Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

देवेंद्र फडणवीस तिसऱ्यांदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री! नगरसेवक ते CM, जाणून घ्या संपूर्ण जीवनगाथा

Maharashtra CM Devendra Fadnavis : भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीत भाजपचे दिग्गज नेते देवेंद्र फडणवीस यांची विधीमंडळ गटनेता म्हणून आज निवड करण्यात आली. याचबरोबर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण होणार हा सस्पेन्स आता संपला आहे. कारण विधीमंडळ गटनेता हा मुख्यमंत्री होत असतो असा आतापर्यंतचा महाराष्ट्रातील पायंडा आहे आणि असेच सर्व भारतात होते. त्यामुळे आता देवेंद्र फडणवीस उद्या मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत.

नागपूर कर्मभुमी असलेले देवेंद्र फडणवीस यांची सुरुवात नगरसेवकपदापासून झाली. त्यांच्या घरी राजकीय वारसा होता, तो त्यांना पुढे घेऊन गेला. महाराष्ट्राच्या नवीन सरकारचा शपथविधी सोहळा 5 डिसेंबर 2024 रोजी मुंबईतील आझाद मैदानावर होणार आहे आणि देवेंद्र फडणवीस शपथ घेऊन आता तिसऱ्यांदा मुख्यमंत्री होत आहेत. आज आपण नगरसेवक ते मुख्यमंत्री असा देवेंद्र फडणवीस यांचा राजकीय प्रवास जाणून घेणार आहोत.

Maharashtra CM Devendra Fadnavis

देवेंद्र फडणवीस यांची जीवनगाथा

देवेंद्र फडणवीस फडणवीस हे नागपुरातील मध्यमवर्गीय, पुरोगामी कुटुंबातील आहेत. त्यांचे सुरुवातीचे शिक्षण नागपूरमध्ये झाले. त्यांनी कायद्याची पदवी, व्यवसाय व्यवस्थापनातील पदव्युत्तर पदवी आणि DSE बर्लिनमधून प्रकल्प व्यवस्थापनातील डिप्लोमा केला आहे. हनुमान प्रसारक मंडळाची शाळेला त्यांच्या जीवनात मोठे स्थान आहे. येथे ते संस्कारासह बऱ्याच गोष्टींचे धडे गिरवले.

राजकीय कारकीर्द

1992 मध्ये नागपूर महानगरपालिकेचे नगरसेवक म्हणून निवडून आल्यापासून सुरू झाली आणि सलग दोन वेळा त्यांनी काम केले. ते भारतातील दुसरे सर्वात तरुण महापौर आणि नागपूरचे सर्वात तरुण महापौर ठरले. विशेष म्हणजे, 'मेयर इन कौन्सिल' म्हणून पुन्हा निवडून आलेले ते एकमेव व्यक्ती होते आणि त्यांनी दोनदा या पदावर काम केले.

Maharashtra CM Devendra Fadnavis

पाचवेळा विधानसभेवर निवडून आले

  • देवेंद्र फडणवीस सलग पाच वेळा महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य म्हणून निवडून आले आहेत आणि लोकनेते म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली आहे. भाजपच्या अंतर्गत, फडणवीस वॉर्ड संयोजक ते भाजप महाराष्ट्र अध्यक्ष बनले.
  • 2020-21 मध्ये केरळ राज्य प्रभारी आणि केरळ, बिहार आणि गोवा निवडणूक प्रभारी म्हणूनही त्यांनी महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत.
  • महाराष्ट्रातील ऐतिहासिक 2014 आणि 2019 लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचे नेतृत्व फडणवीस यांनी केले. त्यांच्या नेतृत्वाखाली, महाराष्ट्र विधानसभा निवडणुका तसेच अनेक ग्रामीण आणि शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढवल्या गेल्या आणि जिंकल्या गेल्या
  • आर्थिक बाबींची सखोल जाण असलेल्या, पक्षीय स्तरावर त्यांचा आदर करतात. त्यांनी विधिमंडळाच्या विविध विषय समित्या, स्थायी समित्या आणि संयुक्त निवड समित्यांवर काम केले आहे. त्यांना कॉमनवेल्थ पार्लमेंटरी असोसिएशनचा सर्वोत्कृष्ट संसदपटू पुरस्कारही मिळाला आहे.

देवेंद्र फडणवीस यांचे वैयक्तिक जीवन

  • पूर्ण नाव - देवेंद्र फडणवीस जन्मतारीख - 22 जुलै 1970 (वय 54)
  • जन्म ठिकाण - नागपूर,
  • पक्ष - भारतीय जनता पक्ष
  • शिक्षण- पदवीधर व्यवस्थापन, कायद्यात पदवी
  • व्यवसाय-राजकारण
  • वडिलांचे नाव-गंगाधर फडणवीस
  • आईचे नाव-सरिता फडणवीस
  • पत्नीचे नाव - अमृता फडणवीस - रानडे
  • पत्नीचा व्यवसाय- सहयोगी उपाध्यक्ष, ॲक्सिस बँक
  • मुलं - मुलगी दिविजा फडणवीस
  • वेबसाइट http://www.devenderfadnavis.in

देवेंद्र फडणवीस यांची शैक्षणिक पात्रता

देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर विद्यापीठातून इ.स.2919 मध्ये एलएलबी केले. पदवी यानंतर त्यांनी बिझनेस मॅनेजमेंटमध्ये पदव्युत्तर पदवी मिळवली. याशिवाय, त्याच्याकडे DSE बर्लिनमधून प्रोजेक्ट मॅनेजमेंट मेथड्स आणि टेक्निक्समध्ये डिप्लोमा आहे.

राजकीय जीवनातील महत्वाचे टप्पे

  • महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत 2024 मध्ये, देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर दक्षिण पश्चिम जागेवर 1 लाख 29 हजार 401 मते मिळवली आणि काँग्रेसचे प्रफुल्ल विनोदराव गुडधे यांचा 39 हजार 710 मतांनी पराभव केला.
  • 2022: देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली.
  • 2019: 23 नोव्हेंबर रोजी देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार यांच्या पाठिंब्याने त्यांनी सरकार स्थापन केले. मात्र तीन दिवसांनी त्यांनी पुन्हा राजीनामा दिला.
  • 2019: देवेंद्र फडणवीस नागपूर दक्षिण पश्चिम विधानसभा मतदारसंघातून पुन्हा निवडून आले. त्यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे डॉ. आशिष देशमुख यांचा 49,344 मतांनी पराभव केला.
  • 2014: फडणवीस यांनी त्यांची नागपूर दक्षिण पश्चिम जागा कायम ठेवली. तेव्हा त्यांनी प्रफुल्ल विनोद गुडधे (पाटील) यांचा पराभव केला. भाजपच्या विजयानंतर, फडणवीस यांनी भाजपच्या वतीने 31 ऑक्टोबर 2014 रोजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली.
  • 2013: फडणवीस यांची महाराष्ट्र भाजपच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली.
  • 2010: महाराष्ट्र भाजपच्या सरचिटणीस म्हणून नियुक्ती.
  • 2009: यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी दक्षिण पश्चिम नागपूरमधून निवडणूक लढवली आणि पुन्हा विधानसभा निवडणूक जिंकली. त्यांनी काँग्रेसचे विकास पांडुरंग ठाकरे यांचा पराभव केला.
  • 2004: फडणवीस यांनी नागपूर पश्चिममधून राज्य विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार देशमुख रणजितबाबू यांचा 17 हजार 610 मतांनी पराभव केला.
  • 2001: देवेंद्र फडणवीस भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष झाले.
  • 1999: ते नागपूर पश्चिममधून महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य म्हणून निवडून आले. त्यांनी काँग्रेसचे अशोक धवड यांचा अवघ्या 9 हजार 87 मतांनी पराभव केला.
  • 1997 : त्यांची पुन्हा नागपूर महानगरपालिकेच्या महापौरपदी नियुक्ती झाली.
  • 1992: वयाच्या 22 व्या वर्षी ते नागपूर महानगरपालिकेचे महापौर झाले.
Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+