मोबाईल वापरताना काय काळजी घ्यावी, वेळीच सावध व्हा नाहीतर तुमचा जीव गेलाच समजा, वाचा सविस्तर
How to use mobile phone properly : खिशात ठेवलेल्या मोबाईलचा अचानक स्फोट झाल्यानं त्यात गंभीर जखमी होऊन शिक्षकाचा मृत्यू झाला. तर त्याच्यासोबत असलेला नातेवाईक गंभीर जखमी झाल्याची घटना गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव तालुक्यातील सिरेगाव बांध या ठिकाणी शुक्रवारी दि.६ डिसेंबरला घडली. यासह अनेक घटना वारंवार मोबाईलच्या स्फोटामुळे होत असल्याचे उघडकीस आलेले आहे. तरी देखील आपण मोबाईल वापरताना योग्य ती काळजी घेत नाही, त्यामुळे तुम्ही वेळीच सावध व्हा, अन्यथा तुमचाही जीव गेलाच म्हणून समजा, असे म्हटले तरी वावगं ठरणार नाही.
गोंदिया जिल्ह्यात नेमकं काय घडलं?
खिशात ठेवलेल्या मोबाईलचा अचानक स्फोट झाल्यानं त्यात गंभीर जखमी होऊन शिक्षकाचा मृत्यू झाला. तर त्याच्यासोबत असलेला नातेवाईक गंभीर जखमी झाला. ही घटना गोंदिया जिल्ह्यात घडली. या घटनेत सुरेश संग्रामे (वय 55) असं मृतक शिक्षकाचं नाव आहे. तर नत्थु गायकवाड (56) असं गंभीर जखमी असलेल्या इसमाचं नाव आहे. मोबाईल स्फोटाच्या घटना वारंवार घडताना दिसून येत आहे. चला तर जाणून घेऊया, मोबाईल वापरताना काय काळजी घ्यावी, ज्यामुळे आपला जीव धोक्यात जाणार नाही.

या बाबींचे ठेवा विशेष ध्यान..!
- स्मार्टफोन कपडे, कापूस किंवा बेड अशा ज्वलनशील पदार्थांपासून दूर ठेवा.'
- फोनची बॅटरी रिप्लेस करायची असेल तर ओरीजनल ब्रँडची बॅटरीच लावा. कधीही स्वस्त आणि कमी दर्जाची बॅटरी आपल्या फोनसाठी वापरू नका.
- उशीखाली फोन ठेवून झोपणे अत्यंत धोकादायक आहे. कारण यामुळे फोनचे तापमान वाढते आणि त्यावर दाबही पडतो.
- जर फोन सतत वापरून गरम झाला असेल, तर त्याला नॉर्मल होऊ द्या. फोन गरम झाल्यानंतर सतत त्याचा वापर करू नका.
- फोन खराब झाल्यास लोकल शॉपवर दुरुस्त करू नका. कंपनीच्या सर्व्हिस सेंटरमध्येच फोन दुरुस्त करणे सुरक्षित असते. तिथे ओरिजनल पार्ट्स देखील मिळतात.
चार्जिंगसाठी या टिप्स करा फॉलो
- फोन चार्ज करत असताना त्यावर कोणतीही वस्तू ठेवलेली नाही किंवा त्यावर कशाचाही दाब पडत नाही ना याची खात्री करा.
- नेहमी फोनचा ओरिजनल चार्जर वापरा. ड्युप्लिकेट किंवा इतरांच्या फोनचा चार्जर वापरल्यास फोन आणि बॅटरीचे नुकसान होऊ शकतं.
- फोन चार्ज करताना त्यावर ऊन पडत नाही ना याची काळजी घ्या. यामुळे फोनचे नुकसान होऊ शकते.
- रात्रभर फोन चार्जिंगला लावून ठेवू नका. फोन आणि बॅटरीसाठी हानिकारक असतं. - फोन पॉवर सॉकेटद्वारे चार्ज करा. एक्स्टेंशनद्वारे चार्ज करणे टाळा.
ओडिशामघ्ये देखील झाला होता मोबाईलचा स्फोट
ओडिशामध्ये स्मार्टफोनच्या स्फोटात एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ओडिशातील पारादीपमध्ये ही घटना घडली. स्मार्टफोन चार्जिंगला लावून तरुण झोपला होता. बिछान्यावरच चार्जिंगला लावलेल्या फोनचा स्फोट झाला. या स्फोटात त्याचा मृत्यू झाला.
-
मंगळवार,10 मार्च 2026 चे राशीभविष्य: 'या' राशींना होणार धनलाभ, कोणासाठी शुभ तर कोणासाठी अशुभ? वाचा -
संभाजीनगरचा प्रसिद्ध रील स्टार अरुण तुपेचं संशयास्पद निधन; राहत्या घरात आढळला मृतदेह, नेमकं काय घडलं -
Daily Horoscope 11 मार्च 2026 : आजचे राशीभविष्य, 'या' राशींना मिळणार नवीन संधी आणि जीवनात यश! -
IND vs NZ: बुमराह, अन् अक्षरचा फायनलमध्ये जलवा; न्युझीलंडच्या फलंदाजांना कसं केलं गारद? वाचा -
"सुप्रीम कोर्टात फक्त बंगालचीच प्रकरणे आहेत का?"; पश्चिम बंगाल SIR प्रकरणावर सरन्यायाधीशांचा संताप -
घरगुती सिलिंडर बुकिंगच्या नियमांत मोठा बदल; साठेबाजी रोखण्यासाठी सरकारने घेतला हा निर्णय -
इराण-अमेरिका युद्ध पेटलं! अमेरिकेने उद्ध्वस्त केल्या इराणच्या 'एवढ्या' युद्धनौका; तेलपुरवठा धोक्यात -
नंदकिशोर कागलीवाल यांचा गौरव; राजस्थान राज्य कृषी विद्यापीठाकडून मानद 'डॉक्टरेट' प्रदान -
8 व्या वेतन आयोगाचा काउंटडाउन सुरू! सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर; पगारवाढीसाठी सरकारचा 'हा' प्लॅन -
लाडकी बहीण होणार 'लखपती'; बिनव्याजी कर्ज आणि व्यवसायाची संधी, मुख्यमंत्र्यांनी मांडला मेगा प्लॅन! -
सोने-चांदीचे दर घसरले! सोने 8,797 रुपयांनी; चांदी चक्क 29,700 रुपयांनी स्वस्त; का घसरत आहेत दर? वाचा -
IPL 2026 Schedule : आयपीएलचा थरार 'या' तारखेपासून! RCB विजयाचा गड राखणार का? वाचा संपूर्ण वेळापत्रक










Click it and Unblock the Notifications