Maharashtra CM : देवेंद्र फडणवीसांबाबत विचारले जातात 'हे' 8 प्रश्न, काय आहेत याची उत्तरे? जाणून घ्या

Maharashtra CM Oath update : देवेंद्र फडणवीस हे नाव सध्या महाराष्ट्रात खूपच चर्चेत आहे. विधानसभा निवडणुकीनंतर महायुतीला मोठे बहुमत प्राप्त झाले. भाजपने 132, शिवसेना (शिंदे गट) 57 तर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार ) ने 41 जागा जिंकल्या. भाजपने इतिहासात कधी नव्हे एवढ्या जागा या निवडणुकीत मिळवल्या. या निवडणुकीत भाजप एकहाती विजयाच्या समीप येऊन पोहचला. या कामगिरीत महत्वाची भूमिका देवेंद्र फडणवीस यांनी पार पाडली म्हणूनच त्यांची सध्या चर्चा खूप आहे.

महाराष्ट्रात गेल्या दहा ते बारा दिवसांत मोठी खलबतं झाली. मुख्यमंत्री कोण होणार याचीही चर्चा झडली. आता देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री होणार हे अंतीम झाल्याने ही चर्चा थांबली आहे. मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस तिसऱ्यांदा विराजमान उद्या होतील. उद्या 5 डिसेंबर रोजी शिवाजी पार्कवर ते मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील.

Maharashtra CM Oath update

देवेंद्र फडणवीस यांच्यासंबंधी वारंवार विचारले जाणाऱ्या प्रश्न आणि त्यांची उत्तरे

देवेंद्र फडणवीस यांच्यावर गुन्हा दाखल आहे का?

होय, देवेंद्र फडणवीस यांच्यावर 4 गुन्हेगारी खटले आहेत.

देवेंद्र फडणवीस यांची जन्मतारीख काय आहे?

देवेंद्र फडणवीस यांची जन्मतारीख 22 जुलै 1970 आहे.

देवेंद्र फडणवीस यांची संपत्ती किती?

देवेंद्र फडणवीस यांची एकूण संपत्ती 13 कोटींहून अधिक आहे.

देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी कोण आहेत?

अमृता रानडे या देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी आहेत, सासरचे आडनाव फडणवीस हे आहे.

देवेंद्र फडणवीस कोणत्या पक्षाचे आहेत?

देवेंद्र फडणवीस हे भारतीय जनता पक्षाचे आहेत.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण होणार आहेत?

देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार आहेत.

देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे कितवे उपमुख्यमंत्री होते?

2022 पासून देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री होते. त्यांनी महाराष्ट्राचे 9 वे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली होती.

देवेंद्र फडणवीस यांची एकूण संपत्ती?

देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या नामांकनासह दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्र 2024 नुसार, त्यांच्याकडे 13 कोटी रुपयांपेक्षा जास्त संपत्ती आहे. प्रतिज्ञापत्रात देवेंद्र यांनी 13,27,47,728 रुपयांची चल आणि अचल संपत्ती जाहीर केली आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर 56,07,867 रुपयांची संपत्ती असून त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या नावावर 6,96,92,748 रुपयांची संपत्ती आहे. त्यांच्या एकुलत्या एक मुलीकडे 10,22,113 रुपयांची जंगम मालमत्ता आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+