हिंदी सक्तीवर ठाकरे गटाची भूमिका काय?, आदित्य ठाकरे म्हणाले- मुलं भार सहन करतील का, मराठी देखील..
Aditya Thackeray first reaction on Hindi language mandatory in Maharashtra : नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची यंदापासून अंमलबजावणी करण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला आहे. त्यानुसार पहिलीपासून हिंदी अनिवार्य करण्यात येणार आहे. दरम्यान, हिंदी भाषा अनिवार्य करण्याला काही राजकीय पक्षांनी विरोध केला आहे.
इयत्ता पहिली ते पाचवीसाठी मराठी व इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये हिंदी ही तृतीय भाषा म्हणून अनिवार्य करण्याला राज्यातील सात शिक्षक संघटनांनी याला विरोध केला आहे. यातच आता ठाकरे गटाची हिंदी भाषा सक्तीव भूमिका काय, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. त्यावर आता आदित्य ठाकरें यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली. आदित्य ठाकरे नेमकं काय म्हणाले, चला तर जाणून घेऊया...!

देवेंद्र फडणवीसांनी नवीन शैक्षणिक धोरणाला पाठिंबा दर्शविला
हिंदी भाषेच्या सक्तीवरून राजकीय वर्तुळात संमिश्र प्रतिक्रिया उमटत असल्याचे पाहायला मिळत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नव्या शिक्षण धोरणातील तरतुदींना पाठिंबा दर्शवला. दुसकीकडे, महाविकास आघाडीसह महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी हिंदी सक्तीला कडाडून विरोध दर्शवला आहे. यासंदर्भात मनसेने आक्रमक भूमिका मांडली आंदोलनाचा देखील इशारा दिलेला आहे.
हे ही वाचा : हिंदी सक्तीवरुन महाराष्ट्रात खडाजंगी; राज ठाकरेंचा विरोध, अजित पवार म्हणाले- काही लोकांना कामं नाही
आदित्य ठाकरेंनी काय भूमिका घेतली?
हिंदी भाषा सक्तीच्या मुद्द्यावर पत्रकारांनी आदित्य ठाकरेंना प्रश्न विचारला. त्यावर आदित्य ठाकरे म्हणाले की, आमचे मत स्पष्ट आहे की, महाराष्ट्रात सर्वांना मराठी आलेच पाहिजे. मराठी ही सक्तीची असायलाच पाहिजे. दुसरी भाषा जी महत्त्वाची आहे ती इंग्रजी. कारण ही जागतिक भाषा आहे. तिसरी भाषा मग हिंदी असेल किंवा इतर कोणती हे शिकणे महत्त्वाचे आहे. कारण ज्यांना जास्तीत जास्त भाषा येतात त्यांची प्रगतीही जास्त होते.
आपल्याकडे सर्वांत कठीण परीक्षा कोणती असते तर ती यूपीएससीची. तुम्ही कोणत्याही आयएएस, आयपीएस अधिकाऱ्याकडे पाहा. त्यांना मातृभाषा येते इंग्रजी येते, हिंदी येते आणि ते ज्या ठिकाणी सेवेत असतात तेथील स्थानिक भाषाही येते, असे आदित्य ठाकरेंनी नमूद केले.
हे ही वाचा : देवेंद्र फडणवीस यांचे नवीन शिक्षण धोरणाला पाठिंबा; राज ठाकरे यांचा हिंदी सक्तीला विरोध
मुल पहिल्या वर्गाला इतका भार सहन करतील का?
आदित्य ठाकरे म्हणाले, तुम्ही आमच्या शिक्षण व्यवस्थेकडे लक्ष दिले पाहिजे. ते मूल पहिल्या वर्गात इतका भार सहन करू शकेल का? त्याला अ, ब, क वाचता येईल का?, मुलांवर जास्त भार नसावा हे देखील लक्षात ठेवा.
प्रथम, शिक्षक भरतीचा प्रश्न सोडवावा. शाळांमध्ये मध्यान्ह भोजन, दिवे, पंखे नाहीत. या सर्व गोष्टींकडेही लक्ष द्या. मराठी सुरुवातीपासून आहे आणि शेवटपर्यंत राहील. त्यानंतर इंग्रजी असायला हवे. तंत्रज्ञानाकडे लक्ष द्या. मुलांचे भविष्य चांगले झाले पाहिजे, असेही आदित्य ठाकरे म्हणाले.
हे ही वाचा : 'हिंदी आपली राष्ट्रभाषा नाही', आर अश्विनच्या विधानावरुन पुन्हा वाद, चाहते संतापले
दोघांचा फायदा, यात लोक मरतील आपले काय जातेय?
आदित्य ठाकरे पुढे बोलताना म्हणाले की, या निर्णयाकडे राजकारणाच्या दृष्टीने पाहायचे झाले तर त्यात देखील मोठा योगायोग आहे. बघा, परवा ज्या भेटी-गाठी झाल्या, एकमेकांना आधार देण्यासाठी असतील. एकमेकांना आयडिया देण्यासाठी असतील. यातून एकच दिसते, कदाचित असा डाव असू शकतो.
बिहारची निवडणूक येत आहे, भाजपाला तिथे गरज आहे. नंतर मुंबई महानगरपालिकेची निवडणूक लागेल, तुम्ही हिंदीचा विषय घ्या, आम्ही मराठीचा घेतो. दोघांचा फायदा लोक मरतील यात आपले काय. आपले तर नीट चालेल असा विचार देखील असू शकते, असे म्हणत आदित्य ठाकरे यांनी राज ठाकरे व एकनाथ शिंदे यांच्या भेटीवरही थेट निशाणा साधला.












Click it and Unblock the Notifications