Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

केदारनाथमध्ये हेलिकाॅफ्टर कोसळले! 6 जणांच्या मृत्यूची शक्यता अहमदाबाद विमान अपघातानंतर दुसरी घटना

Helicopter crashes in Kedarnath : अहमदाबादेत विमान दुर्घटनेनंतर अपघाताचे सत्र थांबले नसून आता केदारनाथ येथे हेलिकाॅफ्टर कोसळल्याची घटना घडली आहे. या हेलिकाॅफ्टरमध्ये सहा जण प्रवास करत होते आणि या सहा जणांचा मृत्यू झाल्याची भिती व्यक्त केली जात आहे.

उत्तराखंडमधील देहरादूनहून हे हेलिकाॅफ्टर केदारनाथला जात होते. हे हेलीकॉप्टर आधी गौरीकुंड परिसरात बेपत्ता झाले, त्यानंतर ते कोसळल्याची माहिती समोर आली आहे. विशेषतः प्रवासादरम्यान हे हेलीकॉप्टर त्रिजुगीनारायण आणि गौरीकुंडदरम्यान बेपत्ता झाले आहे, असे उत्तराखंडचे कायदा सुव्यवस्था अतिरिक्त महासंचालक डॉ. वी. मुरुगेशन यांनी सांगितल्याचे एनआयच्या वृत्तात आहे. सविस्तर माहितीची थोडी प्रतिक्षा आहे.

Helicopter crashes in Kedarnath


दरम्यान, उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी ट्विट केले की, "रुद्रप्रयाग जिल्ह्यात झालेल्या हेलिकॉप्टर अपघाताबद्दल खूप दुःखद बातमी मिळाली आहे. एसडीआरएफ, स्थानिक प्रशासन आणि इतर बचाव पथके मदत आणि बचाव कार्यात गुंतलेली आहेत. मी सर्व प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी बाबा केदारकडे प्रार्थना करतो."

पहाटे साडेपाच वाजता अपघात

आज रविवारी 15 जून रोजी सकाळी आर्यन कंपनीचे हेलिकॉप्टर केदारनाथहून फाटा येथे उड्डाण करत होते, परंतु गौरीकुंड परिसरात त्याचा अपघात झाला. हेलिकॉप्टर अपघाताचे कारण खराब हवामान असल्याचे सांगितले जात आहे,पण अद्याप अधिकृत खात्री झालेली नाही.

हेलिकॉप्टर नोडल अधिकारी राहुल चौबे आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी नंदन सिंह राजवार यांनी अपघाताची खात्री केली आहे. ही घटना पहाटे साडेपाच वाजता घडल्याचे सांगितले जात आहे. गौरीकुंडवर गवत कापताना नेपाळी वंशाच्या महिलांनी अपघाताची माहिती दिली.

काय म्हणाले पोलिस महासंचालक

उत्तराखंडमधील केदारनाथ येथे घडलेल्या दुर्घटनेबद्दल पोलिस महासंचालक राजीव स्वरुप गढवाल यांनी एनआयला सांगितले की, भाविकांना घेऊन गेल्यानंतर अपघातग्रस्त हेलिकॉप्टर गौरीकुंडकडे निघाले होते. त्यात सात जण होते. ज्या ठिकाणी ही दुर्घटना घडली ती जागा खूपच दुर्गम आहे. पोलिस आणि एसडीआरएफ पथके घटनास्थळी रवाना झाली आहेत, तेथे बचावकार्य सुरु आहे.

यापुर्वी 8 मे 2025 रोजी घडली होती हेलिकाॅफ्टर दुर्घटना

आजच्या अपघातापुर्वी 8 मे 2025 रोजी उत्तराखंडमधील उत्तरकाशी जिल्ह्यात हेलिकॉप्टर क्रॅश झाल्याची दुर्घटना घडली होती. गंगोत्री धामलगत हा अपघात घडला होता. त्यानंतर पोलिस प्रशासन घटनास्थळी पोहोचले तसेच आपत्ती व्यवस्थापन पथकाने बचावकार्य तातडीने सुरू केले होते. तेव्हा माहितीनुसार, हेलिकाॅप्टरमध्ये सात जण होते, त्यापैकी 5 जणांचा जागीच मृत्यू झाला होता.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+