पाकिस्तानचा 'खेळ' खल्लास? दिल्लीत हालचाली वाढल्या; हवाईदल, नौदल प्रमुखांशी PM मोदींशी सविस्तर चर्चा
PM Modi holds discussion with Air Force and Navy Chiefs : पहलगाम हल्ल्यानंतर भारताने कडक धोरण अवलंबत आहे, भारताने सिंधु जलकरार रद्द केला, यानंतर आता पाणी सोडणेही थांबवण्याची प्रक्रिया सुरु केली आहे. अशातच आता दिल्लीत मोठ्या हालचाली वाढल्या आहेत.
पाकिस्तानी कुरापतींना तोंड देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हवाईदल आणि नौदल प्रमुखांशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची बैठक पार पडली. या बैठकीत पीएम मोदींनी महत्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा केली.

नौदल प्रमुखांशी चर्चेत काय झाले?
इंडियन एक्सप्रेसच्या हवाल्याने लोकसत्ताने या संदर्भात वृत्त दिले. त्यानुसार, आधी नौदल प्रमुख अॅडमीरल दिनेश के. त्रिपाठी आणि यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी सविस्तर चर्चा केली. त्यात अरबी समुद्रातील नौदलाची कशी तयारी आहे तसेच तैनातीवर त्यांनी पंतप्रधानांना माहिती दिली आहे.
नौदलाच्या पश्चिमेकडील सर्व युद्धनौका सध्या अरबी समुद्रात उतरवण्यात आल्या आहेत. भारतीय नौदल अरबीसमुद्रात सर्व साम्रगीसह सज्ज आहे आणि केंद्र सरकारच्या आदेशानुसार, गरजेची कार्यवाही करेल असे या वृत्तात म्हटले आहे.
हेही वाचा : Who is Dr Madri Kokati : कोण आहेत डाॅ. माद्री कोकाटी? पहलगाम हल्ल्यानंतर त्यांचे काय होते वक्तव्य
हवाईदल प्रमुखांशी चर्चा
दरम्यान, या बैठकीसंदर्भात लष्कराच्या तयारीची सविस्तर माहिती घेण्यात आली आहे मात्र, संरक्षण मंत्रालय अथवा केंद्र सरकारकडून याबाबत कोणत्याही प्रकारची अधिकृत निवेदन जारी झालेले नाही. पहलगाम हल्ल्यानंतर भारतीय हवाईदल सज्ज असून हवाईदलाच्या वैमानिकांनी सरावही केला आहे. या पार्श्वभुमीवर पंतप्रधान हवाई दलाची तयारी काय आहे याबाबत पंतप्रधानांनी हवाईदल प्रमुखांशी चर्चा केली आहे.
हेही वाचा : पहलगाम हल्ल्यानंतर अमेरिकी विदेश मंत्र्यांचा जयशंकर अन् पाकच्या पंतप्रधानांना फोन! काय झालं बोलणं?
पाकिस्तानवर सर्जिकल स्ट्राईक होईल का?
पुलवामा, उरी येथे झालेल्या हल्ल्यात अनेक भारतीय सैनिक शहीद झाले होते. पाकिस्तानने आपल्या कुरापती सोडल्या नसून त्यांनी असे हल्ले दहशतवाद्यांमार्फत वारंवार घडवून आणले आहेत. त्यामुळे या हल्ल्याला सर्जिकल स्ट्राईकने भारताने उत्तर दिले होते, आता पुन्हा भारत याच स्टाईलने उत्तर देऊ शकतात असे या क्षेत्रातील तज्ज्ञांचा अंदाज आहे देशवासीयांचीही हीच भावना आहे. त्यामुळे आगामी काळात पु्न्हा पाकिस्तानमध्ये घुसून सर्जिकल स्ट्राईक होऊ शकते.
हेही वाचा : 'पाकिस्तान को नानी याद आएगी!' भारताने एक पाऊलं उचललं तर अवघ्या 300 मिनिटांत 3 लाख लोक झाले कंगाल!
हेही वाचा : फ्रान्सला जाताना PM मोदींचे विमान 46 मिनिटे पाकिस्तानात का थांबले?, इस्लामाबादमध्ये उडाली खळबळ?












Click it and Unblock the Notifications