Yuvraj Singh vs Kapil Dev: वनडे क्रिकेटचा खरा किंग कोण ? कोणाचा रेकॉर्ड सर्वोत्तम, घ्या जाणून
Yuvraj Singh vs Kapil Dev : भारतीय क्रिकेट संघात नेहमीच ऑल राऊंडर खेळाडूंची मागणी राहिली आहे. सध्या टीममध्ये, अक्षर पटेल, रवींद्र जडेजा आणि हार्दिक पंड्यासारखे दिग्गज खेळाडू भारतासाठी बॅट आणि बॉलने उत्कृष्ट कामगिरी करत आहेत. त्याच वेळी तरुण खेळाडू नितीश कुमार रेड्डीने देखील नुकत्याच झाले्या कसोटी सामन्यात आपली छाप सोडण्यात यशस्वी झाला आहे. पण आज आम्ही तुम्हाला विश्वचषक विजेत्या कर्णधार कपिल देव आणि युवराज सिंगबद्दल सांगणार आहोत.
युवराज सिंगची एकदिवसीय कारकीर्द
युवराज सिंगने त्याच्या एकदिवसीय कारकिर्दीत भारतीय क्रिकेट संघासाठी एकूण 304 सामने खेळले आहेत. या काळात त्याने त्याच्या शानदार फलंदाजीने संघाला अनेक सामने जिंकण्यास मदत केली नाही तर महत्त्वाच्या क्षणी आपल्या बॉलिंगने ही चमत्कार केला आहे. युवराजने त्याच्या एकदिवसीय कारकिर्दीत एकूण 8701 धावा केल्या आहेत, ज्यामध्ये 14 शतके आणि 52 अर्धशतकांचा समावेश आहे. त्याची सरासरी 36.55 आहे.

दोन विश्वचषक विजयांमध्ये महत्त्वाचे योगदान
युवराजचा खेळ नेहमीच आक्रमक आणि सामना जिंकणारा राहिला आहे. त्याचे मोठे फटके आणि विरोधी गोलंदाजांविरुद्धचा आक्रमक खेळीमुळे त्याला एक वेगळी ओळख मिळाली. 2007 च्या टी-20 विश्वचषक आणि 2011 च्या एकदिवसीय विश्वचषकातील त्याची कामगिरी खास राहिली आहे .
युवराजने आपल्या फलंदाजीने भारतीय संघाला विजय मिळवून दिला होता. युवराज सिंगचे योगदान केवळ फलंदाजीतच नाही तर गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणातही महत्त्वाचे होते.
कपिल देवचा एकदिवसीय विक्रम
कपिल देव हे भारतीय क्रिकेटच्या इतिहासात एक महान ऑल राऊंडर खेळाडू म्हणून ओळखले जातात. त्याची एकदिवसीय कारकीर्द भारतीय क्रिकेटसाठी मौल्यवान राहिली आहे. कपिल देव यांनी 225 एकदिवसीय सामने खेळले आहेत. या काळात त्यांनी 3783 धावा केल्या आहेत. त्यांचे योगदान केवळ फलंदाजीपुरते मर्यादित नव्हते, तर ते एक हुशार गोलंदाज देखील होते. कपिल देव यांनी अनेक महत्त्वाच्या सामन्यांमध्ये भारतीय संघाला विजय मिळवून दिला आहे.
एकदिवसीय सामन्यांमध्ये कपिल देवचा दबदबा
कपिल देवच्या फलंदाजीचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांची आक्रमकता आणि सामन्यातील परिस्थितीनुसार त्यांची भूमिका बजावण्याची क्षमता महत्वाची ठरायची. ते अनेकदा संघाला अडचणीतून वाचवण्यासाठी खालच्या क्रमावर खेळायचे. त्याचे फलंदाजीचे तंत्र सोपे पण प्रभावी होते.
कपिल देव यांनी त्याच्या एकदिवसीय कारकिर्दीत 3783 धावा करण्यासोबतच 27 अर्धशतके आणि 1 शतकही केलं आहे. कपिल देव हे देखील एक उत्तम गोलंदाज होते. त्याने त्याच्या एकदिवसीय कारकिर्दीत 239 विकेट्सही घेतल्या आहेत. त्याच्या स्विंग आणि वेगामुळे ते नेहमीच फलंदाजांसाठी आव्हानात्मक ठरले आहेत.
दोघांमध्ये सर्वोत्तम कोण आहे?
जर आपण दोघांची तुलना केली तर युवराज सिंग आणि कपिल देव हे त्यांच्या काळातील महान खेळाडू आहेत. दोघांचेही योगदान भारतीय क्रिकेटसाठी अमूल्य आहे. इथे कोणालाही सर्वोत्तम घोषित करणे चुकीचे ठरेल. भारताला युवराज सिंग आणि कपिल देव सारख्या खेळाडूंची गरज आहे. भारतीय क्रिकेटला भविष्यात असे आणखी खेळाडू मिळत राहतील,अशी आशा आहे.












Click it and Unblock the Notifications