Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

सेक्युलर शिवसेना ठाकरे गट पुन्हा हिंदूत्वाकडे..? वर्षभरात उद्धव ठाकरेंच्या दोन भूमिका

Lookback 2024 Politics- तीन वर्षांपूर्वी शिवसेनेत फूट पडली. एका मोठ्या गटाला घेत एकनाथ शिंदे, हिंदूत्वाच्या मुद्यावर उद्धव ठाकरेंपासून वेगळे झाले. बाळासाहेबांची शिवसेना राहीली नाही म्हणत, दोन गटांत विभागलेल्या शिवसेनेच्या दोन वेगवेगळ्या वाटा झाल्या. काँग्रेस व राष्ट्रवादीच्या संगतीत आल्यावर उद्धव ठाकरे सेक्युलर दिसू लागले. मात्र आता वर्षअखेरीस ठाकरेंच्या भूमिकेत पुन्हा बदल दिसू लागला आहे.

Uddhav Thackeray

ठाकरेंची जादू ओसरली?

लोकसभेला महाविकास आघाडीत असलेल्या ठाकरे गटाने चांगले यश मिळवले होते. मात्र त्यानंतर त्यांच्या लोकप्रियतेला ओहटी लागली. महिन्यांपूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत ठाकरे गटाने आत्तापर्यंतचे निच्चांकी यश मिळवले. मराठवाडा, मुंबई, उत्तर महाराष्ट्रात महायुतीचा सुपडा साफ झाला. याचे महत्त्वाचे कारण होते, ठाकरे गटाने सोडलेली हिंदूत्वाची साथ... ठाकरे गटाने गेल्या काही दिवसांपासून सेक्युलर बाता करण्याचा सपाटा लावला होता. त्याचा परिणाम विधानसभा निवडणुकीत दिसला. हिंदूत्व सोडल्यानंतर ठाकरेंची जादूही ओसरल्याचे दिसले.

ठाकरेंनी भूमिका बदलली

विधानसभेत सपाटून मार खाल्यावर ठाकरेंच्या शिवसेनेने पुन्हा भूमिका बदललेली दिसली. विधानसभेचे अपयशातून सावरुन ठाकरे गटाने आगामी महापालिका निवडणुकीत पुन्हा आक्रमक हिंदूत्वाकडे वळण्याची भूमिका घेतलेली दिसली. बांग्लादेशात होत असलेल्या हिंदूवरील आत्याचाराचा मुद्दा पुढे करुन ठाकरे गटाने मूळ हिंदूत्वाचा मुद्दा आम्ही सोडलेला नसल्याचे दाखविण्याचा प्रयत्न केला. आगामी काळातही ठाकरे गट आक्रमक हिंदूत्वाकडे वळण्याची चिन्हे दिसत आहे.

ठाकरे गट मविआतून बाहेर?

केवळ हिंदूत्व सोडल्यानेच विधानसभेत आपला पराभव झाल्याची सल ठाकरे गटाच्या नेत्यांनी थेट उद्धव ठाकरेंसमोर मांडली. विधानसभा निवडणुकीनंतर मातोश्रीवर झालेल्या पराभूत व विजयी आमदारांच्या बैठकीत अनेक नेत्यांनी हा मुद्दा प्रकर्षाने मांडला. त्यामुळे सेक्युलर पार्टी असलेल्या काँग्रेस किंवा राष्ट्रवादी शरद पवार गटातून ठाकरे गट बाहेर पडण्याची शक्यताही व्यक्त होऊ लागली आहे. आगामी महापालिका व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ठाकरे गट एकला चलो रे ची भूमिका घेईल, असेही काहींचे म्हणणे आहे.

ठाकरेच्या वर्षभरात दोन भूमिका

यापूर्वी सायलेंट हिंदूत्व हाताळणारा ठाकरे गट विधानसभेनंतर अचानक बदलला. मातोश्रीवर झालेल्या बैठकीत शिवसेनेच्या अनेक नेत्यांनी आपल्या मूळ भूमिकेकडे वळण्याचा आग्रह धरला. त्यात ठाकरे गटाने पुन्हा हिंदूत्व हातात धरण्याची मागणी केली. गेल्या काही दिवसांत ठाकरे गटाची होणारी आंदोलने पाहीली तर ठाकरे गट पुन्हा प्रखर हिंदूत्वाकडे वळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. स्वतः उद्धव ठाकरेंनीही तसे संकेत दिले आहेत. म्हणजेच गेल्या वर्षभरात ठाकरेंच्या दोन भूमिका दिसल्या.

हिंदूत्वाचा फायदा होईल का?

ठाकरे गट आता पुन्हा हिंदूत्वाकडे वळणार असल्याची चिन्हे दिसत आहेत. मात्र हिंदूत्वाची वोट बँक आता पूर्णपणे भाजपच्या हातात गेल्याचे काही राजकीय विश्लेषक सांगतात. दुसरीकडे उर्वरीत हिंदूंची वोटबँक अगोदरच एकनाथ शिंदेंकडे वळालेली आहे. त्यामुळे शिवसेना ठाकरे गटाला हिंदूंची वोटबँक पुन्हा हातात घेण्यासाठी बराच संघर्ष करावा लागेल, असेही काहींचे म्हणणे आहे.

More From
Prev
Next
Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+