मोबाईल ग्राहकांचा होणार मोठा फायदा! आता कॉल, SMS साठी वेगळे प्लॅन येणार; TRAI ने घेतला 'हा' निर्णय
TRAI's decision to separate plans for calling and SMS : भारतीय दुरसंचार कंपन्यांकडून काॅलिंग आणि डेटा प्लॅन एकत्रच दिला जात आहे. त्यामुळे ज्यांच्याकडे मल्डिमिडीया,अँड्राईड मोबाईल नाही, साधेच मोबाईल आहे अशांसाठी नुकसान सहन करावे लागत आहे. शिवाय वायफाय वापरणाऱ्यांनाही काॅलिंग, एसएमएससह डेटा समाविष्ट असलेला प्लॅन घ्यावा लागत आहे. ही बाब आणि यासह ग्राहकांच्या हिताचा विचार करता ट्रायने एक मोठा निर्णय घेतला आहे.
देशभरातली कोट्यवधी वापरकर्त्यांसाठी भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने (TRAI) मोबाइल ऑपरेटर्सना फक्त व्हॉइस कॉलिंग आणि एसएमएसचा लाभ देणाऱ्या रिचार्ज योजना सुरू करणे अनिवार्य केले आहे. या योजना इंटरनेट डेटा एकत्रित करून देऊ नयेत असेही ट्रायने म्हटले आहे.

या निर्णयामुळे ग्राहकांचे पैसे वाचणार?
भारतीय दूरसंचार कंपन्यांकडून दिले जाणारे सर्व रिचार्ज योजनांमध्ये इंटरनेट किंवा डेटा दिला जात आहे. तो घेणे अनिवार्यच आहे. त्याशिवाय रिचार्ज प्लॅनच उपलब्ध नाही. बऱ्याचदा वापरकर्त्यांना डेटाची आवश्यकता नसते तरीही तो घ्यावा लागतो म्हणजेच जास्त पैसे मोजावे लागतात. ट्रायच्या निर्णयामुळे ग्राहकांना फक्त काॅलिंग आणि एसएमएस प्लॅन घ्यावे लागणार आहेत. म्हणजेच कोट्यवधी ग्राहकांचे पैसे वाचणार आहेत.
मोबाइल ऑपरेटर हे व्हाइस आणि एसएमएस संबंधीत बहुतांश योजनांबरोबर इंटरनेट किंवा डेटा प्लॅन्सच्या किंमती एकत्रित करून योजना देत आहेत. यामुळे महिन्याच्या प्लॅनची किंमत जास्तच महाग होत आहे. आता ट्रायने यामध्ये बदल करण्याचे आदेश दिले आहेत.
नवीन वर्षासाठी 'जिओ'ने आणला ग्राहकांसाठी फाडू रिचार्ज प्लॅन, इतक्या रुपयांची होणार बचत
ट्रायने सांगितेल की, त्यांनी सप्टेंबर-नोव्हेंबर 2022 कालावधीत ग्राहकांचे सर्वेक्षण केल्यानंतर हा निर्णय घेतला होता. यामुळे दुरसंचार ऑपरेटर्स, ग्राहक आणि इतरांसोबत चर्चा केल्यानंतर यासंबंधी एक पत्र जारी करण्यात आले होते. तब्बल 15 कोटी ग्राहक अजूनही फीचर फोनचा वापर करतात. या वापरकर्त्यांची मूलभूत गरज ही व्हॉइस आणि एसएमएस सेवा हीच असते असेही ट्रायने नमूद केले आहे.
मोबाईल वापरताना काय काळजी घ्यावी, वेळीच सावध व्हा नाहीतर तुमचा जीव गेलाच समजा, वाचा सविस्तर
ट्रायने सांगितले की, वेगवेगळ्या व्हॉइस आणि ओन्ली-एसएमएस व्हाउचर वयस्कर वापरकर्ते आणि खासकरून ग्रामीण भागात रहाणार्या वापरकर्त्यांना उपयोगी ठरेल. ग्राहकांना त्यांचा रिचार्ज प्लॅन डेटाशिवाय निवडण्याचा अधिकार असला पाहिजे. यामुळे व्हॉइस केंद्रित वापरकर्त्यांच्या गरजा पूर्ण करणे, परवडणाऱ्या योजना, फ्लेक्सिबिलिटी आणि कस्टमायजेशन यासह मार्केट सेगमेंटेशन यासारख्या विविध बाबींमध्ये मदत मिळेल. माहितीच्या अभावामुळे, विशेषतः ग्रामीण भागात वृद्ध लोक डेटा सेवा वापरण्यास कमी इच्छुक असतात असेही ट्रायने म्हटले आहे.
-
LPG सिलिंडरचा तुटवडा? घरगुती गॅससाठी प्रतीक्षा करावी लागणार; सरकारचा मोठा निर्णय, वाचा नवे नियम -
अजितदादांच्या निधनानंतर बारामती पोटनिवडणुकीची तयारी; मतदार यादी जाहीर, 'बिनविरोध'साठी हालचाली! -
पुण्यात गॅसवरची दाहिनी बंद! घरगुती सिलेंडरसाठी 'एवढे' दिवस वाट पाहावी लागणार, हॉटेलंवर टंचाईचे सावट -
मंगळवार,10 मार्च 2026 चे राशीभविष्य: 'या' राशींना होणार धनलाभ, कोणासाठी शुभ तर कोणासाठी अशुभ? वाचा -
संभाजीनगरचा प्रसिद्ध रील स्टार अरुण तुपेचं संशयास्पद निधन; राहत्या घरात आढळला मृतदेह, नेमकं काय घडलं -
वर्ल्ड कप जिंकून हा क्रिकेटर ट्रेनने घरी परतला! "टीसीने पकडले असते पण बायकोने..." पहा काय घडलं? -
Daily Horoscope 11 मार्च 2026 : आजचे राशीभविष्य, 'या' राशींना मिळणार नवीन संधी आणि जीवनात यश! -
IND vs NZ: बुमराह, अन् अक्षरचा फायनलमध्ये जलवा; न्युझीलंडच्या फलंदाजांना कसं केलं गारद? वाचा -
"सुप्रीम कोर्टात फक्त बंगालचीच प्रकरणे आहेत का?"; पश्चिम बंगाल SIR प्रकरणावर सरन्यायाधीशांचा संताप -
घरगुती सिलिंडर बुकिंगच्या नियमांत मोठा बदल; साठेबाजी रोखण्यासाठी सरकारने घेतला हा निर्णय -
इराण-अमेरिका युद्ध पेटलं! अमेरिकेने उद्ध्वस्त केल्या इराणच्या 'एवढ्या' युद्धनौका; तेलपुरवठा धोक्यात -
नंदकिशोर कागलीवाल यांचा गौरव; राजस्थान राज्य कृषी विद्यापीठाकडून मानद 'डॉक्टरेट' प्रदान










Click it and Unblock the Notifications