Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

नांदेडची सभा संपली अन् राहूल गांधी पोहोचले मध्यवर्ती बसस्थानकात खचाखच गर्दी अन् पुढं हे घडलं!

Rahul Gandhi reaches Nanded bus stand : राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु असतानाच काँग्रेस नेते आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहूल गांधी यांची आज नांदेडमध्ये जंगी सभा झाली. या सभेनंतर राहुल गांधी यांनी अचानक आपला ताफा मध्यवर्ती बसस्थानकाकडे वळवला अन् त्यांच्याभोवती गराडा पडला. पुढे सेल्फी काढण्यापासून ते रसवंतीत गप्पा-टप्पलांचा फडही रंगला. या गप्पा लोकांच्या रोजच्या जगण्यासंदर्भात होत्या.

सुरक्षा यंत्रणांची उडाली तारांबळ

नांदेडची सभा आटोपून सामान्य नागरिकांना भेटण्यासाठी विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे नांदेड येथील नवा मोंढा मैदानावरील सभा आटोपून थेट बसस्थानकाच्या दिशेने रवाना झाले. अचानक निघालेल्या या ताफ्याने शहरवासीय तसेच सुरक्षा यंत्रणांचीही तारांबळ उडाली. प्रवासी मध्यवर्ती बस स्थानकात बसची वाट पाहत असतानाच अचानक ते नांदेड मध्यवर्ती बसस्थानकात पोहोचले. हे पाहताच मोठ्या प्रमाणावर त्यांच्याभोवती गर्दी झाली.

Rahul Gandhi reaches Nanded bus stand

सेल्फीसाठी धडपड

नांदेड मध्यवर्ती बस स्थानकात पोहोचल्यानंतर त्यांनी प्रवाशांशी संवाद साधला. प्रवासीही त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद देत त्यांच्या भेटीसाठी पुढे येत होते. हस्तांदोलन करत होते तसेच सेल्फीसाठीही त्यांची धडपड सुरू होती. राहुल गांधी यांनी प्रवाशांशी संवाद साधत बस स्थानकात परिसरात असलेल्या एका रसवंती गृहात पोहोचले. रसवंती गृहात असलेल्या सामान्य नागरिकांसह रसवंती चालकासही त्यांना येणाऱ्या अडचणीविषयी चर्चा केली. त्यांच्या एकूण उत्पन्नाची माहिती घेतली.

हेही वाचा : नंदूरबारमध्ये राहुल गांधींची खटाखट आश्वासने, म्हणाले महिलांना आता...

महागाईच्या काळात खर्चाची तडजोड करताना काय अडचणी येतात याबाबत त्यांनी माहिती जाणून घेतली. एकूणच नांदेड बसस्थानकातील प्रवाशांना राहुल गांधीच्या भेटीचा सुखद धक्का अनुभवास मिळाला यावेळी नांदेड लोकसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार प्राध्यापक रवींद्र चव्हाण हेही उपस्थित होते.

महाराष्ट्रात सरकार आल्यास शेतकऱ्यांचे 3 लाखापर्यंतचे कर्ज माफ करू- राहुल गांधी

देशात सध्या संविधान वाचविण्याची लढाई सुरू आहे. एकीकडे इंडिया आघाडी तर दुसरीकडे आरएसएस, भाजपासह संघ विचारांचे पक्ष संविधानाला संपविण्याचे प्रयत्न करीत आहेत. मात्र हे आम्ही होऊ देणार नाही असा विश्वास संसदेतील विरोधी पक्ष नेते राहूल गांधी यांनी केले. त्याचवेळी महाराष्ट्रात सत्तेत आल्यास शेतकऱ्यांचे तीन लाखापर्यंतचे कर्ज माफ केले जाईल अशी घोषणा गांधी यांनी केली.

Rahul Gandhi reaches Nanded bus stand

नांदेडमध्ये लोकसभा पोटनिवडणूक आणि विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ झालेल्या सभेत ते बोलत होते. यावेळी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेनीथल्ला, सचिन पायलट यांची प्रमुख उपस्थिती होती.

महाराष्ट्रात सरकार आल्यास महालक्ष्मी योजनेअंतर्गत महिलांना दरमहा 3 हजार रुपये दिले जातील, महिलांसाठी राज्यात मोफत बस प्रवास केला जाईल, जातीय जनगणनेचे काम पूर्ण केले जाईल, बेरोजगारांना दरमहा 4 हजार रुपये भत्ता, राज्यात अडीच लाख शासकीय नोकऱ्या दिल्या जातील, शेतकऱ्यांचे तीन लाखापर्यंतचे कर्ज माफ केले जाईल तसेच आरक्षणाची 50 टक्क्यांची मर्यादा दूर केली जाईल असे आश्वासन यावेळी राहुल गांधी यांनी दिले

हेही वाचा : महाविकास आघाडी म्हणजे पैशाची जुगाडी, महाराष्ट्राला शाही घराण्याचे ATM बनवण्याचा काँग्रेसचा डाव- मोदी

केंद्र सरकार हे सामान्य नागरिकांसाठी काम करत नसून केवळ पंधरा ते वीस बड्या उद्योगपतींसाठी काम करीत असल्याचा आरोपही राहुल गांधी यांनी यावेळी केला. मुंबईतील धारावी झोपडपट्टी अदानीच्या घशात टाकण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. यासाठीच महाराष्ट्रातील सरकार पाडले गेल्याचा आरोपही त्यांनी केला. या प्रकल्पातून अडाणींना एक लाख कोटी रुपयांचा नफा पोहोचविण्याचा उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले.

हेही वाचा : दीड हजार दिले, महायुतीला मत दिले नाही तर 3 हजार वसुल करु! कोल्हापुरात भाजप महिला नेत्याचं वक्तव्य

महाराष्ट्रातील सरकार पाडण्याच्या बैठकीत अदानी यांची उपस्थिती होती असेही ते म्हणाले. महाराष्ट्रातील उद्योग गुजरातमध्ये पळविले जात असताना येथील सरकार काय करत आहेत असा सवालही त्यांनी केला. देशात आज लघुउद्योग बंद पडले आहेत, जीएसटी योग्य पद्धतीने आकारली जात नाही, छोट्या छोट्या व्यापारी तसेच शेतकऱ्यांना संपविण्याचे या सरकारचे धोरण असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. बड्या उद्योगपतींचे कर्ज माफ होते तर शेतकऱ्यांचे कर्ज का माफ होत नाही असे ते म्हणाले. देशात निधीचे वाटप समान पद्धतीने होत नाही असा आरोपही त्यांनी केला.

More From
Prev
Next
Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+