रमी खेळणारे झाले क्रीडामंत्री! कोण आहे माणिकराव कोकाटे? जाणून घ्या त्यांची अलिकडची वादग्रस्त वक्तव्य

Who is Manikrao Kokate : माणिकराव कोकाटे महाराष्ट्राच्या राजकारणात अलिकडे फारच चर्चेत असलेले नाव, पण त्यांची चर्चा ही चांगल्या अर्थाने नव्हे तर त्यांनी ओढवून घेतलेल्या काही वादग्रस्त वक्तव्यामुळे आहेत. पण त्यातही एक मोठी घडामोड म्हणजे विधानसभेचे अधिवेशन सुरु असताना जेव्हा शेतकऱ्यांच्या गहन प्रश्नांवर चर्चा सुरु असते नेमके त्याचवेळी खुद्द कृषिमंत्री असलेले कोकाटे सभागृहात मोबाईलवर ऑनलाईन जंगली रमी खेळत असल्याचे कथित व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित झाले अन् व्हायरल झाले.. बस्स इथून त्यांच्या राजीनाम्याची चर्चा सुरु झाली, पण त्यांचे मंत्रीपद थोडक्यात वाचले असून त्यांचे खातेबदल झाला आहे.

Who is Manikrao Kokate

माणिक राव कोकाटे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते तथा राज्याचे कृषिमंत्री होते, कालच ३१ जुलै २०२५ रोजी त्यांचे खाते बदलले व ते दत्तात्रय भरणे यांना देण्यात आले. आता कोकाटेंकडे क्रीडामंत्रीपदाचा पदभार देण्यात आला आहे. विधीमंडळ अधिवेशनादरम्यान विधानसभेत रमी खेळत असल्याचा सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झाला. यानंतर कोकाटेंवर विरोधकांनी टीकास्त्र सोडले शिवाय अजित पवारांच्या पक्षालाही काही संघटनांनी जाब विचारला. यासह राज्यात सर्वथरातून कोकाटेंवर टीका तर झालीच पण आता त्यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधक करत आहेत, यावर मोठा निर्णय होईल अशी शक्यता आहे. माणिक राव कोकाटेंची राजकीय कारकिर्द आणि त्यांची वादग्रस्त वक्तव्य आपण जाणून घेऊया.

Take a Poll

कोण आहेत माणिकराव कोकाटे?

  • माणिकराव कोकाटे हे महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील राजकारणी आहेत. ते राज्याचे कृषिमंत्री आहेत. ते सध्या राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे सिन्नर विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत.
  • सिन्नर विधानसभा मतदारसंघातून कोकाटेंनी ५ वेळा निवडणूक जिंकली आहे. त्यांनी २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत नाशिक लोकसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवली पण त्यांना अपयश आले.

    हेही वाचा : अखेर रमीचा डाव उलटला, माणिकराव कोकाटेंचें कृषी खातं काढलं; जाणून घ्या त्यांची राजकीय कारकीर्द

    राजकीय कारकीर्द

    • माणिकराव कोकाटेंनी लहान वयातच भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (INC) मधून राजकीय प्रवास सुरू केला. त्यांनी काँग्रेस सोडली आणि १९९९ मध्ये शरद पवार यांनी स्थापन केलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात (NCP) सामील झाले.
    • राष्ट्रवादीने त्यांना सिन्नर विधानसभा मतदारसंघातून तिकीट देण्यास नकार दिल्यावर ते शिवसेनेत गेले आणि १९९९ आणि २००४ च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत विजयी झाले. नंतर ते तत्कालीन शिवसेना नेते नारायण राणे यांच्या बंडात सामील झाले आणि राणेंसोबत काँग्रेसमध्ये सामील झाले.
    • २००९ च्या विधानसभा निवडणुकीत ते काँग्रेसच्या तिकिटावर तिसऱ्यांदा सिन्नरमधून विजयी झाले. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत ते पुन्हा भाजपमध्ये सामील झाले आणि शिवसेनेचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांच्याकडून त्यांचा पराभव झाला.
    • २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी नाशिक लोकसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवली.
    • २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार यांचे उमेदवार उदय सांगळे यांच्याविरुद्ध मोठ्या फरकाने कोकाटेंनी विजय मिळवला.

    कोकाटेंचे या काही महिन्यातील वादग्रस्त वक्तव्यं

    एप्रिल महिन्यातील वक्तव्य

    मीडिया रिपोर्टनुसार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं की कर्जमाफी होऊ शकत नाही? मग शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळेल की नाही? असा सवाल एका शेतकऱ्याने कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांना विचारला होता.

    या प्रश्नाचं उत्तर देताना कृषीमंत्री माणिकराव कोकाटे म्हणाले की, "मग जे नियमित कर्ज भरतात त्यांनी का बरं कर्ज भरावं? कर्ज घ्यायचं आणि पाच-दहा वर्ष कर्जमाफीची वाट पाहायची. तोपर्यंत कर्जभरायच नाही. "मला एक सांगा, आता येथे मीडिया आहे. मीडियासमोर असं बोलत नाही. पण तुम्ही मला सांगा. तुमची (शेतकर्‍यांची) कर्जमाफी झाल्यानंतर जे पैसे येतात त्या पैशाचं तुम्ही काय करता? शेतीमध्ये एक रुपयांची तरी गुंतवणूक करता का? सरकार तुम्हाला आता शेतीमध्ये गुंतवणूक करण्यासाठी पैसे देणार आहे. सरकार तुम्हाला पाईपलाईनाला पैसे, सिंचनासाठी पैसे, शेततळ्यासाठी पैसे देणार आहे. सरकार भांडवली गुंतवणूक करतं. मग शेतकरी भांडवली गुंतवणूक करतात का? शेतकरी म्हणतात, पीक विम्याचे पैसे पाहिजे, मग त्यातून साखरपुडे करा, लग्न करा", असं कोकाटे म्हणाले होते.

    मे महिन्यातील वक्तव्य

    "हार्वेस्टिंग झालेल्या पिकांचे पंचनामे करून काय करणार? ढेकळांचे पंचनामे करायचे का?" असं बेताल व्यक्तव्य माणिकराव कोकाटे यांनी केलं होतं. नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील पांढुर्ली गावात अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी गेल्यानंतर कृषीमंत्री कोकाटे पत्रकारांशी बोलत होते. त्यावेळी त्यांनी हे वक्तव्य केलं.

    छत्रपती संभाजीनगर येथील वक्तव्य

    'कृषिमंत्रिपद म्हणजे ओसाड गावची पाटीलकीच आहे आणि मला हे खाते दिले आहे', असे विधान माणिकराव कोकाटे यांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये आयोजित कार्यक्रमात केले होते. अखिल भारतीय बळीराजा संघटना भारततर्फे आयोजित शेतकऱ्यांच्या गुणवंत पाल्यांच्या सत्कार समारंभात त्यांनी हे विधान केले होते.

    जुलैमधील वक्तव्य - 'सरकार भिकारी"

    भिकारीही एक रुपयाही भिक्षा घेत नाही, पण आम्ही एक रुपया पीक विमा देत आहोत. तरीही काही लोक त्याचा गैरवापर करण्याचा प्रयत्न करतात. त्यांच्या विधानाबद्दल विचारले असता कोकाटे म्हणाले की, सरकार शेतकऱ्यांना एक रुपया देत नाही, तर त्यांच्याकडून एक रुपया घेते. सरकार भिकारी आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+