रिलमेकर्स व्हिडिओग्राफरने पहलगाम हल्ल्याचा कसा अन् कोणत्या स्थितीत काढला व्हिडिओ? जाणून घ्या

Pahalgam Terror Attack : पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याने सारा देश सुन्न आहे. या हल्ल्यात जवळपास 26 भारतीयांचा मृत्यू झाला. या दुःखात सारा देश आहे. या दहशतवाद्यांना समर्थन देणाऱ्या पाकिस्तानविरोधात भारताने कारवाई सुरु केली आहे.

दरम्यान, पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा व्हिडिओ पाहून तर आपण सारे निःशब्द आहोत, पण हा व्हिडिओ जरी आपल्याला निःशब्द करत असला तरीही हा व्हिडिओ ज्याने काढला त्याने तो कसा काढला हा प्रश्न अनेकांना सतावत आहे. हा व्हिडिओ काढल्यामुळेच या हल्ल्याची तिव्रता आणि अतिरेक्यांची हिन पातळी समोर आली आहे.

Pahalgam Terror Attack

घटनास्थळाचे छायाचित्र, जिथे नंतर भारतीय सैन्य दाखल झालेले असताना..

पहलगामच्या बैसरन येथे हल्ला

पहलगाम हे गाव जम्मू काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यातील आहे. या ठिकाणातील बैसरन कँम्प आहे याला मिनी स्विर्झलँड म्हणून ओळखले जाते. याच ठिकाणी अनेक पर्यटक भेटी देतात. पहलगाम येथे ज्यावेळी हल्ला झाला तेव्हा तिथे पर्यटक त्यांच्या पर्यटनाचा आनंद घेत होते तेव्हा अचानक हल्ला झाला.

कसा काढला हल्ल्याचा व्हिडिओ?

बैसरन खोऱ्यात आलेल्या पर्यटकांचे व्हिडिओ काढण्याचे काम एक स्थानिक व्हिडिओग्राफर होते.जेव्हा हा व्हिडिओग्राफर पर्यटकांचा झाडावरुन व्हिडिओ काढत होता, तेव्हा अचानक गोळीबार सुरु झाला. त्यानंतर व्हिडिओग्राफर झाडावर होता, त्याने झाडावरुनच खाली गोळीबार सुरु असताना आणि रक्तपात घडत असतानाचा व्हिडिओ काढला.

एनआयएसाठी महत्वाचा पुरावा अन् साक्षीदारही मिळाला

आता ज्या व्हिडिओग्राफरने या हल्ल्याचे चित्रण केले तो व्हिडिओ एनआयएसाठी महत्वाचा पुरावा ठरला आहे. तर व्हिडिओ काढणारा प्रत्यक्षदर्शी साक्षीदार त्यांना यामुळे लाभला आहे.

व्हिडिओमुळे घटनाक्रमही उलगडणार

व्हिडिओ ग्राफर ज्यावेळी व्हिडिओ काढत असतो त्यावेळी व्हिडिओचा टाईमिंगही कॅमेरा दर्शवतो किंवा त्यात ती व्यवस्था असते. त्यामुळे हल्ला नेमका कोणत्या वेळी झाला आणि घटनाक्रमही लावण्यास मदत मिळणार आहे.

घटनास्थळी एके 47 आणि एम 4 ची काडतुसं सापडली

प्राप्त माहितीनुसार हल्ल्यानंतर घटनास्थळाहून हल्लेखोर जरी पळून गेले तरीही एनआयएच्या तपासात घटनास्थळी एके 47 आणि एम 4 रायफल्सचे रिकामे काडतुसं सापडली आहेत. गुप्तचर संस्थांचे म्हणणे आहे की, हे शस्त्र अफगाण संपल्यानंतर ही शस्त्र पाकिस्तानी दहशतवादी वापरत आहेत.

हेही वाचा : 'पाकिस्तान को नानी याद आएगी!' भारताने एक पाऊलं उचललं तर अवघ्या 300 मिनिटांत 3 लाख लोक झाले कंगाल!

हेही वाचा : Pakistan News एकही युद्ध जिंकलं नाही, मग पाकिस्तान त्यांच्या सैनिकांना पदके कशासाठी देतो? घ्या जाणून

हेही वाचा : जे पाकिस्तानी नागरिक भारतातून निघून गेले नाही त्यांच्यावर काय होईल कारवाई? किती असते शिक्षा? वाचा

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+