Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

पहलगाम दहशतवादी हल्ल्याने व्यथित मुस्लिम महिलेने सनातनचा स्वीकार केला! हिंदूरक्षा दलाचा दावा

Pahalgam terror attack distressed Muslim woman accepts Sanatana : देशाची आन, बाण आणि शान असलेल्या काश्मीरमध्ये 22 एप्रिल 2025 रोजी दहशतवादी हल्ला झाला. अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम येथे हा हल्ला झाला. बैसरन खोऱ्यातील पर्यटनस्थळी पर्यटक ज्यावेळी आपल्या पर्यटनाचा आनंद लुटत होते त्यावेळी आनंदाचे क्षण या हल्ल्याने दुःखात लोटले गेले.

Pahalgam terror attack

पहलगाम हल्ल्यात 26 भारतीयांचा मृत्यू झाला. यामध्ये एका स्थानिकाचाही मृत्यू झाला. या हल्ल्याने साऱ्या भारतात दुःख व्यक्त होत आहे. त्यासोबतच आता भारत दहशतवाद्यांविरोधात सुरक्षाविषयक रणनिती आखत आहे.

यातच आता एक मोठा दावा केला जात आहे. पहलगाम हल्ल्याने दु:खी झालेल्या एका गाझीयाबाद येथील मुस्लिम महिलेने सनातनचा स्वीकार केला असल्याचा दावा हिंदू रक्षा दलाने केला आहे. हिंदू रक्षा दलाच्या साहिबाबाद कार्यालयात मंगळवारी हवन करण्यात आले, त्यावेळी ही बाब समोर आली आहे तसेच यासंदर्भातील एक व्हिडिओही सोशल मीडियावर समोर आला आहे.

हिंदू रक्षा दलाचा काय आहे दावा?

यासंदर्भात लाईव्ह हिंदुस्तान डाॅट काॅमने वृत्त दिले आहे. दिल्लीत राहणाऱ्या नेहा खानचा पूर्वी घटस्फोट झाला होता. हलाला केल्यानंतर तिचे वडील तिला तिच्या पूर्वीच्या पतीशी पुन्हा लग्न करण्यास सांगत होते. ती यासाठी तयार नव्हती. दरम्यान, पहलगाम हल्ला झाला, त्यानंतर नेहा दु:खी झाली असे हिंदु रक्षा दलाचे म्हणणे आहे.

हिंदू रक्षा दल संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष पिंकी चौधरी यांनी यांसंदर्भात भाष्य केल्याचे लाईव्ह हिंदुस्तानच्या वृत्तात आहे. नेहा यांच्याशी सोशल मीडियावर संपर्क झाला आणि मंगळवारी नेहा खान नेहा शर्मा बनली असे हे भाष्य आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये महिला सनातन धर्म स्वीकारण्याबाबत बोलत आहे. पहलगामच्या घटनेने ती व्यथित झाल्याचा हिंदु रक्षा दलाचा दावा आहे. सनातन धर्मातील चांगल्या गोष्टी पाहून आपण कोणतेही दडपण न घेता हे पाऊल उचलले आहे, असेही या महिलेने म्हटल्याचे समोर आले आहे.

नेहा नामक या महिलेने आपल्या आडनावात बदल केला असून शर्मा हे आडनाव हे धारण केले आहे असा दावा हिंदू रक्षा दलाचा आहे. नेहाने आपल्या स्वःतच्या निर्णयानुसार ही गोष्ट केली आहे. मी प्रौढ आहे आणि मला माझ्या आवडीचा धर्म निवडण्याचा अधिकार आहे. पहलगाममध्ये जे लोकांचे झाले ते कोणाचेही घडू नये. दहशतवाद झपाट्याने पसरत आहे. आता माझे रक्षण करण्याची जबाबदारी तुझी आहे. मी तुझीच बहीण आहे, असेही ती म्हणाली असे याबाबतच्या वृत्तात म्हटले आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+