महायुती सरकारचा आज शपथविधी! देवेंद्र फडणवीस, शिंदे, अजितदादा यांच्यात सर्वात श्रीमंत कोण? जाणून घ्या
Maharashtra CM DCM Oath ceremony : विधानसभा निवडणुकीत मोठे यश मिळवल्यानंतर महायुतीच्या नेत्यांनी 4 डिसेंबरला राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांना 237 आमदारांचे समर्थन असल्याचे पत्र देत सत्ता स्थापनेचा दावा केला आहे. त्यानंतर आज महायुती सरकारचा मुंबईत शिवाजी पार्कवर शपथविधी होणार आहे.
भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीत भाजपचे दिग्गज नेते देवेंद्र फडणवीस यांची विधीमंडळ गटनेता म्हणून निवड करण्यात आली. त्यामुळे देवेंद्र फडणवीस हेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार हे स्पष्ट झाले. आज पंतप्रधान नरेंद्र मोदींसह अनेक दिग्गज नेते महाराष्ट्रातील शपथविधीसाठी हजर राहणार आहेत. आज सायंकाळी साडेपाच वाजता महायुतीतील नेते देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि एकनाथ शिंदे हे शपथ घेतील.

देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री पदाची तर अजित पवार उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. एकनाथ शिंदे हेही उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेऊ शकतात. आज आपण या तिघांच्या संपत्तीपैकी कुणाची किती संपत्ती आणि त्यातच सर्वात जास्त कुणाची आहे हे जाणून घेऊ.
देवेंद्र फडणवीस यांच्याकडे किती मालमत्ता आहे?
नागपूर कर्मभुमी असलेले देवेंद्र फडणवीस यांची सुरुवात नगरसेवकपदापासून झाली. त्यांच्या घरी राजकीय वारसा होता. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या नामांकनासह दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्र 2024 नुसार, त्यांच्याकडे 13.27 कोटी रुपयांची संपत्ती आहे. प्रतिज्ञापत्रात देवेंद्र यांनी 13,27,47,728 रुपयांची चल आणि अचल संपत्ती जाहीर केली आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर 56,07,867 रुपयांची संपत्ती असून त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या नावावर 6,96,92,748 रुपयांची संपत्ती आहे. त्यांच्या एकुलत्या एक मुलीकडे 10,22,113 रुपयांची जंगम मालमत्ता आहे.
एकनाथ शिंदे यांच्याकडे किती मालमत्ता आहे?
मी ऑटोचालक होतो, शेतकऱ्याचा मुलगा असे आपल्या भाषणात सांगणारे एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदापर्यंतचा प्रवास केला. आता ते महाराष्ट्राच्या नव्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्रीपदाची सूत्रे स्वीकारु शकतात. गेल्या वर्षांत स्थापन झालेल्या दोन्ही सरकारमध्ये एकनाथ शिंदे मंत्री राहिले आहेत.
शिंदे यांच्या संपत्तीबद्दल सांगायचे तर 2019 ते 2024 दरम्यान एकनाथ शिंदे यांच्या एकूण संपत्तीत 63.31% वाढ झाली आहे. त्यांची संपत्ती 13 कोटींवरून 38 कोटींवर पोहोचली आहे. शिंदे यांच्या निवडणूक प्रतिज्ञापत्रानुसार शिंदे यांच्याकडे एकूण 37,68,58,150 रुपयांची जंगम आणि जंगम मालमत्ता आहे. 2019 च्या निवडणूक प्रतिज्ञापत्रानुसार, एकनाथ शिंदे यांच्याकडे 11,56,72,466 रुपयांची संपत्ती होती. एकनाथ शिंदे यांच्यावर 5,29,23,410 रुपयांचे कर्ज असले तरीही गेल्या पाच वर्षांत शिंदे यांच्या एकूण संपत्तीत मोठी वाढ झाली आहे.
अजित पवारांची किती मालमत्ता आहे?
महाराष्ट्राच्या नव्या महाआघाडी सरकारमध्ये महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री होणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांनी गेल्या पाच वर्षांत महाराष्ट्रातील दोन्ही सरकारमध्ये मंत्रीपद भूषवले आहे. अजित पवार सलग तिसऱ्यांदा उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. अजित पवार यांच्या एकूण मालमत्तेबद्दल बोलायचे झाल्यास, निवडणूक प्रतिज्ञापत्रानुसार अजित पवार यांच्याकडे एकूण 125 कोटी रुपयांची जंगम आणि जंगम मालमत्ता आहे. अजित पवार यांच्या संपत्तीत गेल्या पाच वर्षात 49 कोटींची वाढ झाली आहे.












Click it and Unblock the Notifications