Pakistan News एकही युद्ध जिंकलं नाही, मग पाकिस्तान त्यांच्या सैनिकांना पदके कशासाठी देतो? घ्या जाणून
What awards and medals does Pakistan give to its army : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानसोबत भारताचे संबंध आणखीनच कटू झाले आहेत, भारताने या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून काही ठोस निर्णय घेतले आहेत, तर पाकिस्तानला भारत आपल्यावर हल्ला करेल अशी शक्यता वाटते. अशातच आता एक गोष्ट भारतीय नागरिकांना खटकत आहे, ती म्हणजे भारताशी पंगा घेणारा पाकिस्तान आतापर्यंत एकही युद्ध जिंकला नाही मग त्यांना पदके पाकिस्तान का देतेय अन् कशासाठी?
आम्ही या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला देणार आहोत. एकीकडे भारत आणि पाकिस्तान यांच्यात तीन युद्ध झाली त्यातील अलिकडचे म्हणजे कारगील युद्ध या युद्धात भारताने पाकिस्तानचा पराभव केला होता. पाकिस्तानने हार पत्करली. त्याआधी दोन युद्ध झाली त्यातही पाकिस्तानला भारताने चारीमुंड्या चित केले होते. एवढी अद्दल घडली असतानाही पाकिस्तानने आपला जो कुरापतीचा मुळ स्वभाव सोडलेला नाही.

अशा स्थितीत पाकिस्तानने एकही युद्ध जिंकले नाही मग त्यांच्या सैनिकांचे शौर्य काय असे सर्वांनाच वाटते. हे वाटणे स्वाभावीक आहे. भारतात परमवीर चक्र, अशोक चक्र असो की, आणखी काही पदके ती सैन्यातील अधिकाऱ्यांना आणि अतुलनिय योगदान देणाऱ्या सैनिकांना दिले जाते. मग पाकिस्तानातही अशी पदकं खरंच दिली जातात का तर त्याचे उत्तर होय हे आहे.
पुरस्कार का दिले जातात?
भारतासारखीच स्थिती पाकिस्तानात आहे. पदके किंवा पुरस्कार हे युद्धाच्या परिणामांवर आधारित नसून सैनिकांचे बलिदान आणि त्यांचे शौर्य किंवा शौर्य लक्षात घेऊन दिले जातात, हे आधी आपण समजून घ्यायला हवे. जोपर्यंत युद्ध जिंकण्याचा प्रश्न आहे, अशी अनेक युद्धे आहेत, ज्यात कोणताही निर्णय झाला नाही, म्हणून पाकिस्तानही ते साजरे करतो आणि त्याबद्दल आपल्या सैनिकांचा सन्मान करतो.
कशासाठी दिले जातात पुरस्कार?
भारताने सण 1999 पासून आतापर्यंत एकही युद्ध लढलेले नाही. तरीही भारतीय लष्कर सैनिकांना शांततेतील योगदान अथवा इतर योगदानासाठी पदके देत आहे, पाकिस्तानातही असेच होते. पाकिस्तानी लष्कराने 1948, 1965, 1971 च्या युद्धांव्यतिरिक्त बलुचिस्तानमधील 1970 च्या ऑपरेशन, सियाचीन वाद, कारगिल युद्ध, शिया बंड, अंतर्गत बाबींसाठी आपल्या सैनिकांना पुरस्कार देते.
युद्धासाठीच नव्हे अन्य मोहिमांसाठीही देतात पुरस्कार
भारताप्रमाणेच पाकिस्तानी सैन्यांना युद्धासाठीच नाही तर अनेक मोहिमा ज्या लष्कराने राबवलेल्या असतात, त्यात मोहिमांसाठी सैनिकांना पदके दिली जातात. आता आपण पाहुया पाकिस्तानात भारतासारखे कोण-कोणते पुरस्कार आपल्या सैनिकांना देतो..
- भारतात परमवीर चक्र हा सर्वात महत्वाचा सन्मान आहे, तसाच पाकिस्तानमधील सर्वात महत्त्वाचा लष्करी पुरस्कार निशान-ए-हैदर. शत्रूच्या हद्दीत त्यांच्या हजेरीदरम्यान दाखवलेल्या शौर्याबद्दल हा पुरस्कार दिला जातो.
- भारतात दुसऱ्या क्रमांकाचा लष्करी पुरस्कार हा अशोक चक्र आणि महावीर चक्र हा आहे तर पाकिस्तानात हिलाल-ए-जुरत आहे.
- भारतात तिसऱ्या क्रमांकाचा लष्करी पुरस्कार हा वीर चक्र आहे तर पाकिस्तानात तिसरा क्रमांकाचा पुरस्कार सितारा-ए-जुरत हा आहे.
- भारतात चौथ्या क्रमांकाचा लष्करी पुरस्कार हा किर्ती चक्र आहे तर पाकिस्तानात चौथा क्रमांक तमघा-ए-जुरत आणि चौथा क्रमांक इम्तियाजी सनद आहे.
- पाकिस्तानात बिगर मोहिमांच्या पुरस्कारात सितारा-ए-बिसलत, तमघा-ए-बिसलत, तमघा-ए-खिदमत वर्ग 1, तमघा-ए-खिदमत वर्ग 2, आदी पुरस्काराचा समावेश आहे.












Click it and Unblock the Notifications