देवेंद्र फडणवीस आज होणार CM, आतापर्यंत 21 जण झाले मुख्यमंत्री, ते कोण? वाचा संपूर्ण यादी
Maharashtra CM list : महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री म्हणून आज (5 डिसेंबर) गुरुवारी भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस शपथ घेत आहेत. महाराष्ट्रातील आतापर्यंत 20 नेत्यांना हे भाग्य लाभले आहे. देवेंद्र फडणवीस यांची ही तिसरी टर्म आहे.
पहिली टर्म 2014 ते 2019 पुर्ण केल्यानंतर दुसरी टर्म अगदी औटघटकेची होती केवळ 5 दिवस ते मुख्यमंत्री होते, 23 नोव्हेंबर 2019 ते 28 नोव्हेंबर 2019 हा जेमतेम काळ होता. 23 नोव्हेंबर2019 रोजी पहाटे महाराष्ट्र साखरझोपेत असताना अत्यंत गोपनीय पद्धतीने अजित पवार यांच्याशी संधान साधून त्यांनी पहाटेचा शपथविधी म्हणून वाईटपद्धतीने गाजला.

आता मोठ्या सन्मानपुर्वक मोठ्या धडाक्यात 5 डिसेंबर 2024 रोजी त्यांचा तिसऱ्यांदा मुख्यमंत्री म्हणून शपथविधी होत आहे. ते 21 अशा व्यक्तीमधील एक आहेत, ज्यांना मुख्यमंत्री होण्याचे भाग्य लाभले आहेत. आज आपण हे 21 मुख्यमंत्री झालेल्या भाग्यवान व्यक्ती कोण आहेत हे जाणून घेऊया.
हेही वाचा : Maharashtra CM : देवेंद्र फडणवीसांबाबत विचारले जातात 'हे' 8 प्रश्न, काय आहेत याची उत्तरे? जाणून घ्या
महाराष्ट्रातील आजवरचे मुख्यमंत्री
- यशवंतराव चव्हाण हे महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री होते. ते कराड उत्तर मतदारसंघातून निवडून आले होते.
- १ मे १९६० ते २० नोव्हेंबर १९६२ या २ वर्षे, २०३ दिवसांच्या कालावधीत ते मुख्यमंत्री होते.
- मारोतराव कन्नमवार हे महाराष्ट्राचे दुसरे मुख्यमंत्री होते. त्यांनी सावोली या मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व केले होते. २० नोव्हेंबर १९६२ ते २४ नोव्हेंबर १९६३
- यादरम्यान १ वर्ष, ४ दिवसांचा कालावधी त्यांचा सीएमप पदाचा होता.
- बाळासाहेब सावंत हे महाराष्ट्राचे तिसरे मुख्यमंत्री होते. चिपळूण हा त्यांचा मतदारसंघ होता. ते २५ नोव्हेंबर १९६३ ते ५ डिसेंबर १९६३ या कालावधीत केवळ १० दिवस मुख्यमंत्री राहीले.
- वसंतराव नाईक हे महाराष्ट्राचे चौथे मुख्यमंत्री होते. पुसद हा त्यांचा विधानसभा मतदारसंघ होता. ५ डिसेंबर १९६३ ते १ मार्च १९६७ या कालावधीत आणि १ मार्च १९६७ यानंतर १ मार्च १९६७ ते १३ मार्च १९७२ आणि १३ मार्च १९७२ ते २१ फेब्रुवारी १९७५ असे तब्बल ११ वर्षे आणि ७८ दिवस ते मुख्यमंत्री राहीले.
- शंकरराव चव्हाण हे राज्याचे पाचवे मुख्यमंत्री होते. भोकर हा त्यांचा मतदारसंघ होता. २१ फेब्रुवारी १९७५ ते १७ मे १९७७ या काळात २ वर्षे, ८५ दिवस ते मुख्यमंत्री राहीले.
- वसंतराव दादा पाटील हे राज्याचे सहावे मुख्यमंत्री होते. १७ मे १९७७ ते ५ मार्च १९७८ तर ५ मार्च १९७८ ते १८ जुलै १९७८ या काळात १ वर्ष, ६२ दिवस ते मुख्यमंत्री राहीले.
- शरद पवार हे राज्याचे सातवे मुख्यमंत्री ठारले. बारामती हा त्यांचा मतदारसंघ, १८ जुलै १९७८ ते १७ फेब्रुवारी १९८० या १ वर्ष, २१४ दिवसांच्या काळात ते मुख्यमंत्री होते.
- अब्दुल रहमान अंतुले म्हणजेच ए. आर. अंतुले हे राज्याचे आठवे मुख्यमंत्री होते. त्यांचा श्रीवर्धन हा मतदारसंघ होता. ९ जून १९८० ते २१ जानेवारी १९८२ असा १ वर्ष, २२६ दिवस त्यांचा कार्यकाळ होता.
- बाबासाहेब भोसले हे महाराष्ट्राचे नववे मुख्यमंत्री ठरले. नेहरूनगर हा त्यांचा मतदारसंघ होता. २१ जानेवारी १९८२ ते २ फेब्रुवारी १९८३ असा १ वर्ष, १२ दिवस त्यांचा कार्यकाळ होता.
- वसंतराव दादा पाटील पुन्हा मुख्यमंत्री झाले. त्यांचा सांगली हा मतदारसंघ होता, २ फेब्रुवारी १९८३ ते ३ जून १९८५ असा २ वर्षे, १२१ दिवस त्यांचा कार्यकाळ होता.
- शिवाजीराव निलंगेकर हे दहावे मुख्यमंत्री होते. निलंगा हा त्यांचा मतदारसंघ होता. ३ जून १९८५ ते १२ मार्च १९८६ असा त्यांचा २८२ दिवसांचा कार्यकाळ होता.
- शंकरराव चव्हाण पुन्हा एकदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. यावेळी ते विधान परिषदेवर निवडून आले होते. १२ मार्च १९८६ ते २६ जून १९८८ असा २ वर्षे, १०६ दिवस त्यांचा कार्यकाळ होता.
- शरद पवार बारामतीतून विधानसभा निवडणुकीत निवडून आल्यानंतर २६ जून १९८८ ते ४ मार्च १९९० अशा २ वर्षे, ३६४ दिवसांच्या कालावधीसाठी मुख्यमंत्री होते. तर ४ मार्च १९९० ते २५ जून १९९१ आणि ६ मार्च १९९३ ते १४ मार्च १९९५ अशा २ वर्षे, ८ दिवस दरम्यान ते मुख्यमंत्री होते.
- सुधाकरराव नाईक हे राज्याचे अकरावे मुख्यमंत्री होते. पुसद हा त्यांचा मतदारसंघ होता. २५ जून १९९१ ६ ते मार्च १९९३ असा १ वर्ष, २५४ दिवस त्यांचा कार्यकाळ होता.
- मनोहर जोशी हे राज्याचे बारावे मुख्यमंत्री होते. दादर त्यांचा मतदारसंघ होता. १४ मार्च १९९५ ते १ फेब्रुवारी १९९९ असा ३ वर्षे, ३२४ दिवस त्यांचा कार्यकाळ होता.
- नारायण राणे हे राज्याचे तेरावे मुख्यमंत्री ठरले. ते मालवण मतदारसंघातून निवडून आले होते. १ फेब्रुवारी १९९९ ते १८ ऑक्टोबर १९९९ असा २५९ दिवस त्यांचा कार्यकाळ होता.
- विलासराव देशमुख हे राज्याचे चौदावे मुख्यमंत्री होते. लातूर शहर हा त्यांचा मतदारसंघ होता. १८ ऑक्टोबर १९९९ ते १८ जानेवारी २००३ असा ३ वर्षे, ९२ दिवस त्यांचा कार्यकाळ होता.
- सुशीलकुमार शिंदे हे राज्याचे पंधरावे मुख्यमंत्री होते. सोलापूर दक्षिण त्यांचा मतदारसंघ, १८ जानेवारी २००३ ते १ नोव्हेंबर २००४ असा १ वर्ष, २८८ दिवस त्यांचा कार्यकाळ होता.
- विलासराव देशमुख पुन्हा एकदा मुख्यमंत्री झाले १ नोव्हेंबर २००४ ते ८ डिसेंबर २००८ असा त्यांचा ४ वर्षे ३७ दिवसांचा कार्यकाळ होता.
- अशोक चव्हाण हे राज्याचे सोळावे मुख्यमंत्री ठरले. भोकर हा त्यांचा मतदारसंघ होता. ८ डिसेंबर २००८ ते ७ नोव्हेंबर २००९ असा त्यांचा १ वर्ष, ३३८ दिवस कार्यकाळ होता.
- पृथ्वीराज चव्हाण हे राज्याचे सतरावे मुख्यमंत्री होते. विधान परिषदेवर ते निवडून आले होते. ११ नोव्हेंबर २०१० ते २८ सप्टेंबर २०१४ असा ३ वर्षे, ३२१ दिवस त्यांचा कार्यकाळ होता.
- देवेंद्र फडणवीस हे राज्याचे अठरावे मुख्यमंत्री होते. नैऋत्य नागपूर हा त्यावेळी त्यांचा मतदारसंघ होता. ३१ ऑक्टोबर २०१४ ते १२ नोव्हेंबर २०१९ असा ५ वर्षे, १२ दिवस त्यांचा कार्यकाळ होता.
- उद्धव ठाकरे हे राज्याचे एकोनावीसावे मुख्यमंत्री होते. विधान परिषदेवर ते निवडून आले होते. २८ नोव्हेंबर २०१९ ते ३० जून २०२२ असा त्यांचा २ वर्षे, २१४ दिवसांचा कार्यकाळ होताय
- एकनाथ शिंदे हे राज्याचे विसावे मुख्यमंत्री ठरले. कोपरी-पाचपाखाडी हा त्यांचा मतदारसंघ असून ३० जून २०२२ ते ४ डिसेंबर २०२४ असा त्यांचा २ वर्षे १५७ दिवस कार्यकाळ होता. नुकताच त्यांनी राजीनामा दिला आहे.
- महाराष्ट्राचे २१ वे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस पुन्हा एकदा राज्याचे मुख्यमंत्री म्हणून आज शपथ घेत आहेत. यावेळी दक्षिण-पश्चिम नागपूर हा त्यांचा मतदारसंघ असून ५ डिसेंबर २०२४ म्हणजेच आजपासून त्यांचा कार्यकाळ सुरु होत आहे.
हेही वाचा : महायुती सरकारचा आज शपथविधी! देवेंद्र फडणवीस, शिंदे, अजितदादा यांच्यात सर्वात श्रीमंत कोण? जाणून घ्या












Click it and Unblock the Notifications