'मराठी' साठी, ठाकरे बंधू एकत्र येणार?, मनपा निवडणुकीसाठी युतीचे हेच का संकेत, पडद्यामागे शिजतंय काय?
Raj Thackeray Uddhav Thackeray alliance News : राज्यात इयत्ता पहिलीपासून तिसरी भाषा म्हणून अप्रत्यक्षपणे हिंदी भाषेची सक्ती केली जात आहे, असा दावा करत राज ठाकरे यांनी आक्रमक भूमिका घेतली. तर आगामी 6 जुलै रोजी मुंबईत विराट मोर्चा काढला जाणार आहे. या मोर्चात महाराष्ट्रातील सर्व पक्षांना येण्याचं आव्हान राज ठाकरेंनी केलं आहे. तसेच उद्धव ठाकरेंसोबत देखील आमची माणसं बोलतील, अशी माहिती राज ठाकरे यांनी दिली. दरम्यान, राज ठाकरे यांच्या या विधानाने आगामी मनपा निवडणुकीच्या अनुषंगाने ठाकरे बंधूंची युती होण्याचे संकेत असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.

काय म्हणाले राज ठाकरे?
हिंदीविरोधी मोर्चात सर्वजण सहभागी होतील. महाराष्ट्रातील राजकीय पक्ष म्हटलं तर उद्धव ठाकरेंची शिवसेना पण आलीच ना. त्यांच्याशीही बोलणार, त्यांच्याही लोकांशी आमचं माणसं बोलणार. कुठलाही वाद अन् भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे, हे तुम्हाला 6 जुलैला कळेल, मराठी माणसांची ताकद देखील सरकारला कळेल, असेही राज ठाकरे म्हणाले.
राज ठाकरे पुढे बोलताना म्हणाले की, 6 जुलै रोजी विराट मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चात सर्व पक्षाने यावं. मोर्चात कोणत्याही पार्टीचा झेंडा नसेल. मोर्चाचं नेतृत्व मराठी माणसाकडे असेल. मुंबईतील गिरगाव चौपाटीवरुन हा मोर्चा निघणार आहे. मोर्चात सर्व साहित्यिक,तज्ज्ञांनी सहभागी व्हावे. मोर्चात विद्यार्थी आणि शिक्षकांनी यावं, असं आवाहन राज ठाकरेंनी केलं.
सर्वांना सहभागी व्हावं म्हणून रविवारी मोर्चा काढण्यात येणार आहे. तसेच मोर्चाला कोण येणार नाही ते पाहणार, असं राज ठाकरे म्हणाले. हिंदीविरोधी मोर्चात सर्वजण सहभागी होतील. महाराष्ट्रातील राजकीय पक्ष म्हटलं तर ते (उद्धव ठाकरेंची शिवसेना) पण आलेच. त्यांच्याशीही बोलणार, त्यांच्याही लोकांशी बोलणार. आमची माणसं त्यांच्या लोकांशी बोलणार. कुठल्याही वाद आणि भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे, हे तुम्हाला 6 जुलैला कळेल.
निवडणुकीच्या आधी हे ठाकरे बंधूंचे युतीचे संकेत आहे का?
दरम्यान, राज ठाकरे यांनी हिंदीविरोधात आणि मराठी भाषेच्या संवर्धानासाठी मुंबई मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला. मनसेने त्यांची भूमिका अगदी स्पष्ट केली. या मोर्चात त्यांनी सर्व पक्षांना सहभागी होण्याचे आवाहन देखील केले. त्यात राज ठाकरे हे स्वत: उद्धव ठाकरे यांच्याशी बोलणार आहेत, असे त्यांनी संकेत दिले. त्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.
या मोर्चाच्या माध्यमातून जर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या पक्षातील कार्यकर्ते एकत्र आले. तर आगामी मनपा तथा जि.प. निवडणुकीच्या दृष्टीने हे युतीचे संकेत आहेत. कारण, मनसे असो किंवा शिवसेना ठाकरे गट यांच्या निर्मितीचा मुळ मुद्दा होता मराठी माणूस व मराठी भाषा. आज देखील तशीच परिस्थिती महाराष्ट्रात आहे, हिंदी सक्तीची करण्याची गरज नाही, मराठीत शिक्षण व्हावे, ही भूमिका राज ठाकरे यांची आहे, तशीच भूमिका शिवसेना ठाकरे गटाची देखील आहे. त्यामुळे हे आगामी निवडणुकीच्या आधी एकत्र येऊन युतीचे संकेत देणारे ठरेल का, हा आगामी काळच ठरवणार आहे.
मराठीपण घालवायचा हा कट, राज यांचा आरोप!
हिंदी असेल किंवा इतर कोणतीही भाषेची सक्ती राहणार नाही. मी सर्व पक्षांना आवाहन करत आहे की, येत्या 6 जुलैला आम्ही गिरगाववरून मोर्चा काढायचे ठरवलं आहे. या मोर्चात कोणताही झेंडा नसेल, हा मराठी माणसाचा मोर्चा असेल, आम्ही सर्वांना या मोर्चाचे आमंत्रण देत आहोत. त्यामुळे, 6 जुलै रोजी सकाळी 10 वाजता हा मोर्चा असेल, मी बाकीच्या पक्षासोबत बोलणार आहे, अशी घोषणाच राज ठाकरेंनी यावेळी केली. महाराष्ट्राचं मराठीपण घालवायचा हा कट आहे, मी कट बोलतोय कारण हा कटच आहे, असेही राज ठाकरे यांनी ठामपणे सांगितले.












Click it and Unblock the Notifications