Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

उद्धव ठाकरे-देवेंद्र फडणवीस एकत्र! आता तरी वितुष्ट संपतील का? वाचा दोघे एकमेकांना कुठे कधी भेटले?

Uddhav Thackeray wishes Devendra Fadnavis : शिवसेना फुटीनंतर एकमेकांवर चिखलफेक करणारे दोन धुरंधर नेते आज पुन्हा एकत्र भेटले. अर्थातच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी मुख्यमंत्री तथा उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची आज नागपुरात भेट झाली. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करण्यासाठी नागपूर येथे उद्धव ठाकरे यांच्यासह आदित्य ठाकरे, अनिल परब आणि अन्य महत्वाच्या नेत्यांनी फडणवीस यांची भेट घेतली.

ठाकरे - भाजप एकत्र येतील का?

उद्धव ठाकरे-देवेंद्र फडणवीस एकत्र भेटले. ठाकरेंनी शुभेच्छा दिल्या, पुष्पगु्च्छही दिले ते फडणवीसांनी मनोभावे स्वीकारले. त्यामुळे आता तरी उभय नेत्यातील वितूष्ट संपतील का? शिवसेना युबीटी आणि भाजप पुन्हा एकत्र येणार का या चर्चाही आता रंगत आहेत.

Uddhav Thackeray wishes Devendra Fadnavis

एकीकडे राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी विळ्या-भोपळ्याचा वाद असलेल्या उद्धव ठाकरे यांनी शिंदे यांचे महत्वाचे साथीदार देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यानंतर सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. एकीकडे एक तू राहशील तर मी असे वक्तव्य करुन देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात ठाकरेंनी दंड थोपटले होते तर दुसरीकडे देवेंद्र फडणवीस यांनीही उद्धव ठाकरेंना ललकारले होते.

हेही वाचा : सेक्युलर शिवसेना ठाकरे गट पुन्हा हिंदूत्वाकडे..? वर्षभरात उद्धव ठाकरेंच्या दोन भूमिका

वितूष्ट संपतील का?

अडीच अडीच वर्षांसाठी मुख्यमंत्रीपदावरुन दुरावलेले आणि युती तुटलेले भाजप आणि शिवसेना (आता युबीटी) पक्षाने नुकत्याच झालेल्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत एकमेकांवरोधात दंड थोपटले होते. देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्यातील शाब्दीक युद्ध त गगनाला भिडले. त्यांच्यातील प्रखर विरोध आणि वाद कायम राहीला. यातून दोन्ही नेत्यांत वितुष्टही आले कारण त्यांच्या वर्तनातून खालच्या पातळीवरील दोन्ही पक्षातील नेते आणि कार्यकर्त्यांतही अनेकदा हमरी-तुमरी आणि शा‍ब्दिक वाद झाले. त्यानंतर मुख्यमंत्री झाल्यानंतर फडणवीस- ठाकरे भेट झाली. आता या दोन नेत्यातील वितुष्ट संपतील का? हा प्रश्न महाराष्ट्रात चर्चिला जात आहे.

हेही वाचा : राज आणि उद्धव ठाकरे एकत्र येऊ शकतात का? दोघे एकत्र आल्यास महाराष्ट्राच्या राजकारणात काय होईल? वाचा

ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल

राज्याच्या हिवाळी अधिवेशनासाठी दुसऱ्या दिवशी उद्धव ठाकरे यांची नागपूरला हजेरी लावली . यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेऊन विविध मुद्द्यांवरून सरकारवर हल्लाबोल केला. देशभरातून ईव्हीएमला विरोध होत आहे. महाराष्ट्रातही भाजपने ईव्हीएमच्या माध्यमातून निवडणुका जिंकल्या आहेत. सरकारमध्ये हिंमत असेल तर बॅलेट पेपरद्वारे निवडणुका घेऊन दाखवावे, असे आव्हान उद्धव ठाकरेंनी दिले.

हेही वाचा : उद्धव ठाकरे यांच्यासमोर आव्हानांचा डोंगर; मुंबई, कार्यकर्त्यांमध्ये चलबिचल वाढली, पुढचं भवितव्य कसं?

अदानी, वन नेशन वन इलेक्शनला विरोध

उद्धव ठाकरे म्हणाले, अदानी प्रकरण असो की देशाचे इतर महत्त्वाचे प्रश्न, त्यांच्याकडून लक्ष हटवण्यासाठी 'वन नेशन, वन इलेक्शन'चा मुद्दा उपस्थित केला जात आहे. मात्र ही यंत्रणा राबवण्यापूर्वी निवडणूक प्रक्रिया पारदर्शक करणे आवश्यक आहे. निवडणूक आयुक्तांचीही निवड झाली पाहिजे. निवडणूक आयुक्तांची नियुक्ती सरकारने केली असेल आणि तो आम्हाला निवडणुकीचे नियम शिकवणार असेल, तर ही व्यवस्था योग्य नाही. अशा स्थितीत वन नेशन, वन इलेक्शन ही संकल्पना राबवू नये.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+