पहलगाम हल्ल्यानंतर अमेरिकी विदेश मंत्र्यांचा जयशंकर अन् पाकच्या पंतप्रधानांना फोन! काय झालं बोलणं?
Pahalgam attack US Foreign Minister calls Jaishankar and Pakistan PM : पहलगाम येथे झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानचे संबंध जास्तच तणावाचे बनले आहेत. अशातच पाकिस्तानने त्यांच्या हवाई हद्दीतून भारतीय विमानांना परवानगी नाकारली असून याला भारतानेही जशास तसे प्रत्युत्तर दिले आहे. आपली हवाई हल्ल पाकिस्तानसाठी 23 मेपर्यंत बंद केली आहे.
तर दुसरीकडे भारत आणि पाकिस्तान यांच्या तणावादरम्यान अमेरिकन विदेश मंत्री मार्क रुबियो यांनी भारतीय परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर आणि पाकिस्तानचे पंतप्रधान शहाबाज शरीफ यांना वेगवेगळे काॅल केला आहेत. यासंबंधी एनआयएने माहिती दिली आहे.

एस. जयशंकर यांच्याशी काय झाली चर्चा?
एनआयएनुसार, अमेरिकेचे परराष्ट्र सचिव मार्को रुबियो यांनी आज भारताचे परराष्ट्र मंत्री डॉ. एस जयशंकर यांच्याशी चर्चा केली. पहलगाम येथील भयानक दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या लोकांबद्दल सचिवांनी दुःख व्यक्त केले आणि दहशतवादाविरुद्ध भारतासोबत सहकार्य करण्याच्या अमेरिकेच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला आहे. तसेच पहलगाम दहशतवादी हल्ल्याचे गुन्हेगार, समर्थक आणि योजना आखणाऱ्यांना न्यायाच्या चौकटीत आणले पाहिजे."
Secretary of State Marco Rubio spoke with Indian External Affairs Minister Dr S Jaishankar today. The Secretary expressed his sorrow for the lives lost in the horrific terrorist attack in Pahalgam, and reaffirmed the United States' commitment to cooperation with India against…
— ANI (@ANI) April 30, 2025
त्यांनी भारताला तणाव कमी करण्यासाठी आणि दक्षिण आशियात शांतता आणि सुरक्षितता राखण्यासाठी पाकिस्तानसोबत काम करण्यास प्रोत्साहित केले, अशी माहिती अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाचे प्रवक्ते टॅमी ब्रुस यांच्याकडून प्राप्त झाली आहे.
पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्याशी काय झाली बातचित?
प्रवक्ते टॅमी ब्रूस यांनी यांच्या माहितीनुसार, आज, सचिव मार्को रुबियो यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान मुहम्मद शेहबाज शरीफ यांच्याशी चर्चा केली आणि पाकिस्तानला तणाव कमी करण्यासाठी, थेट संवाद पुन्हा स्थापित करण्यासाठी आणि दक्षिण आशियात शांतता आणि सुरक्षितता राखण्यासाठी भारतासोबत काम करण्याचे आवाहन केले आहे.
Today, Secretary Marco Rubio spoke with Pakistan's Prime Minister Muhammad Shehbaz Sharif and encouraged Pakistan to work with India to de-escalate tensions, re-establish direct communications, and maintain peace and security in South Asia: US State Department spokesperson Tammy…
— ANI (@ANI) April 30, 2025
हल्ल्याचा निषेध करण्याची गरज
पहलगाम येथे 22 एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा निषेध करण्याची गरज असल्याचे सचिवांनी सांगितले. दोन्ही नेत्यांनी दहशतवाद्यांना त्यांच्या हिंसाचाराच्या भयावह कृत्यांसाठी जबाबदार धरण्याच्या त्यांच्या सततच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला. या बेजबाबदार हल्ल्याच्या चौकशीत पाकिस्तानी अधिकाऱ्यांच्या सहकार्याचे आवाहन सचिवांनी केले आहे.












Click it and Unblock the Notifications