Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

संडे इज ब्लॅक डे! आधी हेलिकॉफ्टर कोसळलं, त्यानंतर घोटी मार्गावर भीषण अपघात, मृतांचा आकडा गेला 10वर!

Ahilyanagar Sangamner accident news : संडे इज ब्लॅक डे, याचा अर्थ असा की, आजचा दिवस उजाडल्यानंतर देशात विविध ठिकाणी अपघाताच्या घटनांच्या बातम्या समोर आल्या. रविवारी सकाळी उत्तराखंडमधील केदारनाथ धाम येथे झालेल्या हेलिकॉप्टर अपघातात 7 जणांचा मृत्यू झाला आहे.

गौरीकुंडजवळून हेलिकॉप्टर जात असताना पहाटे 5.20 वाजता ही घटना घडली. पोलिस, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (एनडीआरएफ) आणि राज्य आपत्ती प्रतिसाद दल (एसडीआरएफ) च्या पथके तात्काळ घटनास्थळी पोहोचली, मुख्यमंत्री धामी यांनीही या भयानक दुर्घटनेबद्दल तीव्र शोक व्यक्त केला आहे.

Ahilyanagar Sangamner accident news

एकीकडे ही घटना ताजी असतानाच त्याच्या काही तासांतच महाराष्ट्रातील संगमनेर तालुक्यातील कोल्हार-घोटी राज्य महामार्गावर देखील भीषण अपघात झाला आहे. यामध्ये तीन जणांचा जागीच मृत्यू झाला. तर जखमींची संख्या देखील मोठी आहे.

खासगी बस अन् ट्रकची धडक; तिघे ठार, 8 जखमी

संगमनेर तालुक्यात रविवारी पहाटेच्या सुमारास खासगी ट्रॅव्हल्स बस आणि ट्रकमध्ये भीषण अपघात झाल्याची बातमी समोर आली आहे. कोकणगाव शिवारातील कोल्हार-घोटी राज्यमार्गावर ही घटना घडली. या अपघातात तिघांचा मृत्यू झाला, तर सात ते आठ जण जखमी झाले आहेत.

जखमींना उपचारासाठी नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघात इतका भीषण होता की, दोन्ही वाहनांच्या पुढील भागाचा चेंदामेंदा झाला.

खासगी ट्रॅव्हल्स जात होते शिर्डीकडे!

मिळालेल्या माहितीनुसार, एक खासगी ट्रॅव्हल्स शिर्डीकडे जात होती. कोकणगाव शिवारात निझर्णेश्वर महादेव फाट्याजवळ आल्यानंतर समोरून येणाऱ्या आंब्याची वाहतूक करणाऱ्या एका ट्रकसोबत जोरदार धडक झाली. या अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला असून, सात ते आठ जण जखमी झाले आहेत. अपघाताची भीषणता इतकी होती की, ट्रक आणि ट्रॅव्हल्सच्या पुढील भागाचा अक्षरशः चक्काचूर झाला.

मृत आणि जखमींची अशी आहेत नावे!

या भीषण अपघातात प्रवीण सोपान कांदळकर (वय 28, राहणार सुकेवाडी, संगमनेर), फिरोज लाला शेख (वय 46 राहणार कासारा दुमला, संगमनेर), अंजुम प्रवीण वालमीकी (वय 39, पानिपत हरियाणा) यांचा मृत्यू झाला आहे.

तर हर्षिता सोनु वाल्मीक, पूनम बिर्ला, सोनिया बिर्ला, रिया चावरिया, ऐश्वर्या चंद्रशेखर पाटील, लता सुरेश चक्रनारायण (सर्व राहणार मुंबई), प्रथमेश राजेंद्र कोल्हे (पोहेगाव, ता. कोपरगाव), मोहम्मद रफिक शेख (नाईकवाडापुरा, संगमनेर) हे गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर संगमनेर येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

अपघातामुळे वाहतूक ठप्प

घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. स्थानिकांच्या मदतीने जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

या अपघातामुळे कोल्हार-घोटी राज्यमार्गावरील वाहतूक काही काळासाठी ठप्प झाली होती, त्यामुळे रस्त्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+