Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

"ठाकरे बंधूंचा जीव फक्त मुंबईत, उद्देश केवळ भ्रष्टाचार"; देवेंद्र फडणवीसांचा घणाघात

Devendra Fadnavis Targets Raj and Uddhav Thackeray : "उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचा जीव फक्त मुंबईतच अडकला आहे. त्यांना मुंबईबाहेरच्या महाराष्ट्राशी देणंघेणं नाही, कारण त्यांना मुंबई महानगरपालिका काबीज करून फक्त भ्रष्टाचार करायचा आहे," अशा तीव्र शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे बंधूंवर हल्लाबोल केला.

आगामी महापालिका निवडणुकीच्या तोंडावर एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत फडणवीसांनी भाजपची रणनीती आणि विरोधकांवरील आरोपांची धार स्पष्ट केली.

Devendra Fadnavis Targets Raj and Uddhav Thackeray

"भ्रष्टाचार आणि सोन्याचं अंडं देणारी कोंबडी"

फडणवीस यांच्या मते, गेल्या २५ वर्षांपासून मुंबई महानगरपालिका ही विशिष्ट गटासाठी 'सोन्याचं अंडं देणारी कोंबडी' ठरली आहे.

ठाकरे गटाने मुंबईत पद्धतशीरपणे भ्रष्टाचाराची साखळी निर्माण केली आहे. रस्ते घोटाळा, खड्डे आणि कोविड काळातील 'बॉडी बॅग' घोटाळा ही त्याचीच उदाहरणे आहेत. महापालिकेत महायुतीचा महापौर बसवून ही भ्रष्टाचाराची साखळी मोडीत काढणे, हे भाजपचे मुख्य उद्दिष्ट असेल.

मराठी अस्मिता विरुद्ध सर्वसमावेशकता

ठाकरे बंधूंकडून उपस्थित केल्या जाणाऱ्या 'मराठी' कार्डाला फडणवीसांनी सडेतोड उत्तर दिले आहे.

अस्मितेचा प्रश्न: "मी काय उत्तर प्रदेश किंवा पाकिस्तानमधून आलो आहे का? मी नागपूरचा आहे आणि मी सुद्धा मराठीच आहे," असे ठणकावून सांगत त्यांनी मराठी अस्मितेवर भाजपचाही तितकाच हक्क असल्याचे स्पष्ट केले.

उत्तर भारतीय मतदार: राज आणि उद्धव ठाकरे यांना उत्तर भारतीयांबद्दल इतका आकस का? असा सवाल करत त्यांनी "सगळ्या हिंदूंनी एकत्र राहिले पाहिजे" हा संदेश दिला. मुंबईतील भाजपच्या १५-१६ जागा या मराठी लोकांच्या पाठिंब्याशिवाय शक्य नव्हत्या, हे त्यांनी आकडेवारीनिशी मांडले.

'ब्रँड ठाकरे' विरुद्ध 'विकास'

फडणवीस यांनी 'ब्रँड ठाकरे' या विषयावर बोलताना थेट एकनाथ शिंदे यांना समर्थन दिले. महाराष्ट्रात फक्त एकच ब्रँड आहे, तो म्हणजे हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे. हा ब्रँड आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे आहे.

वचननामा की वाचूननामा: ठाकरे बंधूंनी जाहीर केलेला जाहीरनामा हा 'वचननामा' नसून 'वाचूननामा' आहे, कारण त्यांनी जुनी एकही वचने पूर्ण केलेली नाहीत, अशी टीका फडणवीसांनी केली.

विकासाचे व्हिजन: १७ हजार कोटींचा आराखडा

भाजप केवळ आरोपांवर न थांबता विकासाचा अजेंडा पुढे करत आहे. पुढील ५ वर्षांत मुंबईच्या विकासासाठी १७ हजार कोटी रुपये खर्च करण्याचा दावा फडणवीसांनी केला आहे.

केंद्राचे बळ: मुंबईच्या मेट्रो प्रकल्पांसाठी आणि पायाभूत सुविधांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे नाव आणि केंद्राचा निधी पुरेसा आहे. प्रचारासाठी केंद्रातील बड्या नेत्यांना आणण्याची गरज नाही, इतका आत्मविश्वास त्यांनी व्यक्त केला.

'व्होटबँक' आणि 'बुरखेवाली महापौर'

वारिस पठाण यांच्या 'बुरखेवाली महापौर' या विधानाचा दाखला देत फडणवीसांनी ठाकरे गटाच्या 'हिंदुत्वा'वर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. "जेव्हा बुरखेवाली महापौर होईल असं म्हटलं जातं, तेव्हा ठाकरे बंधू गप्प का बसतात? हे निव्वळ व्होटबँकेचे राजकारण आहे," असा आरोप त्यांनी केला.

More From
Prev
Next
Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+