निवडणुकीची घोषणा होताच पश्चिम बंगालमधील पहिला ओपिनियन पोल जाहीर; कोणाची सत्ता येणार?
West Bengal election 2026 opinion poll : केंद्रीय निवडणूक आयोगाने पाच राज्यांमधील निवडणुका जाहीर करताच, पश्चिम बंगालमधील पहिला ओपिनियन पोल समोर आला. यानुसार, तृणमूल काँग्रेस पुन्हा सत्तेत येण्याची शक्यता असली तरी, भाजप त्यांना कडवी टक्कर देईल असे संकेत आहेत. त्यामुळे बंगालमधील सत्तासंघर्ष आणखी तीव्र होणार असल्याचे दिसते.
पश्चिम बंगालमध्ये 294 जागांसाठी दोन टप्प्यात मतदान होईल. पहिल्या टप्प्यात 23 एप्रिलला 152 जागांवर, तर दुसऱ्या टप्प्यात 29 एप्रिलला 142 जागांवर मतदान होईल. मतमोजणी 4 मे रोजी निश्चित आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी सत्ता टिकवण्यासाठी तर भाजप बंगाल जिंकण्यासाठी सज्ज आहे.

मॅटराईज आयएएनसच्या ओपिनियन पोलनुसार, ममता बॅनर्जींचे सरकार पुन्हा येणे अपेक्षित आहे. पण त्यांना गत निवडणुकीपेक्षा कमी जागा मिळतील - 155-170. भाजपला मात्र 100-115 जागांवर समाधान मानावे लागेल, असा अंदाज आहे.
याच पोलनुसार, असदुद्दीन ओवेसींची एमआयएम आघाडी काँग्रेसपेक्षा चांगली कामगिरी करेल; त्यांना 5-6 जागा मिळतील. धक्कादायक म्हणजे, काँग्रेसला मात्र एकही जागा मिळणार नाही, असे पोलचा अंदाज आहे.
मतदानाच्या टक्केवारीनुसार, तृणमूल काँग्रेस-भाजपमधील अंतर कमी असेल. टीएमसीला 43-45%, भाजपला 41-43%, तर इतरांना 13-15% मते मिळू शकतात, असे या ओपिनियन पोलमध्ये वर्तवण्यात आले आहे.
2021 च्या विधानसभा निवडणुकीत तृणमूल काँग्रेसने 48.5% मतांसह 213 जागा, तर भाजपने 38.5% मतांसह 77 जागा जिंकल्या होत्या. या तुलनेत, भाजप यंदा सत्ताधारी पक्षाला कडवी झुंज देईल, असे हा ओपिनियन पोल दर्शवतो.












Click it and Unblock the Notifications