Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

भारताशी युद्धाचा धोका, पाकिस्तानी सैन्यात घबराहट? सेनाप्रमुख मुनीर यांनी कुटुंबाला पाठवले युरोपात

Pakistan Army Chief Asim Munir sends family abroad : भारत आणि पाकिस्तान या दोन देशात आधीच तणावाची स्थिती आहे. त्यात पहलगाम हल्ल्यानंतर संबंध ताणले गेले आहेत. भारताने पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानला काही अंशी प्रत्युत्तर दिले आहे. दोन्ही देशाच्या वाढत्या तणावाच्या पार्श्वभुमीवर पाकिस्तानचे सेनाप्रमुख असीम मुनीर यांनी आपल्या परिवाराला विशेष विमानाने युरोपीय देशात पाठवले आहे.

विविध माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, दावा करण्यात आला की, असीम मुनीर यांच्यासारखेच पाकिस्तानी सैन्यदलातील काही अधिकाऱ्यांनीही त्यांच्या कुटुंबाला परदेशात पाठवले आहे. यासंदर्भात नवभारत टाईम्सनेही वृत्त दिले आहे.

Pakistan Army Chief Asim Munir sends family abroad

असीम मुनीर आले स्पाॅट लाईटमध्ये

असीम मुनीर यांनी भारताविरोधी भडकाऊ भाषणं दिली होती, त्यानंतर पहलगाम हल्ला झाला असे बोलले जात आहे, त्यामुळे हा हल्ला जरी दहशतवाद्यांनी केला असला तरीही यामागे पाकिस्तान मास्टरमाईंड असल्याचा आरोप होत आहे. सध्या पाकिस्तानी लष्कराची कमान असीम मुनीर यांच्याकडे आहे, त्यामुळे ते प्रकाशझोतात आले आहे.

पहेलगाम येथील हल्ल्याची जबाबदारी टीआरएफ या संघटनेने घेतली आहे. ही संघटना म्हणजे लष्कर ए तोएबा या दहशतवादी संघटनेची पिलावळ आहे. भारतात पर्यटकांवर हल्ला करुन काश्मीरी जनतेचा रोजगार हिरावून घेणे आणि भारतात धार्मिक वाद वाढवणे हा हेतू दिसतो. काश्मीरचा मुद्दा सध्या शांत आहे आणि पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय पातळीवर हा मुद्दा वादाचा करायचा आहे त्यामुळे त्यांनी दहशतवाद्यांना हाताशी धरुन हा हल्ला करवला त्यात मुख्य सहभाग असीम मुनीर याचा असल्याचे बोलले जात आहेत.

या सर्व पार्श्वभूमीवर युद्धाचा धोका असल्याने असीम मुनीर यांना लक्ष्य केले जाऊ शकते असे वाटत असल्याने त्यांनी कुटुंबियांना सुरक्षितस्थळी
पाठवल्याचे वृत्त आहे.

असीम मुनीर कोण आहेत?

रिपोर्टनुसार, सय्यद असीम मुनीर यांचा जन्म रावळपिंडी, पाकिस्तान येथे एका पंजाबी मुस्लिम सय्यद कुटुंबात झाला. त्यांचे मूळ जालंधर, पंजाब, भारत येथे आहे, तेथून त्यांचे पालक 1947 च्या भारताच्या फाळणीनंतर स्थलांतरित झाले. ढेरी हसनाबाद, रावळपिंडी येथे स्थायिक होण्यापूर्वी ते टोबा टेक सिंग येथे गेले. मुनीर यांनी आपले सुरुवातीचे धार्मिक शिक्षण मरकाझी मदरसा दार-उल-ताजवीद, रावळपिंडी येथील पारंपारिक इस्लामिक मदरसा येथे घेतले आहे.

मुनीर यांची फ्रंटियर फोर्स रेजिमेंटच्या 23 व्या बटालियनमध्ये त्यांची नियुक्ती झाली. 25 एप्रिल 1986 रोजी त्यांनी लष्करी कारकिर्दीला सुरुवात केली. त्यानंतर लेफ्टनंट कर्नल म्हणून नंतर ब्रिगेडियर म्हणून, मग मेजर जनरल पदावर बढती देण्यात आली. मुनीर यांना सप्टेंबर 2018 मध्ये लेफ्टनंट जनरल पदावर बढती देण्यात आली आणि त्यानंतर त्यांची आयएसआय डीजी म्हणून नियुक्ती करण्यात आली. ते 2022 पासून पाकिस्तानचे लष्करप्रमुख बनले आहेत. मुनीर हे 27 नोव्हेंबर 2022 रोजी निवृत्त होणार होते पण सरकारने त्यांना सेवेत कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+