Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

Pune News : इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला, 5 जण ठार; 25 ते 30 लोक वाहून गेले, चिमुकल्यांचाही समावेश!

Pune Latest News, Pune River Bridge Collapses : पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातून अतिशय धक्कादायक घटना समोर आली आहे. तळेगाव दाभाडे शहराजवळील प्रसिद्ध पर्यटनस्थळ कुंडमळा येथे इंद्रायणी नदीवर असलेला (Indrayani River Bridge Collapses) जूना पूल कोसळला आहे.

त्यामध्ये अनेक पर्यंटक इंद्रायणी नदीमध्ये बुडाले असून 25 ते 30 जण वाहून गेल्याची भीती देखील व्यक्त केली जात आहे. यात काही चिमुकल्यांचाही समावेश असल्याचे सांगितले जात आहे.

तर आतापर्यंत या घटनेमध्ये 5 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. तर मृतांचा आकडा पुन्हा वाढू शकेल, अशीही शक्यता स्थानिक प्रशासनाकडून सांगण्यात आली. परंतु, मृतांच्या आकड्याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही, परंतु घटनास्थळावरील लोकांकडून मृतांबाबत सांगितले जात आहे.

kundmala indrayani river bridge collapses

कुंडमळ्यात पर्यटकांची पावसाळ्यात असते गर्दी

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील मावळमध्ये कुंडमळ्यात पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पर्यटक गर्दी करतात. त्यातच या ठिकाणचा पूल कोसळला. ही घटना रविवारी दुपारी साडे तीन वाजेच्या सुमारास घडली आहे. घटनास्थळी पिंपरी- चिंचवड पोलीस आयुक्तालयातील तळेगाव दाभाडे पोलिस दाखल झाले आहेत. कुंडमळा नदी ओलांडण्यासाठी, या बाजूवरून दुसऱ्या बाजूला जाण्यासाठी पूल आहे. हाच पूल कोसळल्याने मोठी समस्या निर्माण झालेली आहे.

kundmala indrayani river bridge collapses

रविवार असल्याने पर्यटकांची मोठी गर्दी

रविवार असल्याने मोठ्या संख्येने पर्यटक त्या ठिकाणी उपस्थित होते. काही जण पुलावर उभारले होते. तेव्हा हा पूल कोसळल्याने ही दुर्घटना घडली आहे. यामध्ये नेमके किती जण बुडाले आहेत हे अद्याप स्पष्ट होऊ शकलं नाही. अंदाजे 20 ते 25 जण बुडाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.

पर्यटकांच्या सुरक्षेसाठी कोणतीही उपाययोजना नाही

कुंडमळा हे ठिकाण पर्यटनस्थळ असून हे ठिकाण धोकादायक असल्याचं सांगितले जाते. पावसाळ्यात, विशेषतः शनिवार आणि रविवारी या ठिकाणी पर्यंटक मोठी गर्दी करतात.

या ठिकाणी नदीवर जुना पूल आहे. त्याचीही डागडूजी करण्यात आलेली नाही, असं असलं तरी प्रशासनाने त्यांच्या सुरक्षेसाठी कोणतीही उपाययोजना केलेली नाही. त्यामुळेच ही दुर्घटना घडल्याचे सांगितले जात आहे.

kundmala indrayani river bridge collapses

पुणे परिसरात चार दिवसांपासून जोरदार पाऊस!

पुणे परिसरात गेल्या चार दिवसांपासून मोठ्या प्रमाणात पाऊस पडला आहे. त्यामुळे इंद्रायणी नदीच्या पाण्याचा प्रवाहही मोठा आहे. असं असूनही पर्यटकांच्या सुरक्षेसाठी कोणतीही उपाययोजना करण्यात आली नाही.

कसा घडला अपघात?

दरवर्षी पावसाळ्यात कुंडमळा या प्रसिद्ध पर्यटनस्थळी पर्यटकांची मोठी गर्दी असते. याठिकाणी असणारा पूल जूना आहे. त्यामुळं पुलाची क्षमता ही कमकुवत झाली होती असे दिसत असल्याची माहिती मिळत आहे. अनेक पर्यटक या भागात फोटो घेत होते. एकाच वेळी अनेक पर्यटक पुलावर आल्यानं ही दुर्दैवी घटना घडली असल्याची माहिती देण्यात येत आहे. यामध्ये 20 ते 25 पर्यटक नदीत वाहून गेल्याची माहिती मिळाली आहे.

स्थानिक पोलीस, ग्रामस्थ घटनास्थळी दाखल

दरम्यान, घटनेची माहिती मिळाल्यानंतर स्थानिक पोलीस, ग्रामस्थ आणि आपदा मित्र यांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. बचावकार्य सुरू करण्यात आले आहे. एनडीआरएफची टीम देखील घटनास्थळी दाखल झाली आहे. दोन दिवसांपासून मावळ परिसरात मुसळधार पाऊस कोसळत असल्याने इंद्रायणीच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. दरम्यान, सध्या नदीत पडलेल्या पर्यटकांना वाचवण्याचे शर्तीचे प्रयत्न यंत्रणांकडून केले जात आहे.

kundmala indrayani river bridge collapses

सुप्रिया सुळे या घटनेवर काय म्हणाल्या?

अपघाताची घटना घडल्यानंतर स्थानिक लोक व प्रशासनाकडून मदत केली जात आहे. या घटनेवर खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्या म्हणाल्या की, आता सरकारने तातडीने मदत करणे गरजेचं आहे. प्रशासनाने घटनास्थळी तातडीने जाऊन मदत करावी असे मत खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केले.

याबाबत पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांशी मी चर्चा केल्याची माहिती सुळे यांनी दिली आहे. प्रशासन पूर्ण सक्रिय झाल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्याचे सुप्रिया सुळे म्हणाल्या.

दुसरी बाब म्हणजे, पूल जर धोकादायक असेल तर तो बंद करणं गरजेचं होतं असेही सुळे म्हणाल्या. पण आत्ता तातडीने पूर्ण ताकतीने मदत करणे आवश्यक असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

जीर्ण झालेल्या पुलावर गरजेपेक्षा जास्त लोक होते

प्राथमिक माहितीनुसार, हा पूल आधीच खूपच वाईट आणि जीर्ण अवस्थेत होता. अपघाताच्या वेळी पुलावर क्षमतेपेक्षा जास्त पर्यटक होते आणि त्यावरून जड मोटारसायकलीही वाहून नेल्या जात होत्या. पुलाच्या ढिगाऱ्यातून बचाव पथकाला एक दुचाकीही सापडली आहे. पुलावरून वाहने जात होती.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+