Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

चार दिवसांपासून देशात मृत्यूचा तांडव; आधी विमान नंतर हेलिकॉप्टर अन् आता पुण्यात कोसळला पूल!

4 big accidents in india Last 4 Days, bridge collapse pune Maharashtra News : संपूर्ण भारतावर मागील चार दिवसांपासून शोककळा पसरली आहे. होय, हे अगदी सत्य आहे, कारण गेल्या चार दिवसांपासून भारताच्या विविध भागांमध्ये अपघाताच्या मोठ्या घटना घडल्या आहेत.

सर्वात आधी सर्वात मोठा अपघात हा अहमदाबाद विमानतळावर घडला, यात तब्बल पावणे तिनशे लोक मृत्यूमुखी पडले. त्यानंतर केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळले. यातही 7 लोकांचा मृत्यू झाला.

महाराष्ट्रासाठी आज ब्लॅक संडे!

विमान, हेलिकॉप्टर अपघाताच्या घटनेनंतर आज महाराष्ट्रासाठी ब्लॅक संडे ठरला आहे. कारण, अहिल्यानगर जिल्ह्यात भीषण अपघात घडला यात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला तर आठ लोक जखमी झाले. तर रविवारी दुपारी पुण्यातील मावळ-कुंडमळा येथील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला, यात अनेकांना आपला जीव गमवावा लागला. तर अजूनही शोधकार्य सुरू आहे. दरम्यान, गेल्या चार दिवसांपासून देशावर शोककळा पसरली आहे. वरील चारही घटनांचा आढावा या लेखात घेणार आहोत..!

4 big accidents in india

12 जून : अहमदाबादमध्ये विमान कोसळले!

पहिला सर्वात मोठा अपघात (12 जून 2025) रोजी एअर इंडियाचे विमान कोसळले, ज्यामध्ये 270 लोकांचा मृत्यू झाला. अपघात इतका भीषण होता की, लोकांचे मृतदेहाची ओळख पटविण्यासाठी त्यांच्या नातेवाईकांसोबत डीएनए घ्यावे लागत आहेत. ही घटना विसरत नाही तोच आज, रविवारी म्हणजेच 15 जून 2025 रोजी केदारनाथजवळ एका हेलिकॉप्टरला अपघात झाला. तसेच मथुरा येथे आणखी एक मोठा अपघात झाला, जिथे अनेक लोक घरांच्या ढिगाऱ्याखाली दबले गेल्याची भीती आहे. त्याच वेळी महाराष्ट्रात देखील पूल कोसळल्याची घटना घडली.

हे ही वाचा : संडे इज ब्लॅक डे! आधी हेलिकॉफ्टर कोसळलं, त्यानंतर घोटी मार्गावर भीषण अपघात, मृतांचा आकडा गेला 10वर!

15 जून : पुण्यात पूल कोसळला, 2 मृतदेह काढले!

रविवारी (15 जून ) महाराष्ट्रातील पुण्यात इंद्रायणी नदीवर बांधलेल्या पुलाचा अर्धा भाग कोसळला. पूल कोसळला तेव्हा त्याच पुलावर अनेक लोक उपस्थित होते. अशा परिस्थितीत, सुमारे 23 ते 30 लोक नदीत वाहून गेल्याची भीती आहे. घटनास्थळावरून दोन मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. तर बचावकार्य सुरू आहेत.

पुण्यातील मावळ येथील कुंडमळा येथे पूल कोसळल्याने काही पर्यटक बुडाले आहेत. ही घटना दुपारी साडे तीन वाजेच्या सुमारास घडली. कोसळलेल्या पुलाच्या भागात दगड होते. दगडांवर पडलेल्या लोकांना गंभीर दुखापत झाली आहे. त्याच वेळी अनेक लोक नदीच्या प्रवाहात वाहून गेले आहेत.

हे ही वाचा : केदारनाथमध्ये हेलिकाॅफ्टर कोसळले! 6 जणांच्या मृत्यूची शक्यता अहमदाबाद विमान अपघातानंतर दुसरी घटना

15 जून : उत्तराखंडमध्ये हेलिकॉप्टर अपघात!

केदारनाथहून गुप्तकाशीला येणारे हेलिकॉप्टर रविवारी म्हणजेच आज (15 जून) कोसळले, ज्यामध्ये 7 जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये एका 2 वर्षाच्या मुलाचाही समावेश आहे. तर या अपघातातील मृतांमध्ये महाराष्ट्रातील तिघांचा समावेश आहे.

15 जून : मथुरा येथे मोठी दुर्घटना

रविवारी मथुरा येथील गोविंद नगर येथे मोठी दुर्घटना घडली. शाहगंज दरवाजा परिसरात डोंगर कोसळल्याने ५ घरे कोसळली. घर कोसळल्याने आत राहणारे लोक आणि जवळच्या बांधकामाधीन भिंतीवर काम करणाऱ्या मजुरांसह डझनभर लोक ढिगाऱ्यात अडकले.

हे ही वाचा : Pune News : इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला, 5 जण ठार; 25 ते 30 लोक वाहून गेले, चिमुकल्यांचाही समावेश!

15 जून : अहिल्यानंगरमध्ये ट्रक-ट्रॅव्हल्सचा अपघात!

संगमनेर तालुक्यात रविवारी पहाटेच्या सुमारास खासगी ट्रॅव्हल्स बस आणि ट्रकमध्ये भीषण अपघात झाल्याची बातमी समोर आली आहे. कोकणगाव शिवारातील कोल्हार-घोटी राज्यमार्गावर ही घटना घडली. या अपघातात तिघांचा मृत्यू झाला, तर सात ते आठ जण जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघात इतका भीषण होता की, दोन्ही वाहनांच्या पुढील भागाचा चेंदामेंदा झाला.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+