IPL 2026 : मैदानावरचा शेवटचा 'हेलिकॉप्टर शॉट'? आयपीएलनंतर धोनीसह 'हे' 5 दिग्गज घेणार निवृत्ती
IPL 2026 : इंडियन प्रीमियर लीगच्या १९ व्या हंगामाचा बिगुल वाजला असून, क्रिकेट चाहत्यांसाठी हा मोसम जितका आनंदाचा आहे तितकाच भावूक करणारा ठरणार आहे. आयपीएलच्या इतिहासात सोनेरी पानं लिहिणारे ५ महानायक या हंगामात शेवटचे खेळताना दिसण्याची शक्यता आहे. वाढतं वय, दुखापती आणि संघात होणारे बदलाचे वारे पाहता, हे स्टार खेळाडू 'IPL 2026' नंतर क्रिकेटच्या या ग्लॅमरस रंगमंचाला कायमचा रामराम ठोकू शकतात.

निवृत्तीच्या उंबरठ्यावर असलेले ५ स्टार खेळाडू आणि त्यांची वैशिष्ट्ये
१. एम. एस. धोनी (MS Dhoni - चेन्नई सुपर किंग्स)
- वैशिष्ट्य: धोनी म्हणजे केवळ खेळाडू नाही, तर सीएसकेचा 'थाला' आणि जगातील सर्वोत्तम फिनिशर आहे.
- निवृत्तीचे कारण: वाढते वय हे असून ४४ व्या वर्षीही धोनी मैदानात असला तरी, संघाची भविष्यातील बांधणी पाहता तो मेंटरच्या भूमिकेत जाण्याची दाट शक्यता आहे.
२. सुनील नरेन (Sunil Narine - कोलकाता नाईट रायडर्स)
- वैशिष्ट्य: नरेनची जादुई फिरकी आणि सलामीला येऊन केलेली फटकेबाजी केकेआरसाठी नेहमीच 'एक्स फॅक्टर' राहिली आहे.
- निवृत्तीचे कारण: गोलंदाजीच्या ॲक्शनमधील आव्हाने आणि घसरत्या फॉर्ममुळे हा त्याचा शेवटचा हंगाम ठरू शकतो.
३. अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane - कोलकाता नाईट रायडर्स)
- वैशिष्ट्य: संयमी फलंदाजी आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षण ही रहाणेची ओळख असून त्याने कठीण काळात संघाचा डाव सावरला आहे.
- निवृत्तीचे कारण: ३७ वर्षांच्या रहाणेच्या जागी संघ व्यवस्थापन आता युवा खेळाडूंना संधी देण्याच्या विचारात आहे.
४. इशांत शर्मा (Ishant Sharma - दिल्ली कॅपिटल्स)
- वैशिष्ट्य: उंचपुऱ्या इशांतने आपल्या अनुभवाच्या जोरावर अनेक महत्त्वाच्या विकेट्स घेत दिल्लीच्या गोलंदाजीचे नेतृत्व केले आहे.
- निवृत्तीचे कारण: ३८ व्या वर्षात पाऊल ठेवत असलेल्या इशांतला फिटनेसच्या समस्यांमुळे टी-२० क्रिकेटची वेगवान लय राखणे कठीण जात आहे.
५. मार्कस स्टोइनिस (Marcus Stoinis - पंजाब किंग्स)
- वैशिष्ट्य: स्टोइनिस हा जगातील सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडूंपैकी एक असून मोठ्या फटक्यांसाठी तो प्रसिद्ध आहे.
- निवृत्तीचे कारण: दुखापतींचे सत्र आणि मोठ्या लिलावातील संघाची नवीन रणनीती पाहता स्टोइनिस विदेशी लीग्सकडे लक्ष वळवू शकतो.
हेही वाचा : IPL 2026 : मुंबई इंडियन्सचे आयपीएल वेळापत्रक जाहीर! पहिला सामना 'या' दिवशी; जाणून घ्या फुल टाईमटेबल
हेही वाचा : IPL 2026 Auction : मोठी बातमी! आयपीएल लिलावात 369 खेळाडूंची अंतिम यादी जाहीर; कोणत्या गटात कोण? वाचाहेही वाचा : IPL 2026 Schedule: आयपीएलचे 15 दिवसांचे वेळापत्रक समजून घ्या; पहिल्या सामना RCB Vs हैदराबाद












Click it and Unblock the Notifications