हिंदी सक्तीवरुन महाराष्ट्रात खडाजंगी; राज ठाकरेंचा विरोध, अजित पवार म्हणाले- काही लोकांना कामं नाही
Ajit Pawar Vs Raj Tachakre Over Hindi Language issue : नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार प्रत्येक राज्यातील शाळांमध्ये हिंदी भाषा अनिवार्य करण्याच्या सरकारच्या निर्णयावरुन आता महाराष्ट्रात राजकारण तापलं आहे.
राजकीय तसेच सामाजिक वर्तुळात यासंदर्भात चांगले वाईट पडसाद सध्या उमटू लागले आहेत. यात मुद्द्यात मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी जोरदार विरोध दर्शविला. तर दुसरीकडे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नाव न घेता थेट राज ठाकरेंना टोला लगावला. चला तर जाणून घेऊया, राज ठाकरे काय म्हणाले अन् अजित पवार यांनी त्याला कसे प्रत्युत्तर दिले. नेमका हिंदी भाषेवरुन वाद कसा पेटला आहे. शासनाचे नवीन शिक्षण धोरण नेमकं काय आहे.
काय म्हणाले राज ठाकरे हिंदी भाषेवरुन?
राज ठाकरे यांनी हिंदी भाषेला महाराष्ट्रात अभ्यासक्रमात सक्तीचे करण्यावरुन तोंड उघडले. ते म्हणाले की, राज्य शालेय अभ्यासक्रम आराखडा 2024 नुसार महाराष्ट्रात पहिलीपासूनच हिंदी ही भाषा अनिवार्य करण्यात आली आहे. मी स्वच्छ शब्दांत सांगतो की ही सक्ती महाराष्ट्र नवनिर्माण सेना खपवून घेणार नाही.
राज ठाकरे पुढे बोलताना म्हणाले की, केंद्र सरकारचं सध्या जे सर्वत्र 'हिंदीकरण' करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. ते या राज्यात आम्ही यशस्वी होऊ देणार नाही. हिंदी ही काही राष्ट्रभाषा नाही. ती देशातील इतर भाषांसारखी एक राज्यभाषा आहे. ती महाराष्ट्रात का म्हणून पहिलीपासून शिकायची?

आम्ही हिंदू आहोत पण हिंदी नाही आहोत! महाराष्ट्रावर हिंदीकरणाचा मुलामा द्यायचा प्रयत्न कराल तर महाराष्ट्रात संघर्ष अटळ आहे. तुमचं त्रिभाषेचं सूत्र जे काही आहे ते सरकारी व्यवहारांपुरतंच मर्यादित ठेवा, त्याला शिक्षणापर्यंत आणू नका.
राज ठाकरे पुढे म्हणाले की, या देशात भाषावार प्रांतरचना झाली, आणि ती इतकी वर्ष टिकली. पण आत्ताच ही दुसऱ्या प्रांताची भाषा इथे महाराष्ट्रावर लादण्याचे प्रकार का केले जात आहेत. भाषावार प्रांतरचनेच्या तत्वालाच हरताळ फासला जात आहे, हे षडयंत्र नाही का?, असा सवाल देखील राज ठाकरेंनी उपस्थित केला.
काय म्हणाले अजित पवार?
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हिंदी भाषा सक्तीवर भाष्य केले. त्याचबरोबर भाष्य केले. तर त्यांनी नाव न घेता राज ठाकरेंना देखील टोला लगावला. अजित पवार म्हणाले की, सध्या समोरच्या राजकीय पक्षांना मुद्दा राहिलेला नाही. त्यामुळे ते उगाच वाद घालत आहेत.
अजित पवार म्हणाले की, सध्या कुणाला उद्योग नाही. मराठी आपली मातृभाषा आहेच. त्याबद्दल कोणाचं दुमत नाही. प्रत्येक राज्याला आपली मातृभाषा असते. त्याविषयी आपुलकी, प्रेम आणि जिव्हाळा असतो. तो टिकला पाहिजे. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा पंतप्रधान मोदी साहेबांनी दिला. खूप वर्षे दिल्लीत हे प्रकरण पडून होतं, ते कोणी करण्याचं धाडस दाखवलं नाही. ते एनडीए सरकारने, मोदी साहेबांनी दाखवला. आता मराठी भाषा भवन मरीन ड्राईव्हला चांगल्या प्रकारची वास्तू तयार केली जात आहे.
दुसरे गोष्ट म्हणजे जगात सर्वाधिक बोलणारी भाषा इंग्रजी आहे. ती तर शिकलीच पाहिजे, त्याचबरोबर घरात नवीन पिढीला महाराष्ट्रात राहायचं असेल तर मराठी आलंच पाहिजे. त्याहून पुढे भारतामध्ये अनेक राज्यांमध्ये हिंदी पण चालतं. काही जण म्हणतात हिंदी राष्ट्रभाषा आहे, पण त्यावर वाद आहे, मला त्या वादात शिरायचं नाहीय. तिन्ही भाषेला महत्त्व आहे. पण शेवटी स्वत:ची मातृभाषेला नंबर एकच स्थान आहे, असेही अजित पवार म्हणाले.












Click it and Unblock the Notifications