दीड हजार दिले, महायुतीला मत दिले नाही तर 3 हजार वसुल करु! कोल्हापुरात भाजप महिला नेत्याचं वक्तव्य
BJP leader Meghrani Jadhav's controversial statement : राजकीय रणधुमाळी सुरु असून राजकीय नेते बेताल वक्तव्य करण्यात काही कमी नाही. वाट्टेल ते बोलायला हे कमी करत नसून आता एका सभेतील महिला नेत्याने लाडकी बहिण योजनेच्या लाभार्थ्यांना सज्जड दम दिल्याचा एक व्हिडिओ समोर आला आहे. दीड हजार दिले, महायुतीला मत न दिल्यास 3 हजार वसूल करु, अशा वक्तव्याचा व्हिडिओ समोर आला आहे.
कोल्हापूर भाजपच्या महिला उपाध्यक्ष मेघाराणी जाधव यांनी हे वक्तव्य केल्याचे व्हिडिओतून दिसत आहे. त्यांच्या या वक्तव्याविरोधात राजकीय वातावरण तापले आहे.

महायुती सरकारनं लाडकी बहिण ही महत्वाकांक्षी योजना सुरु केली आहे. ही योजना राज्यात अत्यंत लोकप्रिय ठरली आहे. मात्र, योजनेबाबत महायुतीचे काही नेते वादग्रस्त वक्तव्य करताना आता दिसत आहे. गेल्या काही दिवसापूर्वी भाजप खासदार धनंजय महाडिक यांनी देखील वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यानंतर आता पुन्हा भाजपच्या महिला उपाध्यक्ष मेघारानी जाधव यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं आहे.
"1500 दिलेत, महायुतीला मत दिले नाही तर 3000 वसुल करणार... "
— Adv. Pradnya Pawar (@PradnyaPawar121) November 14, 2024
ह्या हरामखोर मिंदे सरकारच्या नेत्यांची मस्ती पहा. ह्यांची ही मस्ती मोडून काढावी लागेल. भाजप महायुतीचा पराभव करुन महाविकास आघाडीची सत्ता आणावी लागेल.#भाजप_हटाओ_महाराष्ट्र_बचाओ #AntiMaharashtraBJP #BJPhataoDeshBachao pic.twitter.com/xK9OsIdmXE
...तर 3 हजार वसूल करु!
करवीर पन्हाळा गगनबावडा विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार चंद्रदीप नरके यांच्या प्रचारार्थ गारीवाडे इथं आयोजित सभेत भाजपच्या महिला पदाधिकारी मेघारानी जाधव या आपले भाषण देत होत्या. त्यावेळी त्यांनी महिलांनो 1500 दिलेत, महायुतीला मत दिले नाही तर 3000 वसुल करणार अस वक्तव्यं केलं आहे. या वक्तव्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. यावर मोठ्या प्रमाणात टीका देखील होत आहे.
नेमके काय म्हणाल्या या महिला नेत्या
महिला नेत्या मेघारणी जाधव यांनी म्हटलं की, "बायकांनो तुम्हाला शपथ आहे तुम्ही आता जाताना सांगायचं की महायुतीलाच मतदान करायचं आणि जर का नाही केलसा इकडं तिकडं काही कळालं तर त्यांनी पंधराशे दिलं तुमच्याकडनं तीन हजार वसूल करणार"
धनंजय महाडिक यांनी देखील केलं होतं वादग्रस्त वक्तव्य
लाडकी बहिणी योजनेचे पंधराशे रुपये घेणाऱ्या महिला काँग्रेसच्या रॅली दिसल्या तर त्यांचे फोटो काढून घ्या, नावं लिहून घ्या. कारण घ्यायचं आपल्या शासनाचे आणि गायचं त्यांचं असं चालणार नाही. अनेक ताया आहेत, महाराष्ट्रात छाती बडवत आहेत. आम्हाला पैसे नको आम्हाला सुरक्षा पाहिजे म्हणत आहेत", असं वादग्रस्त वक्तव्य भाजपचे राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक यांनी केलं होतं. त्यानंतर आता पुन्हा भाजपच्या महिला पदाधिकाऱ्याने वादग्रस्त वक्तव्य केलं आहे.












Click it and Unblock the Notifications