Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

Mahayuti Oath Ceremony : देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री तर एकनाथ शिंदे-अजित पवार बनले उपमुख्यमंत्री

Maharashtra CM Oath Ceremony : महायुतीच्या वतीने राज्यपालांकडे सत्तास्थापनेचा दावा करण्यात आलेला आहे. त्यानुसार आज (5 डिसेंबर) गुरुवार रोजी सायंकाळी 5.30 वाजता महायुतीचा शपथविधी सोहळा आझाद मैदानावर पार पडणार आहे.

मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार हे शपथ घेणार आहेत. तर शिवसेनेकडून एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार असल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, फडणवीस यांनी बुधवारी रात्री त्यांची भेट घेऊन सरकारमध्ये सहभागी व्हावे, अशी विनंती केली होती. तर या सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची विशेष उपस्थिती राहणार आहे.

Devendra 3 0

राज्यात महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं आहे. भाजप 132 जागा जिंकूण सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. नव्या सरकारमध्ये जुनाच पॅटर्न कायम ठेवण्यात आला आहे. जुन्या पॅटर्ननुसार पुन्हा एकदा राज्यात एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री शपथ घेणार आहेत. आज देवेंद्र फडणवीस यांची भाजप पक्षाच्या विधिमंडळ गटनेतेपदी एकमताने निवड झालेली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शपथविधी सोहळ्यासाठी 22 राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री देखील हजेरी लावणार आहेत. या सोहळ्यासाठी लाडक्या बहिणींना विशेष निमंत्रण देण्यात आलं आहे. समोर आलेल्या माहितीनुसार तब्बल 40 हजार लोक या सोहळ्यासाठी उपस्थित असणार असल्याची माहिती देण्यात आलेली आहे.

5:48 PM, 5 Dec

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अजित पवार यांचे अभिनंदन केले

मुंबई: महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांचे अभिनंदन केले
5:47 PM, 5 Dec

अजित पवार यांनी महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली

राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित पवार यांनी महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली
5:46 PM, 5 Dec

एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली

शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचे अभिनंदन केले
5:44 PM, 5 Dec

देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री

महाराष्ट्राचे 21 वे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांना राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ दिली.
5:38 PM, 5 Dec

देवेंद्र फडणवीस यांनी घेतली महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथ

महाराष्ट्राचे २१ वे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांना राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ दिली.
5:33 PM, 5 Dec

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं व्यासपीठावर आगमन

महाराष्ट्र सरकारच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मुंबईतील आझाद मैदानावर आगमन झाले
5:29 PM, 5 Dec

महाराष्ट्राचे नामनिर्देशित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं व्यासपीठावर आगमन

शपथविधी सोहळ्यासाठी महाराष्ट्राचे नामनिर्देशित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना प्रमुख एकनाथ शिंदे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित पवार, मुंबईतील आझाद मैदानावर
5:27 PM, 5 Dec

महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांचे आझाद मैदानावर आगमन

देवेंद्र फडणवीस यांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथ देण्यासाठी महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांचे आझाद मैदानावर आगमन.
5:24 PM, 5 Dec

महाराष्ट्राचे नामनिर्देशित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना प्रमुख एकनाथ शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार व्यासपीठावर दाखल

शपथविधी सोहळ्यासाठी महाराष्ट्राचे नामनिर्देशित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना प्रमुख एकनाथ शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांचे मुंबईतील आझाद मैदानावर आगमन.
5:22 PM, 5 Dec

महाराष्ट्र सरकारच्या शपथविधीला आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू उपस्थितीत

आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू मुंबईत महाराष्ट्र सरकारच्या शपथविधीला उपस्थित राहण्यासाठी आझाद मैदानावर आले.
5:15 PM, 5 Dec

केंद्रीय मंत्री आणि एनडीए शासित राज्यांचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री महाराष्ट्र शासनाच्या शपथविधी सोहळ्यासाठी दाखल

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि एनडीए शासित राज्यांचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री, एनडीएचे नेते महाराष्ट्र सरकारच्या शपथविधी समारंभाला उपस्थितीत आहेत.
5:02 PM, 5 Dec

देवेंद्र फडणवीस यांनी शपथविधी सोहळ्यापूर्वी आपल्या आईचे आशीर्वाद घेतले

महाराष्ट्राचे पदसिद्ध मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शपथविधी सोहळ्यापूर्वी आपल्या आईचे आशीर्वाद घेतले
5:01 PM, 5 Dec

महाराष्ट्र सरकारच्या शपथविधी सोहळ्याला अभिनेता रणवीर सिंग उपस्थितीत

महाराष्ट्र सरकारच्या शपथविधी सोहळ्याला अभिनेता रणवीर सिंग उपस्थितीत
4:59 PM, 5 Dec

अभिनेता सलमान खान महाराष्ट्र सरकारच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थितीत

मुंबईतील आझाद मैदानावर महाराष्ट्र सरकारच्या शपथविधी सोहळ्याला अभिनेता सलमान खान उपस्थितीत
4:57 PM, 5 Dec

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचं आझाद मैदानावर आगमन

महायुती सरकारच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे मुंबईतील आझाद मैदानावर आगमन
4:56 PM, 5 Dec

प्रसिध्द उद्योगपती मुकेश अंबानी कुटुंबासह महाराष्ट्र सरकारच्या शपथविधीला उपस्थितीत

प्रसिध्द उद्योगपती मुकेश अंबानी त्यांच्या कुटुंबासह महाराष्ट्र सरकारच्या शपथविधीला उपस्थित आहेत.
4:54 PM, 5 Dec

क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर पत्नीसह महायुतीच्या शपथविधी सोहळ्यासाठी दाखल

सचिन तेंडुलकर त्याच्या अंजली आणि आदित्य बिर्ला समुहाचे अध्यक्ष, कुमार मंगलम बिर्ला यांच्यासह महाराष्ट्र सरकारच्या शपथविधी समारंभाला उपस्थित होते.
4:52 PM, 5 Dec

एकनाथ शिंदे यांचा ताफा आझाद मैदानाकडे रवाना

आझाद मैदानावरील शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी शिवसेनेचे एकनाथ शिंदे निवासस्थानावरून रवाना
4:37 PM, 5 Dec

महायुती सरकारच्या शपथविधी सोहळा थोड्याच वेळात होणार सुरुवात

महायुती सरकारच्या शपथविधी सोहळा थोड्याच वेळात होणार सुरुवात, मुंबईतील आझाद मैदानातील दृश्य
4:29 PM, 5 Dec

महाराष्ट्र सरकारच्या शपथविधी सोहळ्यासाठी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव मुंबईत दाखल

महाराष्ट्र सरकारच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव मुंबईत दाखल झाले आहेत
4:26 PM, 5 Dec

लाडकी बहीण ही एक उत्तम योजना- अमृता फडणवीस

शपथविधीच्या अगोदर महाराष्ट्राचे देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस म्हणल्या, "लाडकी बहीण हा एक उत्तम योजना आहे ज्याच्या अंतर्गत महिला देवेंद्रजी आणि महायुतीशी जोडल्या गेल्या..."
4:15 PM, 5 Dec

महाराष्ट्र सरकारच्या शपथविधी सोहळ्यासाठी उत्तर प्रदेशचे योगी आदित्यनाथ यांचे मुंबईत दाखल

महाराष्ट्र सरकारच्या शपथविधी सोहळ्यात सहभागी होण्यासाठी उत्तर प्रदेशचे योगी आदित्यनाथ यांचे मुंबईत आगमन
3:57 PM, 5 Dec

महायुतीच्या शपथविधीसाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा मुंबईत दाखल

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, केंद्रीय मंत्री आणि भाजप अध्यक्ष जेपी नड्डा महायुती सरकारच्या शपथविधीला उपस्थित राहण्यासाठी मुंबईत दाखल झाले आहेत.
3:36 PM, 5 Dec

महायुती सरकारच्या शपथविधीसाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी मुंबईत दाखल

महायुती सरकारच्या शपथविधीला उपस्थित राहण्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी मुंबईत दाखल
3:35 PM, 5 Dec

महायुतीच्या शपथविधीसाठी राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्या मुंबईत दाखल

महायुती सरकारच्या शपथविधीपूर्वी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांचे समर्थक त्यांच्या मुंबईतील निवासस्थानी दाखल
3:13 PM, 5 Dec

एकनाथ शिंदे आज उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार- शिवसेना नेते उदय सामंत

एकनाथ शिंदे आज उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार- शिवसेना नेते उदय सामंत
2:55 PM, 5 Dec

महायुतीच्या शपथविधीसाठी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी मुंबईत दाखल

महाराष्ट्र सरकारच्या शपथविधीला उपस्थित राहण्यासाठी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी मुंबईत दाखल झाले आहेत.
2:35 PM, 5 Dec

एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार

एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार, शिवसेना आमदारांची मनधरणी यशस्वी
2:29 PM, 5 Dec

महायुतीच्या शपथविधीसाठी उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी मुंबईत दाखल

उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी म्हणाले, "येथे महायुती आघाडीला बहुमत मिळाले आहे. मी फडणवीसजींचे अभिनंदन करतो. इथले डबल इंजिन सरकार चांगले काम करेल."
2:14 PM, 5 Dec

महायुती सरकारच्या शपथविधीसाठी ओडिशाचे मुख्यमंत्री मोहन चरण माझी मुंबईत दाखल

महायुती सरकारच्या शपथविधीला उपस्थित राहण्यासाठी ओडिशाचे मुख्यमंत्री मोहन चरण माझी आणि उपमुख्यमंत्री प्रवती परिदा मुंबईत दाखल
READ MORE

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+