महाविकास आघाडी म्हणजे पैशाची जुगाडी, महाराष्ट्राला शाही घराण्याचे ATM बनवण्याचा काँग्रेसचा डाव- मोदी
Narendra Modi Akola Pracharsabha : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची अकोला येथे प्रचार सभा झाली. या सभेत त्यांनी काँग्रेसवर आपल्या शासनातील राज्यांचे आर्थिक स्रोत म्हणून शोषण केल्याचा आरोप केला, "जेथे काँग्रेसचे सरकार स्थापन होते, ते राज्य पक्षाच्या 'शाही परिवारा'चे (राजघराण्याचे) एटीएम (ऑटोमेटेड टेलर मशीन) बनते. महाराष्ट्र काँग्रेसचे एटीएम होऊ देऊ नका, असे म्हणत त्यांनी काँग्रेस आणि महाविकास आघाडीवर शरसंधान साधले.
'सबका साथ, सबका विकास' या विचारधारेवरच केंद्र सरकार काम करत आहेत. काँग्रेस आणि महाविकास आघाडीवाल्यांनी दशकांपासून लोकांची मागणी पूर्ण होऊ दिली नाही. ती मागणी आम्ही काही दिवसांत पूर्ण केली. आम्ही मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्याची संधी मिळाली. केंद्रात एनडीए सरकार तेज गतीने चालू आहे. तितक्याच तेजगतीने महाराष्ट्रात महायुतीची सरकार पुन्हा आले पाहिजे, म्हणून मी तुमच्याकडे आशीर्वाद मागण्यांसाठी आलो आहे, असे नरेंद्र मोदी म्हणाले.
भाजपा महायुती आहे तर महाराष्ट्राची गती आहे, हा नारा गावागावांत गुंजत आहे. महिलांची सुरक्षा आणि महिलांसाठी संधी हा महायुतीचा मंत्र आहे, असेही मोदी म्हणाले. युवकांना लाखो रोजगार, महिलांना लाडकी बहीण योजना सुरू केली. त्यामुळे महाराष्ट्राच्या विकासाला डबल विकासाला गती देईल, असेही नरेंद्र मोदी म्हणाले.

महाविकास आघाडी म्हणजे भ्रष्टाचार
महायुतीच्या घोषणापत्राच्या मध्येच आता महाविकास आघाडीचा घोटाळा पत्र आले आहेत. महाविकास आघाडी म्हणजे पैशाची जुगाडी, महाआघाडी म्हणजे टोकन मनी, महाविकास आघाडी म्हणजे भ्रष्टाचार, असे म्हणत मोदींनी जोरदार हल्लाबोल केला.
जिथे कॉंग्रेस सरकार तिथे शाही परिवाराचे एटीएम
नरेंद्र मोदी म्हणाले की, जिथे कॉंग्रेसची सरकार आहे, ते राज्य कॉंग्रेसच्या शाही परिवारांचे एटीएम बनले आहेत. महाराष्ट्रात निवडणूक अन् कर्नाटकात डबल वसुली झाली आहे. म्हणजे कल्पना करु शकता की, कॉंग्रेस पार्टी घोटाळे करुन निवडणूक लढत आहे तर ती सरकार निर्माण झाल्यावर किती घोटाळा करेल. त्यामुळे महाराष्ट्रातील लोकांनी सतर्क राहण्याची गरज आहे. आपल्याला शाही घराण्याचे एटीएम महाराष्ट्राला करायचे नाही, असे म्हणत नरेंद्र मोदी यांनी जोरदार हल्लाबोल केला.
टेक्सटाईल पार्कमुळे विदर्भाच्या विकासाला गती मिळेल
अकोला कापूस उत्पादनासाठी ओळखले जाते. त्यामुळे टेक्सटाईल पार्कचा भूमीपूजन केलेले आहे. महाराष्ट्रात टेक्सटाईल पार्क हे महाराष्ट्राला समृद्धीकडे घेऊन जाईल. येथे किती वर्ष कॉंग्रेसची सरकार होती. परंतु महाराष्ट्र व विदर्भाची संकट संपवले नाही. परंतु कॉंग्रेस नेत्यांनी आपली खिसे भरले. देवेंद्र फडणवीस यांनी ज्या योजना केल्या होत्या. सिंचनासंदर्भात योजनांना पुन्हा महायुतीच्या सरकारने गती दिली.
महायुतीच्या सरकारने विदर्भाची पाण्याची चिंता मिटवली
नरेंद्र मोदी म्हणाले की, वैनगंगा-पैनगंगा योजनांमुळे अमरावती, अकोला, बुलढाणा, नागपूर, वर्धा, वाशिम या जिल्ह्यातील पाण्याची समस्या दूर होत आहे. या वेनगंगा योजनेसाठी ९० हजार कोटी रुपये खर्च झाले आहेत. यामुळे महाराष्ट्रातील पाण्याची टंचाई दूर होईल आणि उत्पादन डबल होणार आहे. पीएम कृषी सिंचन योजनेच्या अंतर्गत सुक्ष्म सिंचनाला देखील गती दिली जात आहे. शेतकरी स्वत:इतका सशक्त झाला पाहिजे की तो देशाच्या प्रगतीचा मुख्य भाग बनला पाहिजे. महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना सुजलाम सुफलाम करण्यासाठी महायुती सरकार चांगले काम करत आहे. कॉंग्रेसला माहिती आहे की, देश जितका कमजोर होईल, तितकी कॉंग्रेस पार्टी मजबूत होईल. आणि देश कमजोर झाला की, जातीजातीत वाद घालण्याचे काम कॉग्रेस करत आहे.
घराघरात जाऊन सांगा, त्यांना पक्के घरे देणार
9 नोव्हेंबरला सुप्रीम कोर्टाने राम मंदिराचा निकाल दिला होता. त्या निकालानंतर सर्व धर्माच्या लोकांनी त्याचे स्वागत केले. नरेंद्र मोदी पुढे बोलताना म्हणाले की, वाढवण येथील होत असलेल्या पोर्ट हे भारतातील सर्वात मोठे बंदर होत आहे. महाराष्ट्राचा विकास अतिशय झपाट्याने होत आहे. तीन कोटी नवीन घरं बांधण्याला सुरुवात झाली आहे. यात महाराष्ट्रातील लाखो गरीबांचे पक्के घराचे स्वप्न पूर्ण होणार आहे. मग महायुतीला आशीर्वाद देणार की नाही देणार. गरीबांना घर मिळाले तर पुण्य कुणाला मिळणार आहे. ते पुण्य या मतदारांना मिळेल. कारण मतदारांनी जर मतदान केले नसते तर मोदींना ही संधीच मिळाली नसती. मोदी म्हणाले की, तुम्ही सर्व लोकांनी गावगावांत जा, लोकांना सांगा की, तुम्हाला पक्क घर मिळणार आहे, हा मोदींचा वादा आहे.












Click it and Unblock the Notifications