'पाकिस्तान को नानी याद आएगी!' भारताने एक पाऊलं उचललं तर अवघ्या 300 मिनिटांत 3 लाख लोक झाले कंगाल!
Pakistan Stock Market News : भारताशी पाकिस्तानने अनेकवेळा पंगा घेतला आहे आणि त्यात पाकिस्तानला पराभवाचा सामना करावा लागला. जागतिक पातळीवरही पाकिस्तानचा बुरखा फाटला आहे. तरीही हा देश भारताच्या नादी लागण्याचा प्रयत्न वारंवार करत आहे. दहशतवादाला पोसणाऱ्या पाकिस्तानने कितीही कांगावा केला तरीही तोच या वृत्तीला पोसतो आणि पाठबळही देतो याचे पुरावेही भारताने वारंवार जगाला दाखवले आहेत. अशातच पहलगाम हल्ला झाल्यानंतर आता पाकिस्तान पुन्हा एकदा उघडा पडला आहे.
पहलगाम येथे दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानचा माजी क्रिकेट खेळाडूने पाकिस्तान जर या हल्ल्यात सहभागी नाही तर पाकच्या राष्ट्राध्यक्ष किंवा पंतप्रधानांनी पहलगाम हल्ल्याची निंदा का केली नाही असे म्हटले होते. त्यानंतर अनेक गोष्टींमुळे पाकिस्तानवर संशयाचे ढग निर्माण झालेले आहेत.

अशातच भारताने पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी काही रणनीती आखली आणि पाकिस्तानविरोधात भारताचे एक पाऊलही पुरेसे आहे आणि भारताने पाऊल उचलताच त्यांचे तीन लाख लोक दहा तासांतच कंगाल झाले आहेत. पाकिस्तानचे तब्बल तीन लाख लोक अवघ्या तीनशे मिनिटांतच कंगाल होणे ही सोपी गोष्ट नाही नेमका हा प्रकार काय आहे? हे आपण समजून घेऊया.
कराची शेअर बाजारात घसरण
28 एप्रिल 2025 रोजी शेअरबाजारात प्रचंड घसरण झाली आहे. कराची स्टाॅक एक्सचेंज आज घसरण होऊन बंद झाला. सकाळी बाजारात तेजी होती पण नंतर तो एकदा का पडला तर वधारलाच नाही. केएसई आज सकाळी साडेदहा वाजता सुमारे 1200 अंकांनी वाढून 116,658.95 अंकांच्या उच्चांकावर पोहोचला, त्यानंतर 100 अंकांनी झपाट्याने घसरला आणि 1,478.40 अंकांनी घसरून 113,990.95 अंकांवर बंद झाला अन् आज फारच नुकसानदायक ठरला.
50 हजार कोटी पाकिस्तानी रुपयांचे नुकसान
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानचा शेअर बाजारात पडझड सुरु आहे, भारत आणि पाकिस्तान यांच्यात सुरु असलेल्या संघर्षाचा परिणाम कराची शेअर बाजारावर होत आहे. भारताने पाकिस्तानविरोधात पाऊले उचचली याचाच परिणाम कराची स्टाॅक एक्स्चेंजवर झाला.
टीव्ही 9 भारतवर्षच्या वृत्तानुसार, शेअर बाजार उघडल्यानंतर 35 मिनिटांत शेअर बाजार वधारला त्यानंतर शेअर बाजारचा निर्देशांक असा कोसळला की, पाकिस्तानचे 3 लाख लोक कंगाल झाले, जवळपास 50 हजार कोटी पाकिस्तानी रुपयांचे नुकसान पाहायला मिळाले. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, पाकिस्तानच्या शेअर बाजाराची अशीच काही दिवस स्थिती राहीली तर भारताशी पंगा घेतल्याचा त्यांना आर्थिकष्ट्या पश्चताप होऊ शकेल.
भारतीय शेअर बाजारात तेजी
एकीकडे पाकिस्तानी शेअर बाजारात घसरण आणि पडझड झाली असतानाच भारतीय शेअर बाजारात कमालीची तेजी आहे. भारतीय शेअर बाजारातील निर्देशांक 1005.84 अंकांनी वधारुन बंद झाला. ही लक्षणीय तेजी आज पाहायला मिळाली आहे. निफ्टीही 289.15 अंकांच्या तेजीनंतर बंद झाला.












Click it and Unblock the Notifications