नवीन वर्षासाठी 'जिओ'ने आणला ग्राहकांसाठी फाडू रिचार्ज प्लॅन, इतक्या रुपयांची होणार बचत
Jio New Recharge Plan for Customers : रिलायन्स जिओने आगामी नवीन वर्षानिमित्त आपल्या ग्राहकांसाठी एक खास रिचार्ज प्लॅन जाहीर केला आहे. नव्या रिचार्ज प्लॅनच्या माध्यमातून जिओ ग्राहकांना तब्बल २,०२५ रुपयात ४,३०० रुपयांचे फायदे मिळणार आहेत. रिलायन्स जिओने आपल्या दरवर्षीच्या न्यू ईयर प्लानची परंपरा कायम ठेवत यंदाही जबरदस्त प्लॅन बाजारात आणला आहे.
जिओच्या या रिचार्ज पॅकची किंमत केवळ 2025 रुपये असून या किंमतीत ग्राहकांना 4,300 रुपयांचे फायदे मिळणार आहेत. जिओ ग्राहकांसाठी नवा 'New Year Welcome Plan' मर्यादित काळासाठी उपलब्ध असणार आहे. नव्या रिचार्ज पॅकची मुदत केवळ एक महिन्याकरिता म्हणजेच दि. 11 डिसेंबर 2024 ते दि. 11 जानेवारी 2025 पर्यंत ग्राहकांसाठी उपलब्ध असणार आहे.

या खास रिचार्जची वैशिष्ट्ये
नवीन वर्षानिमित्त विशेष जिओ प्लॅनची मुदत - दि. 11 डिसेंबर 2024 ते 11 जानेवारी 2025 पर्यंत असेल. जिओच्या या प्लॅनची व्हॅलिडिटी 200 दिवस आहे. या प्लॅन अंतर्गत ग्राहकांना प्रतिदिन 2.5 जीबी डेटा ऑफर केला जात आहे.
यूजर्स एकूण 500 जीबी 4 जी डेटा या प्लॅनमध्ये वापरू शकणार आहेत. जिओ ग्राहकांना या रिचार्ज पॅकमध्ये अनलिमिटेड 5G नेटवर्कची सुविधा मिळणार आहे.
जिओच्या या प्लॅनमध्ये अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग आणि 100SMS प्रत्येक दिवशी ऑफर केले जातील. या रिचार्ज पॅकमध्ये 2150 रुपयांचे पार्टनर कूपन मिळतात. 500 रुपयांचे AJIO कूपन मिळतील, जे 2500 रुपयांच्या वरती खरेदीवर वापरता येतील.
150 रुपयांचे स्विगी कूपन जे ग्राहक कमीत कमी 499 च्या ऑर्डरच्या वरती वापरू शकतात. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी जिओ ने नेहमीच वेगवेगळे रिचार्ज प्लॅन्स उपलब्ध करून दिले आहेत.












Click it and Unblock the Notifications