Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

IPL 2026 Auction : मोठी बातमी! आयपीएल लिलावात 369 खेळाडूंची अंतिम यादी जाहीर; कोणत्या गटात कोण? वाचा

IPL 2026 Mini Auction Final List of 369 Players Released : IPL २०२६ च्या मिनी ऑक्शनसाठी क्रिकेट विश्वाचे लक्ष लागलेले असताना, बीसीसीआयने अखेर खेळाडूंची अंतिम यादी प्रसिद्ध केली आहे. आज अबू धाबीच्या एतिहाद ॲरिनामध्ये होणाऱ्या या लिलावात एकूण ३६९ खेळाडू त्यांचे नशीब आजमावणार आहेत. शेवटच्या क्षणी १९ नवीन खेळाडूंचा यात समावेश करण्यात आला असून, उपलब्ध ७७ स्लॉट्ससाठी (३१ परदेशी) १० फ्रँचायझींमध्ये मोठी चुरस पाहायला मिळणार आहे.

IPL 2026 Mini Auction Final List

विशेष म्हणजे, सर्वाधिक बेस प्राईस असलेल्या ₹२ कोटी गटात कॅमरून ग्रीन, वानिंदु हसरंगा आणि लियाम लिविंगस्टोन यांसारख्या ४० खेळाडूंनी स्थान मिळवले आहे. या बहुप्रतिक्षित लिलावाचे महत्त्वाचे आकडे आणि कोणत्या गटात कोण आहेत, जाणून घ्या सविस्तर...

IPL २०२६ लिलावाची आकडेवारी

आजचा मिनी ऑक्शन असल्याने, उपलब्ध असलेल्या खेळाडूंची संख्या आणि बजेट कमी असले तरी, स्पर्धा तीव्र असणार आहे.

  • एकूण खेळाडू : ३६९
  • भारतीय खेळाडू : २५३
  • परदेशी खेळाडू : ११६
  • कॅप असलेले खेळाडू : १६
  • अनकॅप असलेले खेळाडू : २३७

बेस प्राईस कॅटेगरी

या लिलावात खेळाडूंना त्यांच्या अनुभव आणि मागणीनुसार वेगवेगळ्या बेस प्राईस गटांमध्ये (किमान विक्री किंमत) ठेवले गेले आहे.

२ कोटी (सर्वाधिक बेस प्राईस): ४० खेळाडू

१.५० कोटी: ९ खेळाडू

१.२५ कोटी: ४ खेळाडू

१ कोटी: १७ खेळाडू

७५ लाख: ४४ खेळाडू

५० लाख: ४ खेळाडू

३० लाख (सर्वात कमी बेस प्राईस): २३५ खेळाडू

ऑक्शन सेट आणि प्रमुख खेळाडू (२ कोटी गट)

संपूर्ण लिलाव एकूण ४२ सेटमध्ये विभागला गेला असून, त्याला १० प्रमुख श्रेणींमध्ये (Categories) विभागले आहे. सुरुवातीच्या काही महत्त्वाच्या 'सेट्स' मध्ये (Sets) खालीलप्रमाणे दिग्गज खेळाडूंचा समावेश आहे.

IPL २०२६ लिलाव: प्रमुख 'सेट' आणि ₹२ कोटी बेस प्राईस असलेले खेळाडू

सेट १: कॅप असलेले फलंदाज (BA1)

  • डेवोन कॉनवे
  • जेक फ्रेजर-मॅकगर्क
  • कॅमरून ग्रीन
  • डेव्हिड मिलर

सेट २: कॅप असलेले अष्टपैलू (AL1)

  • गुस एटकिंसन
  • वानिंदु हसरंगा
  • वेंकटेश अय्यर
  • लियाम लिविंगस्टोन
  • रचिन रवींद्र

सेट ३: कॅप असलेले विकेटकीपर (WK1)

  • फिन एलन
  • बेन डकेट
  • जेमी स्मिथ

सेट ४: कॅप असलेले वेगवान गोलंदाज (FA1)

  • गेराल्ड कोएत्ज़ी
  • जैकब डफी
  • मैट हेनरी
  • एनरिच नॉर्त्जे
  • मथीशा पाथिराना

सेट ५: कॅप असलेले फिरकी गोलंदाज (SP1)

  • रवि बिश्नोई
  • अकील हुसैन
  • मुजीब उर रहमान
  • महीश तीक्ष्णा

कॅप असलेल्या खेळाडूंच्या यादीत पृथ्वी शॉ (₹७५ लाख), सरफराज खान (₹७५ लाख), दीपक हुड्डा (₹७५ लाख), शिवम मावी (₹७५ लाख) यांचा समावेश आहे. तर शेवटच्या क्षणी जोडलेल्या खेळाडूत अभिमन्यु ईश्वरन (भारत, फलंदाज), ब्लेसिंग मुजाराबानी (झिम्बाब्वे, वेगवान गोलंदाज), बेन सियर्स (न्यूझीलंड, वेगवान गोलंदाज), काइल वेरेन (दक्षिण आफ्रिका, विकेटकीपर) आणि तन्मय अग्रवाल (भारत, फलंदाज) यांचा समावेश आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+