Overthinking Control : अतीविचारानं डोकं दुखतंय? टेन्शन आणि ओव्हरथिंकिंगवर 'हे' 6 पदार्थ आहेत उपाय
Diet tips to stop overthinking and reduce stress : आजच्या धावपळीच्या जीवनात शारीरिक स्वास्थ्यासोबतच मानसिक आरोग्य टिकवून ठेवणे मोठे आव्हान बनले आहे. कामाचा ताण आणि चुकीच्या जीवनशैलीमुळे अनेकजण 'ओव्हरथिंकिंग' म्हणजेच अतिविचाराच्या जाळ्यात अडकतात. तज्ज्ञांच्या मते, आपण काय खातो याचा थेट परिणाम आपल्या मेंदूवर आणि विचारांवर होत असतो. जर तुम्हीही छोट्या-छोट्या गोष्टींवरून ताण घेत असाल, तर तुमच्या आहारात काही विशिष्ट पदार्थांचा समावेश करून तुम्ही मानसिक शांती मिळवू शकता.

ओव्हरथिंकिंग आणि स्ट्रेस कमी करणारे 'सुपरफूड्स'
डार्क चॉकलेट (Dark Chocolate)
डार्क चॉकलेट केवळ चवीलाच नाही तर मनाला प्रसन्न ठेवण्यासाठीही उत्तम आहे. यात असलेले अँटी-ऑक्सिडंट्स शरीरात 'सेरोटोनिन' आणि 'एंडोर्फिन' सारख्या 'हॅप्पी हार्मोन्स'ची पातळी वाढवतात, ज्यामुळे ताण कमी होतो.
ड्राय फ्रूट्स आणि बिया
सूर्यफुलाच्या बिया, कोहळ्याच्या बिया, बदाम आणि अक्रोड यामध्ये झिंक, मॅग्नेशियम आणि ओमेगा-३ फॅटी ॲसिड मुबलक प्रमाणात असते. हे घटक मानसिक थकवा दूर करण्यास मदत करतात.
अंडी (Eggs)
अंड्यांमध्ये मॅग्नेशियम आणि अमिनो ॲसिड असते. हे घटक मेंदूला आतून आनंदी ठेवण्यास आणि मूड सुधारण्यास मदत करतात.
कॉफी (Coffee)
ताण कमी करण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे एक कप कॉफी. यातील कॅफिन मेंदूला सक्रिय करते आणि 'डोपामाइन' हार्मोन वाढवून झटपट फ्रेश वाटते.
दही (Curd)
दह्यामध्ये असलेल्या प्रोबायोटिक्सचा थेट संबंध आपल्या मानसिक स्वास्थ्याशी असतो. हे नैराश्य आणि अस्वस्थता, चिंता कमी करण्यास मदत करते.
स्ट्रॉबेरी आणि ब्लूबेरी
स्ट्रॉबेरी आणि ब्लूबेरीमध्ये मोठ्या प्रमाणात अँटी-ऑक्सिडंट्स असतात, जे अतिविचारामुळे शरीरावर येणारा ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस कमी करतात.
-
विश्वविजेत्या इंडियाचे 'बाप्पा'ला साकडे! सिद्धिविनायकाच्या चरणी T20 वर्ल्डकप ट्रॉफीसह गंभीर-सूर्या! -
अदानी समूहाचा मोठा निर्णय: देशात उभारणार 300 शाळा, 30 रुग्णालये; 60 हजार कोटींची गुंतवणूक -
Devendra Fadnavis : गॅस टंचाईची भीती हा काँग्रेसचा कुटील डाव; देवेंद्र फडणवीसांचा घणाघाती आरोप -
Horoscope Today March 13 2026 : 'या' राशींच्या आयुष्यात आर्थिक लाभ अन् खास बदल, वाचा आजचे राशीभविष्य -
आजचे राशिभविष्य 15 मार्च 2026 : 'या' राशींच्या नशिबात राजयोग! कोणाला मिळणार पैसा आणि कोणाला यश? वाचा -
IPL 2026 : मैदानावरचा शेवटचा 'हेलिकॉप्टर शॉट'? आयपीएलनंतर धोनीसह 'हे' 5 दिग्गज घेणार निवृत्ती -
29 वर्षांपूर्वीची दुखापत अन् सक्तीची विश्रांती; केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळांवर शस्त्रक्रिया! -
सोनं झालं स्वस्त! युद्ध असूनही भावात मोठी घसरण का?; वाचा मुंबई, पुणे अन् नागपूरचे आजचे ताजे दर -
PM Kisan 22nd Installment आज कोट्यवधी शेतकऱ्यांच्या खात्यात येणार 2 हजार रुपये; वेळ आणि स्टेटस तपासा -
इराण-इस्त्रायल युद्धात उत्तर कोरियाची उडी: इराणवरील हल्ल्याचा निषेध,किम जोंग-उनांनी डागले मिसाईल! -
weather update : महाराष्ट्राचा पारा 41.8 अंशांवर! आजपासून 'या' ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस होणार -
पालकांकडून मिळालेल्या धड्यांनी माझ्या नेतृत्वाचा दृष्टिकोन घडवला: करण अदानी












Click it and Unblock the Notifications