'हिंदी आपली राष्ट्रभाषा नाही', आर अश्विनच्या विधानावरुन पुन्हा वाद, चाहते संतापले
Ravichandran Ashwin : आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यापासून रविचंद्रन अश्विन वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत आहे. आर अश्विनचे एक विधान चाहत्यांमध्ये खूप चर्चेत आहे. अलिकडेच, एका खाजगी महाविद्यालयाच्या पदवीदान समारंभात अश्विनने हिंदी भाषेबद्दल एक विधान केले आहे. अश्विनच्या या विधानानंतर चाहत्यांनी त्याला सोशल मीडियावर ट्रोल करायला सुरुवात केली आहे.
'हिंदी आपली राष्ट्रभाषा नाही'
एका खाजगी महाविद्यालयीन कार्यक्रमात रविचंद्रन अश्विनने म्हणाला की, हिंदी ही भारताची राष्ट्रीय भाषा नसून एक अधिकृत भाषा आहे. त्यामुळे आता हिंदी भाषेवरुन पुन्हा वाद सुरू झाला आहे. महाविद्यालयीन पदवीदान समारंभात विद्यार्थ्यांना संबोधित करताना, अश्विनने विद्यार्थ्यांना विचारले की, तुम्हाला भाषण कोणत्या भाषेत ऐकायला आवडेल - इंग्रजी, तमिळ किंवा हिंदी. अश्विनने तिथे उपस्थित असलेल्या विद्यार्थ्यांना सांगितले की, मी हे सांगतो की, हिंदी ही आपली राष्ट्रभाषा नाही, ती एक अधिकृत भाषा आहे.

अश्विनबद्दल एका युजरने लिहिले की, अश्विनने असे बोलू नये? मला ते आवडत नाही. त्याने क्रिकेटरच राहिले पाहिजे. मला तो खूप आवडतो. तुम्ही जितक्या जास्त भाषा शिकाल तितके चांगले. आमच्या फोनमध्ये कोणत्याही भाषेचे भाषांतर त्वरित उपलब्ध आहे. काय समस्या आहे? भाषेचा प्रश्न लोकांवर सोडा.
अश्विनच्या विधानावर अनेक प्रतिक्रिया येत आहेत
भारतात हिंदीला अधिकृत भाषेचा दर्जा आहे, तर इतर भाषांनाही समान आदर आहे. संविधानात हे स्पष्ट केले आहे की, भारताला एकच राष्ट्रभाषा नाही. अशा परिस्थितीत, अश्विनचे हे विधान बऱ्याच प्रमाणात बरोबर आहे. अश्विनच्या या विधानानंतर सोशल मीडियावर विविध प्रकारच्या कमेंट येऊ लागल्या आहेत, काही चाहते अश्विनला पाठिंबा देताना दिसत आहेत तर काही चाहते त्याच्या विरोधात दिसत आहेत.
Tamil Nadu: Former off spinner Ravichandran Ashwin says, "...I thought I'd say it all. It's (Hindi) not our national language; It's an official language. Okay, anyway"
— IANS (@ians_india) January 10, 2025
(09/01/2025) pic.twitter.com/bR47icWZEU
भारतात कोणती भाषा सर्वात जास्त बोलली जाते?
काही चाहते सोशल मीडियावर अश्विनवर सतत राग व्यक्त करत आहेत. भारत हा विविधतेने नटलेला देश आहे आणि हीच त्याची सर्वात मोठी ओळख आहे. येथे अनेक भाषा आणि बोलल्या जातात, लिहिल्या जातात आणि वाचल्या जातात. अशा परिस्थितीत एका भाषेला राष्ट्रभाषेचा दर्जा देण्यात आलेला नाही. भारतातील मोठी लोकसंख्या हिंदी भाषिक आहे. परंतु मोठ्या संख्येने लोक हिंदी बोलत नाहीत आणि समजत नाहीत.












Click it and Unblock the Notifications