जे पाकिस्तानी नागरिक भारतातून निघून गेले नाही त्यांच्यावर काय होईल कारवाई? किती असते शिक्षा? वाचा
What action can be taken against Pakistani who do not leave India : पहलगाममध्ये झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यात 26 भारतीयांना मारण्यात आले, भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध आणखीनच बिघडले आहे. पहलगाम हल्ला असो की, यापुर्वीचे कोणतेही हल्ले पाकिस्तानने दहशतवाद्यांना पोसलेले आहे हे सर्वश्रूत आहे, अशा स्थितीत भारताने पहलगाम हल्ल्यानंतर सिंधू जलकरार संपुष्टात आणला आहे. यासह दहशतवाद्यांच्या घरांना लक्ष्य केले आहे.
यादरम्यान पाकिस्तानी नागरिकांना दोन दिवसांत देश सोडण्याचे आदेश 22 एप्रिलला देण्यात आले होते. SAARC व्हिजा धारकांनाही 26 एप्रिलपर्यंत भारत सोडा असे आदेश देण्यात आले आहे तर मेडीकल व्हिजावर आलेल्यांना 29 एप्रिलपर्यंत देश सोडावा हे सांगण्यात आले आहे. त्यात बऱ्यांच पाकिस्तानी नागरिकांनी भारत सोडला आहे, पण काही पाकिस्तानी नागरिक भारतात असू शकतात, जर या पाकिस्तानी नागरिकांना पाकिस्तानात परत जा हे सांगूनही ते जर गेले नाही आणि भारतातच आढळून आले तर अशांवर काय कारवाई होऊ शकते, त्यांना शिक्षा होऊ शकते का आणि शिक्षेची तरतूद काय असते हे आपण जाणून घेऊया.

भारत न सोडणाऱ्या पाकिस्तान्यांवर काय होऊ शकते कारवाई?
जर भारत सोडा असे सांगूनही भारतातच पाकिस्तानी नागरिक वास्तव्य करत असेल तर ते बेकायदेशीर आहे असे समजले जाते, कारण भारत सरकारने विशिष्ट प्रकरणी हे आदेश दिलेले आहेत. पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून ही भारताची कृती आहे आणि राष्ट्रीय सुरक्षेत कोणत्याही स्थितीत तडजोड होत नसते. त्यामुळे पाकिस्तानी जर भारतात व्हिजावरही आले असेल तर त्यांचा व्हिजा रद्द करता येतो. भारताने तातडीने यासंदर्भात कारवाई केलेली आहे आणि देशात पर्यटन आणि तत्सम कामासाठी आलेल्या पाकिस्तान्यांचे व्हिजा रद्द केल्या आहेत.
जर पाकिस्तानी भारतात आढळले तर दोषींसाठी काय असते शिक्षेची तरतूद?
सर्वप्रथम आम्ही तुम्हाला सांगतो की, जर परत पाकिस्तानात निघुन जा हे सांगूनही पाकिस्तानी दिलेल्या मुदतीनंतर भारतात राहीले तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई होते. अशा पाकिस्तानी नागरिकांना अटक केली जाऊ शकते, त्यानंतर त्यांच्यावर कायदेशीर खटला भरला जाऊ शकतो.
कलम 3 नुसार, तरतुदींचे जे उल्लंघन करुन बेकायदा राहत असतील तसेच व्हिजा संपल्यानंतर राहत असतील किंवा भारत सरकारने भारत सोडण्याचे निर्देश दिले असतील पण भारतातच थांबलेले विदेशी नागरिकांवर कायदेशीर कारवाई होते. याशिवाय (ख) कलम 17 आणि 19 च्या तरतुदीचे उल्लंघन करत असतील तर अशांवर 3 वर्ष तुरुंगवास किंवा 3 लाख रुपयापर्यंत दंड किंवा दोन्हीही अशी शिक्षा होऊ शकते.
कुणाकुणाला भारतातून जावे लागणार?
केंद्र सरकारने 22 एप्रिलला दिलेल्या आदेशानंतर आता पाकिस्तानच्या सर्वच नागरिकांना दिलेल्या मुदतीत पाकिस्तान सोडावा लागणार आहे. त्यात सामान्य नागरिकांपासून ते उद्योजक,सिने कलाकार, गायक, पत्रकार, ट्रांजिट, संमेलनासाठी आलेले, गिर्यारोहक, विद्यार्थी, पर्यटक, समुह पर्यटक, तिर्थयात्री आणि समुह तीर्थयात्री व्हिजावर आलेल्या नागरिकांचा समावेश होतो.












Click it and Unblock the Notifications