Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

'हिंदीला विरोध' केवळ हा एकमेव मुद्दा नव्हे, तर अशी 8 कारणं, ज्यामुळे राज-उद्धव ठाकरे येताहेत एकत्र?

Why are Raj Thackeray and Uddhav Thackeray coming, Know details : प्राथमिक शिक्षणात हिंदी सक्ती करण्याच्या मुद्द्यावरून राज ठाकरे व उद्धव ठाकरे यांचा पक्ष आक्रमक झाला आहे. त्यांनी आता सरकारविरोधात एल्गार करण्याचा निर्धार केला. मराठीचे संवर्धन व जतन करण्याची भूमिका घेऊन दोन्ही ठाकरे बंधूंनी आता महाराष्ट्राचे राजकारण चांगलंच तापवलं आहे.

एकमेकांविरोधात प्रचंड आरोप प्रत्यारोप करणारे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे ठाकरे बंधू आता हिंदी विरोधात आक्रमक झाले असून ते 5 जुलै रोजी एकत्र आंदोलन करणार आहेत.

परंतु, या मोर्चाच्या निमित्ताने आता एकत्र युती करण्याचे संकेत त्यांनी दिले आहेत. दोन्ही नेत्यांनी आता नरमाईची भाषा करून एकमेकांना साद घातली आहे.

राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांना साद घातल्यानंतर त्यांनी सुद्धा अटी-शर्तींच्या आडून महाराष्ट्राच्या हितासाठी प्रतिसाद दिला. दरम्यान, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र यावे ही महाराष्ट्रातील अनेक लोकांची इच्छा देखील आहे.

परंतु, दे दोघे बंधू खरचं केवळ हिंदी सक्तीला विरोध या मुद्यावरुन एकत्र येत आहेत का, की त्यामागे काही वेगळं कारण आहे, त्या कारणांची मिमांसाच आपण या लेखातून समजून घेणार आहोत..

Raj Thackeray and Uddhav Thackeray

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची एकत्र येण्यामागची 8 प्रमुख कारण

  • उद्धव ठाकरेंची अस्तित्वाची लढाई

उद्धव ठाकरे यांच्या राजकीय जीवनात जून 2022 मध्ये मोठे राजकीय वळण आले. कोरोनानंतर शिवसेनेला मोठे भगदाड पडले. एकनाथ शिंदे यांनी बंड केले. पक्षातील आमदार सोबत घेऊन त्यांनी भाजपासोबत युती केली.

त्यासाठी शिवसेना-शिंदे गट अस्तित्वात आला. उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला. त्यानंतरचे नाट्य संपूर्ण महाराष्ट्राने पाहिले.

दरम्यान 2023 मध्ये निवडणूक आयोगाने शिवसेना हे ना आणि धनुष्यबाण हे चिन्ह एकनाथ शिंदे यांच्या गटाला दिले. तर उद्धव गटाला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव आणि मशाल चिन्हं दिले. शिवसेना फुटली, चिन्हं गेलं.

लोकसभेत सरस कामगिरी करणाऱ्या उद्धव ठाकरे गटाला विधानसभेत मोठा झटका बसला. महाविकास आघाडीला जनतेनं नाकारलं. ईव्हीएम मतदानात महाविकास आघाडीतील घटक पक्षांचा सुपडा साफ झाला.

आता राजकीय अस्तित्वाची निकाराची लढाई पक्षासमोर उभी ठाकली आहे. राज ठाकरे यांनी दिलेली हाक त्यादृष्टीने महत्त्वाची आहे.

मुंबई महापालिका हातची जाऊ द्यायची नसेल तर मराठीच्या मुद्यावर दोन्ही बंधु एकत्र येऊ शकतात. ही निवडणूक पुढील मोठ्या प्रयोगासाठी लिटमस् टेस्ट ठरू शकते.

हे ही वाचा : राज आणि उद्धव ठाकरेंच्या ऐक्याची इनसाईड स्टोरी, शिवतीर्थ ते मातोश्री काय घडलं?

  • विधानसभा निकालाने उडवली झोप

उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना या नावावर आणि नवीन चिन्हासह उद्धव ठाकरे विधानसभेच्या निवडणुकीत उतरले होते. तर ही त्यांच्यासाठी अग्नि परीक्षाच होती. उद्धव ठाकरे गटाने राज्यात 95 जागांवर उमेदवार उभे केले होते. पण त्यांना केवळ 20 जागांवर विजय मिळवता आला. त्यातील 10 जागा मुंबईतील होत्या.

तर दुसरीकडे एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेने 81 जागांवर उमेदवार दिले आणि 57 जागांवर विजय मिळवला. महाविकास आघाडीतील मित्र पक्षांनाही अपेक्षित यश आले नाही. त्यामुळे आता मराठी भाषा, महाराष्ट्र या मुद्यावर दोन्ही ठाकरे एकत्र येऊ शकतात.

हे ही वाचा : 'मराठी' साठी, ठाकरे बंधू एकत्र येणार?, मनपा निवडणुकीसाठी युतीचे हेच का संकेत, पडद्यामागे शिजतंय काय?

  • मनसेचा विधानसभा निवडणूकीत धुव्वा!

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा आलेख गेल्या दोन विधानसभा निवडणुकीपासून सातत्याने घसरल्याचे दिसून आले. पक्ष स्थापनेपासून मराठीच्या झंझावातावर मनसेने मोठा विजय मिळवला होता.

2009 मधील निवडणुकीत मनसेने 13 जागांची कमाई केली होती. तर 214 मध्ये त्यांना एकाच जागेवर समाधान मानवे लागले होते. 2019 आणि 2024 च्या निवडणुकीत त्यांना साधं खातंही खोलता आलं नाही.

Take a Poll

  • मुलाचा पराभव राज यांच्या जिव्हारी

लोकसभेत महायुतीला बिनशर्त सहकार्य केलं. एकही उमेदवार दिला नाही. तरीही महायुतीने माहीममध्ये मुलाला पाठिंबा दिला नाही. त्यामुळे अमित ठाकरेंचा झालेला पराभव जिव्हारी लागला. माहिम मतदारसंघातून राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांना पराभवाचा सामना करावा लागला.

या मतदारसंघात उद्धव ठाकरे यांचे उमेदवार महेश सावंत यांनी शिंदे गट आणि मनसेला धक्का दिला. आता मनसेला राजकीय प्रवाहात मोठ्या चमत्काराची गरज आहे. मराठी आणि महाराष्ट्र या मुद्याभोवती राजकारण तापवले तर मनसे आणि उद्धव ठाकरे गटाला भविष्यात चांगले यश मिळू शकते असा राजकीय तज्ज्ञांचे मत आहे.

हे ही वाचा : सरकारचे धोरणच मान्य नाही! हिंदी सक्तीवरुन राज ठाकरेंचा एल्गार; 'या' दिवशी करणार मुंबई शहर जाम!

  • मुंबई महापालिका निवडणूक अस्तित्वाची

महापालिका निवडणुका तोंडावर आहे. ही निवडणूक 2025 मध्ये होण्याची शक्यता आहे. महायुतीत जागा अधिक मिळणार नाही. तीन बलाढ्य पक्षांच्या तुलनेत कमी जागा मिळतील. त्यामुळे महायुतीच्या पाठी फरफरटत जावं लागेल ही मनसेची भीती आहे. तर पक्ष फुटीनंतर उद्धव ठाकरे गट निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे.

2017 मधील मुंबई महापालिका निवडणुकीत एकत्रित शिवसेनेने 84 जागा जिंकल्या होत्या. तर भाजपाने 82 जागा जिंकल्या होत्या. मनसेला एकही जागा जिंकता आली नव्हती. भाजपाने विधानसभेत मोठी झेप घेतली आहे. मुंबईत पक्षाचे मजबूत जाळे तयार केले आहे. त्यामुळे मनसे आणि उद्धव ठाकरे गटासमोर मोठे आव्हान आहे.

  • दोघांनी एकत्र यावे ही लोकभावना!

उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या दोन्ही भावांनी एकत्र यावं ही लोकभावना आहे. एकत्र आल्यानंतर त्याचा महापालिकेत चांगला परिणाम होऊ शकतो, असे जनमत आहे.

तर सध्या मुंबईत इतर भाषिकांची सुरू असलेली दादागिरी, नित्याचे वाद यामुळे मराठी माणूस नाराजच नाही तर संतापलेला आहे. त्यांना एक चांगल्या पर्यायची प्रतिक्षा आहे. राज ठाकरे -उद्धव ठाकरे एकत्र आल्यास सत्ताधाऱ्यांची डोकेदुखी वाढू शकते.

  • राजकीय अस्तित्व टिकवण्याचे आव्हान

पाच वर्ष राज्यातील सरकार स्थिर आहे. बहुमताचा मोठा आकडा सरकारकडे आहे. त्यामुळे पक्ष फुटीपासून ते राजकीय अस्तित्व टिकवण्याचं आव्हान उद्धव ठाकरे गटासमोर असेल. तर मनसेला प्रभावाचा परीघ वाढवायचा आहे. त्यासाठी दोन्ही बंधु एकत्र आल्यास पूरक भूमिकेचा फायदा होऊ शकतो.

  • हिंदी भाषा सक्तीला कडाडून विरोध

प्राथमिक शाळेत सुरुवातीपासून हिंदी ही तिसरी भाषा म्हणून अभ्यासक्रमात टाकण्यात आली. परंतु ही भाषा हळूहळू सक्तीची केली जाणार आहे. त्यामुळे ती भाषा पाचवीपासून अभ्यासक्रमात आणली जावी, अशी मागणी राज ठाकरे यांची आहे. तसेच उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची देखील तशीच मागणी आहे. त्यामुळे या मुद्द्यावरुन दोन्ही पक्षाची भूमिका एकच असल्याने त्याविरोधात दोन्ही पक्ष रस्त्यावर उतरणार आहेत.

More From
Prev
Next
Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+