पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत मोठा खुलासा, मास्टरमाइंड हाशिम मुसा पाकिस्तानी सैन्याचा माजी पॅरा कमांडो
Pahalgam Terror Attack : जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथील बैसारण व्हॅलीमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याने संपूर्ण देशाला हादरला आहे. 22 एप्रिल रोजी जम्मू आणि काश्मीरच्या पहलगाममध्ये पर्यटकांवर झालेल्या प्राणघातक दहशतवादी हल्ल्यात 26 जणांचा मृत्यू झाला आहे. यात स्थानिक दोघांचा असे मिळून 28 लोकांना प्राण गमवावे लागले. हा दहशतवादी हल्ला झाल्यानंतर देशभरात संतापाची लाट पसरली आहे.
या हल्ल्यामागे पाकिस्तानी दहशतवादी हाशिम मूसा याचा हात असल्याचे तपासातून समोर आले आहे. हाशिम मुसा हा पाकिस्तानच्या स्पेशल फोर्सेसचा माजी पॅरा कमांडो आहे. असून, सध्या तो लष्कर-ए-तैयबा (LeT) या दहशतवादी संघटनेसाठी काम करत आहे. या हल्ल्याने भारत-पाकिस्तान संबंधांमध्ये तणाव वाढला असून भारताने कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे.

रिपोर्टनुसार, हाशिम मुसा, जो आता लष्कर-ए-तैयबासोबत काम करत आहे. हाशिम मुसाला जम्मू आणि काश्मीरला पाठवण्यापूर्वी पाकिस्तानच्या स्पेशल सर्व्हिस ग्रुपने (SSG) विशेष प्रशिक्षण दिले होते. तपास अधिका-याचे म्हणणे आहे की, मुसावर भारतीय आणि परदेशी पर्यटक तसेच स्थानिक नसलेल्या नागरिकांना लक्ष्य करण्याचे काम सोपवण्यात आले होते.
झिपलाइनिंग व्हिडीओतून सत्य आले समोर
हल्ला झाल्यानंतर एका पर्यटकाच्या एक झिपलाइनिंग व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडीओ दहशतवादी पळून जाणाऱ्या लोकांवर अचूकपणे गोळीबार करताना दिसत आहेत. यावरून हे स्पष्ट होते की, दहशतवाद्यांना विशेष लष्करी प्रशिक्षण मिळाले होते. खरंतर, एक पर्यटक येथे झिपलाइन करत होता आणि यादरम्यान तो सेल्फी व्हिडिओ देखील बनवत होता. या व्हिडिओच्या पार्श्वभूमीवर, दहशतवादी हल्ल्यानंतर पर्यटक पळून जात आहेत आणि दहशतवादी त्यांना लक्ष्य करत आहेत हे दिसून येते आहे.
दरम्यान या व्हिडिओमध्ये "अल्लाहू अकबर" घोषणा देणाऱ्या झिपलाइन ऑपरेटरला राष्ट्रीय तपास संस्था (NIA) आणि जम्मू आणि काश्मीर पोलिसांनी चौकशीसाठी पुन्हा बोलावले आहे, अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे. पहलगाम हल्ला झाल्यानंतर त्या ठिकाणी असलेल्या प्रत्येक पर्यटकांसह स्थानिक लोकांची एनआयएच्या वतीने चौकशी केली जात आहे. सर्वाना समन्स बजावून नेमकी घटना कशी झाली, त्यावेळी तुम्ही कुठे होतात, यासह अनेक बाजूंचा तपास केला जात आहे.
पहलगाम हल्ल्यानंतर भारताने उचली कठोर पावले
- सिंधू पाणी करार रोखण्यात आला.
- अटारी सीमेवरून होणारी वाहतूक थांबवण्यात आली आहे.
-पाकिस्तानी नागरिकांचे व्हिसा तात्काळ रद्द करण्यात आले. 48 तासांच्या आत देश सोडण्याचे आदेश.
- पाकिस्तानमधील भारतीय दूतावास बंद केले जाईल तसेच भारतातील पाकिस्तानी दूतावास देखील बंद करण्याचा निर्णय झाला.
- पाकिस्तानी राजदूतांनी 7 दिवसांच्या आत देश सोडावा.












Click it and Unblock the Notifications