हिंदी सक्तीच्या वादात फडणवीसांची उडी; ठाकरेंना धो-धो धुतले, पालिका निवडणूक व षडयंत्राचे राजकारण!

Devendra Fadnavis Attacks on Raj Thackeray Uddhav Thackeray Over Hindi Mandatory Issue : पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांना तृतीय भाषा म्हणून हिंदी शिकवण्याच्या डाव रचला जात आहे. हा हिंदी विषय सक्तीचे षडयंत्र आहे, असा आरोप राज ठाकरे (Raj Thackeray) आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावतीने करण्यात आला आहे.

त्यावरुन आता दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले असून 5 जुलै रोजी मुंबईत मोठा मोर्चा काढला जात आहे. या मोर्चावरुन आता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी जोरदार निशाणा साधला तर उद्धव ठाकरे व राज ठाकरे यांच्यावर घणाघात केला.

हिंदी सक्तीच्या वादावर काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ही केवळ राजकीय भूमिका आहे असे मी म्हणणार नाही. कोणाच्याही समोर प्रश्नचिन्ह निर्माण करणार नाही. मात्र महानगरपालिकेच्या निवडणुका नसत्या तर कदाचित इतका वेगळ्या पद्धतीने विरोध झाला नसता. असा दावा फडणवीस यांनी केला आहे.

मनसे प्रमुख राज ठाकरे हे माझे चांगले मित्र आहेत. म्हणून काय झाले? मात्र त्यांच्या काही भूमिका आहेत. तर माझ्या काही भूमिका आहेत. सर्वांच्या सारख्या भूमिका असत्या तर सर्व एका पक्षात राहिले असते. त्यामुळे भूमिका वेगळ्या असू शकतात.

Devendra Fadnavis

मात्र, उद्धव ठाकरेंचं वेगळंच असतं..!

मात्र उद्धव ठाकरे यांनी जर एखादा रिपोर्ट स्वीकारला आणि आता त्याच्या विरोधात ते बोलताय, तर याचा अर्थ केवळ राजकीयच आहे. या राज्यात माशेलकर, मुणगेकर, सुखदेव थोरात यांच्यासारख्या लोकांवर प्रश्नचिन्ह लावता येईल का? असा प्रतिप्रश्न फडणवीस यांनी विचारला आहे.

हे मराठीवरील प्रेम नव्हे तर राजकारण असल्याचा दावा!

देवेंद्र फडणवीस यांना राजकारण करायचय, त्यामुळे देवेंद्र फडणवीस काहीतरी करतोय. मात्र या लोकांना देखील राजकारण करायचे आहे का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

अशा लोकांनी जर एखादा रिपोर्ट दिला आणि तो तुम्ही स्वीकारला आहे. आता तुम्ही त्यालाच विरोध करता? याचा अर्थ मराठीचा प्रेम नाही तर राजकारण असल्याचा स्पष्ट आरोप देखील फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केला आहे.

हे ही वाचा : 'हिंदीला विरोध' केवळ हा एकमेव मुद्दा नव्हे, तर अशी 8 कारणं, ज्यामुळे राज-उद्धव ठाकरे येताहेत एकत्र?

हा मुद्दा भावनेपेक्षा वस्तुस्थिती समजून घेण्याचा!

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, राज्यातील संस्थांमध्ये प्रवेश तुम्ही ठरवाल. मात्र राष्ट्रीय पातळीवरील संस्थांमध्ये सर्व निवड सीईटीच्या द्वारे होते. यात आपण मराठी मुलांचे नुकसान करत असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. हा मुद्दा भावनेपेक्षा वस्तुस्थिती समजून घ्यायचा आहे, असे आवाहन देखील त्यांनी केले.

सत्तेत असताना वस्तुस्थिती समजून घ्यायची, कमिटी तयार करायची, त्यांचा रिपोर्ट स्विकारायचा, आणि विरोधी पक्षात गेल्यानंतर भूमिका बदलायची? अशा शब्दात विविध फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.

Take a Poll

गुजरातमध्येही तिसरीपासून हिंदी भाषा

महाराष्ट्रातील काही विद्वानांनी गुजरातमध्ये तिसरी भाषा शिकवली जाते का? यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. मात्र, गुजरात राज्यामध्ये देखील तिसऱ्या वर्गापासून हिंदी भाषा शिकवली जात आहे.

हिंदीला त्यांनी संस्कृत आणि इतर भाषांचे देखील पर्याय दिलेले आहेत, असे म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी भाषेवरून गुजरातकडे बोट दाखवणाऱ्या नेत्यांवर देखील थेट निशाणा साधला आहे.

हे ही वाचा : सरकारचे धोरणच मान्य नाही! हिंदी सक्तीवरुन राज ठाकरेंचा एल्गार; 'या' दिवशी करणार मुंबई शहर जाम!

परकीय भाषा हवी मग भारतीय हिंदी का नको?

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना हिंदी विषय शिकवण्याच्या निर्णयामागचे कारणही सांगितले. यामागे एक सायंटिफिक प्रोसेस आहे. या प्रोसेस मध्ये आपले विद्यार्थी पुढे कसे गेले पाहिजे, या दृष्टिकोनातून तयार केलेले त्रिभाषा सूत्र आहे. ते तयार करत असताना विद्यार्थ्यांची बुद्धी सर्वात जास्त कधी चालते, भाषा शिकण्याची शक्यता कधी अधिक असते. या संदर्भातले रिसर्च करून त्या कालावधीमध्ये त्यांना भाषा शिकवल्या तर ते अधिकच्या भाषा शिकू शकतात, अशा प्रकारचा मुद्दा समोर आला.

हे ही वाचा : हिंदीच्या सक्तीवरुन महायुती सरकारमध्येच मतभेद; अजित दादांची भूमिका वेगळी अन् शिंदेंचा भाजपला पाठिंबा

हिंदी सक्तीला विरोध नाही तर हिंदीलाच विरोध!

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, हा आमच्यासाठी प्रतिष्ठेचा विषय नाही. कुठलीही भाषा शिका, हिंदीच शिकली पाहिजे असे नाही. हे आम्ही एका मिनिटात सांगितले.

मुळात, हिंदी सक्तीला यांचा विरोध नाही तर यांचा विरोध केवळ हिंदीला आहे. भारतामध्ये तुम्हाला इंग्रजी चालते, तीला तुमचा विरोध नाही. परकीय भाषा चालते मग भारतीय हिंदी का चालत नाही? असा प्रश्न देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+