Who is Dr Madri Kokati : कोण आहेत डाॅ. माद्री कोकाटी? पहलगाम हल्ल्यानंतर त्यांचे काय होते वक्तव्य

Who is Dr Madri Kokati original state education : जम्मू आणि काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम येथे बैसरन खोऱ्यात 22 एप्रिल 2025 रोजी भीषण दहशतवादी हल्ला झाला. यानंतर संपूर्ण देश संतप्त आहे.

दरम्यान, लखनऊ विद्यापीठाच्या सहाय्यक प्राध्यापक डॉ. माद्री काकोटी यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला, ज्यामध्ये त्यांनी धर्माच्या नावाखाली होणाऱ्या भेदभावाला दहशतवाद म्हटले आहे. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर त्याच्याविरुद्ध देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Who is Dr Madri Kokati

गुन्हा दाखल होताच डाॅ. माद्री कोकोटींचा होताच युटर्न

डॉ.माद्री कोकाटी यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांनी युटर्न घेतला. डॉ. माद्री काकोटी यांनी एक पोस्ट लिहून यू-टर्न घेतला आहे. त्यांनी सोशल मीडियावरील त्यांच्या पोस्टमध्ये लिहिले की, "मी केलेल्या ट्विट आणि व्हिडिओमध्ये, दहशतवादी हा शब्द फक्त आणि फक्त पाकिस्तानने समर्थित आणि प्रायोजित केलेल्या दहशतवाद्यांसाठी आहे, ज्यांनी पहलगाममध्ये भारतीयांचा धर्म विचारून त्यांची क्रूर हत्या केली." अशी डाॅ. माद्री कोकाटी यांनी त्यांची बाजू मांडली.

हेही वाचा : भारताशी युद्धाचा धोका, पाकिस्तानी सैन्यात घबराहट? सेनाप्रमुख मुनीर यांनी कुटुंबाला पाठवले युरोपात

पहलगाम हल्ल्यानंतर डॉ. माद्री यांनी काय म्हटले होते?

पहलगाम हल्ल्यानंतर डॉ. माद्री काकोटी यांनी त्यांच्या व्हिडिओमध्ये सरकारवर टीका केली होती. "धर्म विचारल्यानंतर गोळीबार करणे हा दहशतवाद आहे आणि धर्म विचारल्यानंतर लिंचिंग करणे, नोकरीवरून काढून टाकणे, घर न देणे किंवा त्यांच्या घरावर बुलडोझर चालवणे हे देखील दहशतवाद आहे, खरा दहशतवादी ओळखा."

कोण आहेत डाॅ. माद्री कोकाटी?

  • डॉ. माद्री काकोटी या लखनऊ विद्यापीठात सहाय्यक प्राध्यापक आहेत.
  • डॉ. माद्री काकोटी या सोशल मीडियावर डॉ. मेडुसा या नावाने प्रसिद्ध आहे.
  • जवाहरलाल नेहरू विद्यापीठ 2011 मध्ये पदव्युत्तर पदवी त्यांनी प्राप्त केली आहे.
  • दिल्ली विद्यापीठात 2007 मध्ये कला शाखेची पदवी त्यांनी प्राप्त केली आहे.
  • डॉ. माद्री काकोटी अनेकदा सरकारवर व्यंग्यात्मक पद्धतीने टीका करतात. त्या आसामच्या आहेत.
  • पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलेल्या त्यांच्या विधानामुळे लखनऊ विद्यापीठाचे विद्यार्थी संतप्त झाले होते.

हेही वाचा : पहलगाम दहशतवादी हल्ल्याने व्यथित मुस्लिम महिलेने सनातनचा स्वीकार केला! हिंदूरक्षा दलाचा दावा

हेही वाचा : पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत मोठा खुलासा, मास्टरमाइंड हाशिम मुसा पाकिस्तानी सैन्याचा माजी पॅरा कमांडो

हेही वाचा : पहलगाम हल्ला : 'अल्लाहू अकबर' घोषणा देणाऱ्या झिपलाइन ऑपरेटरला NIAने बोलावले चौकशीला!

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+