त्यांचा मुख्यमंत्री झाला तर एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री पदावरुन उपमुख्यमंत्रीपदावर समाधान मानावे लागले. चला तर जाणून घ्या, एकनाथ शिंदे यांची राजकीय कारकिर्द....!

DCM Eknath Shinde

कोपरी पाचपाखाडी एकनाथ शिंदे यांचीच

ठाणे शहरातील कोपरी पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघावरील आपले वर्चस्व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सलग पाचव्या वेळी सिद्ध केले. त्यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार आणि शिवसेना ठाकरे गटाचे नेते केदार दिघे यांचा पराभव केला.

आनंद दिघे यांचा राजकीय वारसा चालवणारे नेते

एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या पाच वर्षात सर्वाधिक चर्चिले जाणारे नाव आहे. एका सामान्य शेतकऱ्याचा मुलगा, रिक्षा चालक, शिवसैनिक, नगरसेवक, गटनेता, आमदार, विरोधी पक्ष नेता, मंत्री आणि मुख्यमंत्री असा थक्क करणारा प्रवास एकनाथ शिंदे यांनी केला आहे. ठाण्याचे माजी जिल्हाप्रमुख धर्मवीर आनंद दिघे यांच्या तालमीत तयार झालेल्या एकनाथ शिंदे यांनी दिघे यांच्या पश्चात ठाणे जिल्ह्यात शिवसेनेचा प्रचंड विस्तार केला. उत्तम संघटक अशी एकनाथ शिंदे यांची ओळख आहे. आनंद दिघे यांच्या पश्चात राजकीय कारकीर्द घडवण्यासाठी त्यांचे पुतणे केदार दिघे इच्छुक होते मात्र दिघे यांच्याकडे उद्धव ठाकरे यांचे दुर्लक्ष झाले.

हे ही वाचा : एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रीपद स्वीकारणार, राजभवनाकडे पत्र पाठवले, आमदारांची मनधरणी आली कामाला

ठाकरेंनी दुजाभावाची वागणूक दिली, अखेर बंड पुकारला

नगर विकास मंत्री असलेल्या एकनाथ शिंदे यांना शिवसेनेत दुजाभावाची वागणूक मिळू लागल्यानंतर त्यांनी बंडाचे हत्यार उपसले. आणि बघता बघता 40 आमदार एकनाथ शिंदे यांच्या पाठीशी उभे राहिले. भाजपच्या पाठिंबावर एकनाथ शिंदे हे शिवसेना भाजपा युतीचे मुख्यमंत्री देखील बनले. शिवसेनेचे चिन्ह आणि शिवसेना हा पक्ष देखील एकनाथ शिंदे यांच्याकडे गेला. लोकसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील गटापेक्षा चांगला स्ट्राइक रेट राखून एकनाथ शिंदे यांनी आपले नेतृत्व सिद्ध केले. त्यांच्या पक्षात नाराजी असली तरी कोणत्याही नेत्याने जाहीरपणे ती व्यक्त केली नाही हे एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाचे यश मानले जाते.

हे ही वाचा : Mahayuti Oath Ceremony : देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री तर एकनाथ शिंदे-अजित पवार बनले उपमुख्यमंत्री

पाचव्यांदा आमदार म्हणून विजयी झाले

2004, 2009, 2014 आणि 2019 अशा सलग चार वेळा एकनाथ शिंदे यांनी कोपरी पाचपाखाडी हा विधानसभा मतदारसंघ जिंकला. मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांची पकड ठाणे पालघर जिल्ह्यावर आणखीनच मजबूत झाली. आनंद दिघे यांच्यामुळेच आपण घडल्याचे एकनाथ शिंदे सर्व व्यासपीठावर मान्य करतात. एकनाथ शिंदे यांचे वर्चस्व मोडून काढण्याचे सर्व ते प्रयत्न उद्धव ठाकरे यांनी केले. ठाणे जिल्ह्यात आनंद दिघे यांना मानणारा मोठा वर्ग आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या विरोधात आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघे यांना उमेदवारी देऊन उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्या विरोधात प्रबळ आव्हान निर्माण करण्याचा प्रयत्न केला. पण एकनाथ शिंदे यांनी केदार दिघे यांचे आव्हान सहज मोडीत काढले. कोपरी पाच पाखाडी विधानसभा मतदारसंघावर एकनाथ शिंदे आणि मिळवलेला हा सलग पाचवा विजय आहे. आनंद दिघे यांच्या वारशाचा प्रश्न देखील एकनाथ शिंदे यांनी या विजयातून सपशेल मोडीत काढला आहे.

हे ही वाचा : महायुती सरकारचा आज शपथविधी! देवेंद्र फडणवीस, शिंदे, अजितदादा यांच्यात सर्वात श्रीमंत कोण? जाणून घ्या

एकनाथ शिंदे सरकारचे काही ठळक निर्णय

एकनाथ शिंदे सरकारने छत्रपती संभाजीनगर येथे मराठवाडा मुक्ती संग्रामाचे भव्य स्मारक उभारण्याची घोषणा केली. तसेच 100 कोटींच्या खर्चासही मान्यता दिली. एवढेच नाही तर औरंगाबादचे नाव छत्रपती संभाजीनगर व उस्मानाबाद शहराचे नाव धाराशिव करण्याचा निर्णयही त्यांच्या सरकारने घेतला. अहमदनगर जिल्ह्यालाही अहिल्यादेवी होळकर यांचे नाव देण्याची घोषणाही महायुती सरकारने केली.

एकनाथ शिंदे सरकारने नागरिकांची निवेदने व पत्रांवर तत्काळ कारवाई करण्यासाठी मंत्रालयात सेंट्रल रजिस्ट्री सुरू केली. ई ऑफिसवर भर दिला. यामुळे प्रशासकीय कामकाजाला वेग मिळाला. त्यांच्या प्रत्येक जिल्ह्यातून किमान 75 हजार लाभार्थ्यांना विविध योजनांचा थेट लाभ देणाऱ्या शासन आपल्या दारी उपक्रमास प्रचंड प्रतिसाद मिळाला. या प्रकरणी त्यांनी राज्यातील बहुतांश जिल्ह्यांत रोजगार मेळावे घेतले.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना

महायुती सरकारने महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली. या योजनेंतर्गत 21 ते 65 वर्ष वयोगटातील पात्र लाभार्थी महिलांना दरमहा 1500 रुपयांचे अर्थसहाय्य दिले जाते. सरकारने ही योजना आगामी विधानसभा निवडणूक डोळ्यापुढे ठेवून सुरू केली. पण यामुळे राज्यातील लाखो गरीब महिलांना थेट लाभ मिळाला.

या योजनेमुळे महायुती सरकारला विशेषतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिमा उंचावण्यात मदत झाली. त्यामुळे ही योजना महायुती सरकारसाठी 'मत'लाभदायी ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

मुलींना मोफत उच्च शिक्षण

शिंदे सरकारने मुलींना मोफत उच्च शिक्षण देण्याचा निर्णय घेतला. या योजनेंतर्गत अभियांत्रिकी, वैद्यकीय आदी व्यावसायिक शिक्षण घेणाऱ्या मुलींना थेट लाभ मिळेल. पर्यायाने यामु्ळे महिला सक्षमीकरणाला बळ मिळेल. सद्यस्थितीत व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये मुलींचे प्रमाण केवळ 36 टक्के आहे. या योजनेमुळे हा टक्का वाढण्याची शक्यता आहे. शिंदे सरकारच्या या योजनेची जनमाणसांत चर्चा झाली.

ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास

महाराष्ट्रात रेल्वेनंतर एसटीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या सर्वात जास्त आहे. त्यामुळे सरकारने एसटीने प्रवास करणाऱ्या महिलांना 50 टक्क्यांची सूट दिली. तसेच ज्येष्ठ नागरिकांनाही प्रवासात 100 टक्के सूट देण्याची घोषणा केली. सरकारच्या या निर्णयाचा गावखेड्यातील गोरगरिबांना थेट लाभ झाला. वाढत्या महागाईत त्यांचा प्रवास खर्च कमी झाला. सरकारच्या या निर्णयामुळे एसटी प्रवाशांच्या संख्येत मोठी वाढ झाली. पर्यायाने डबघाईला आलेल्या एसटी महामंडळालाही हातभार लागण्याची चिन्हे आहेत.

लोकसभा निवडणुकीत समाधानकारक कामगिरी

एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडली. त्यानंतर शिवसेनाही त्यांना मिळाली. यामुळे ठाकरेंविना शिवसेनेचे भविष्य काय? असा प्रश्न उपस्थित केला जात होता. अनेकांनी ठाकरेंशिवाय सेनेला भविष्य नसल्याचा दावा केला. राज्यात तसे वातावरणही तयार झाले. पण एकनाथ शिंदे यांनी लोकसभा निवडणुकीत भाजपची सर्वत्र हाराकिरी होत असताना त्यांनी आपल्या वाट्याला आलेल्या 15 पैकी 7 जागा निवडून आणून दाखवल्या. एकनाथ शिंदेंनी समाजकारण, अर्थकारण अन् सत्ताकारण या तिन्ही गोष्टींची सांगड घातली. त्याचा त्यांना लाभ मिळाला.

'स्ट्राईक रेट'मध्ये ठाकरेंवर मात केल्याचा दावा

शिवसेनेतील बंडखोरीनंतर लोकसभा निवडणुकीतील ठाकरे व शिंदे यांच्यातील लढाईकडे अवघ्या राज्यातील लक्ष लागले होते. या दोन्ही गटांचे शिलेदार 13 जागांवर एकमेकांपुढे उभे टाकले होते. त्यातील 7 जागा एकनाथ शिंदे यांनी आपल्या खिशात घातल्या. विशेष म्हणजे या 7 पैकी काही जागा ठाकरे यांच्या हक्काच्या समजल्या जात होत्या. पण छत्रपती संभाजीनगर व ठाण्यासारख्या मतदारसंघांत ठाकरेंच्या उमेदवारांचा हजारोंच्या मताधिक्याने पराभव झाला. त्यामु्ळे या जागांवरील विजय एकनाथ शिंदे यांना बळ देणारा ठरला आहे. त्यांचा आत्मविश्वास उंचावणारा ठरला.

सकारात्मक राजकारणातून प्रतिमा निर्मिती

मी तुमचा माणूस आहे. आता तुमच्या हक्काचा माणूस मंत्रालयात बसला आहे. त्यामुळे काळजी करू नका. तुम्हाला न्याय देण्याचे काम मी करेन, अशा आश्वासक शब्दांतून एकनाथ शिंदे यांनी आपल्यावरील गद्दारीचा कथित शिक्का पुसण्याचा प्रयत्न केला आहे. त्याचा लाभ त्यांना लोकसभा निवडणुकीतही झाला. थेट लोकांमध्ये मिसळणारा मुख्यमंत्री म्हणून ते राज्यात लोकप्रिय झाले.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+